पान:महाभारत.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ नरहरिकृत [द्रोणपर्व अग्नि धडकत राहतवटी । जगा आकांत पडती थाटी। कीं दरवडा पडतां निशीपोटीं । तेवीं आकांत संगिया. ॥ ११० ॥ कीं बिडाळ लोटला मूषकभारीं । तयासारिखी होय परी । ना तो ससाणा उतरतां अंबरीं । कुररकुंचिका आकांतू ॥ १११ ॥ तैसा वैळसा तये समयीं । पीडितां वीर गजाचे घायीं । तरी परा न होत ¥यी । धांवती पुढा जयाते. ॥ ११२ ॥ गजारूढ दाशार्हपती । रोपें धांवला द्विपाप्रती । बाण अपनी काळघाती । करी गर्जना सत्रणे. ॥ ११३ ॥ तिर्यग्दृष्टी संतप्त राजू ॥ कडाडिला जैसा विजू । धडका हाणोनी तोडुनी माजू । पुढे रोपें सुसाटे. ॥ ११४ ।। रुचिपर्वा बळिष्ठ नृपती । त्याचा सुपर्वा पुत्र सुमती । आणि सुपर्वा पर्वतपती । धांवले रोपें गजेंद्रा ।। ११५ ।। नतपर्वणी तीक्ष्ण बाण । ताडितां मौळ झाडिलें त्राणें । रख फोडुनी महाप्रभिन्न । उसळोनियां लोटला. ।। ११६ ॥ चपेटोनी उभय वीरां । शुंडादंडे केले पुरा । सहित वाजी यमघरा । वस्तीलागीं वोपिलें. ॥ ११७ ॥ ‘आहा' शब्द पूँतनामुखीं । सौभद्र धांवला थोर तबँकीं । द्रौपदीनंदन पंच तोकीं । हरीपरी पातले. ॥ ११८ ॥ युयुत्स आणि चेकितान । धडकोनी वर्षती बाणघन । भगदत्त होवोनी क्रोधवर्धन । पद द्विप प्रेरिला. ॥११९॥ सुसाटतां स्वसेनेवरी। रवी इतस्तता जाले समरीं । अभिमन्यु वीरकेसरी । पर्वतप्राय स्थिर तो.॥१२०॥ शरासनी काळ काळविखारी । सज्जोनी बाण मंत्रोच्चारीं । सोडितां भरले गगनोदरीं । तेजें धरा डळमळी. ॥ १२१ ।। वीज पडे पर्वतमौळीं । तैसे शिरकले कर्णबिळीं । त्रास पावोनी, कानशळीं । झाडुनी, फोडी रवाते. ॥ १२२ ॥ किंकाट घोर गर्जना। अद्रिमौळी डळमळी सेना । पडसादें भेदिले गगना । धरादेवी दुमदुमी. ॥ १२३ ॥ कानवडोनी लोटला पुढा ।। करीत सेना महा रगडा । वीर पडती दडदडा । धीर कोण्हा धरवेना. ॥ १२४ ॥ ‘आला, आला, गजेंद्रकाळ । पळा, पळा, न करी बळ । मरतमरतां वांचलों फळ । दैवयोगें स्त्रियेच्या.' ॥ १२५ ॥ हलकल्लोळ सेनामेळीं । भयपीडित चमू सकळी । गजेंद्रे मांडिली धुमाळी । चक्रापरी भ्रमतसे. ॥ १२६ ॥ किंकाळी फोडूनी भैरव शब्द । धांवे जेथ निबिड मांदी । १. वस्तीच्या जागेत, राहटींत. २. कुरर=टिटव्या. कुचिक=मत्स्यविशेप. ३. संकट, प्रसंग. ४. कोणी मागे हटले नाहींत-हा भाव. ५. जोराने, आवेशाने. ६. सेनेच्या तोंडीं. ७ जोराने. आवशानें. ८, काळसर्पासारखे. ९. कानशिलें१०. प्रतिध्वनीच्या योगाने. ११. एका अंगाला होऊन, तिरकस होऊन, बाजूस सरून