पान:महाभारत.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मैहभीरत. ६ अध्याय ४७ धारू । बुजोनी गेला वडवाग्नी. ॥ ९० ॥ कीं येतां तेजोराशि उदयासी । अडखळोनी पडे तमाच्या कोशीं । ना तो ग्रहगणासहित शशी । खद्योततेजें हरपला. ॥ ९१ ॥ तैसा विपाक अजी घडला । भीमसेन गजातें वश्य जाहला । काय पाहतां हस्तीची लीला । उभा चिरा दों ठाई.' ॥ ९२ ॥ शब्दगौरव वीरमांदी । ऐकोनी लोटले तये संधी । धर्मराज प्रतापनिधी । वीरांसहित धांवला. ॥ ९३ ॥ पांचाळ, मच्छ, कैकयभूप, । चेकितान, सात्यकी, कुळदीप । अभिमन्यु, वीर वासुकीसर्प-। प्राय क्रोधे पातले. ॥ ९४ ॥ शरासनीं प्रभिन्न शर । सज्जोनी लाविले एकधार । जेवीं हेस्ताची वृष्टी निबिडघोर । क्षणार्धे करी समृद्धी. ॥ ९५ ॥ तयापरी नाराचधारा । गजअंगीं रुपती सैरा। रुधिरस्राव झरझरा । अद्रिप्रय प्रवाहो. ॥ ९६ ॥ निर्बुजोनि गज फोडिल व । आईभेरीचा जेवीं गौरव । उसळोनी पुढां लोटला हाव । जेवीं मृगेंद्र ताडिल्या. ॥ ९७ ।। इतस्तता होवोनी गेली चमू । सात्यकी अचळ जैसा द्रुमू । बाण विधिले लक्षुनी वर्मू। अधिक गज क्षोभला. ॥ ९८ ॥ एक मांडी पुरुषार्थप्रौढी । वीर निघती संग्रामतोंडीं । सुसाट शरांची मुरकुंडी। सूर्यरश्मी बुजाले. ॥ ९९ ॥ प्रभिन गज पर्वतासरी । धांविल्या सात्यकीच्या रथावरी । सैंधवाश्वरथ कुसरी । भग्न करी सरोघं. ॥ १०० ॥ भूमी आतला यादववीर गाढा । गज रगडित चालिला पुढा। वीरीं घालोनी वेढा । “घ्या, घ्या, शब्द गर्जती. ॥ १०१ ॥ धृष्टद्युम्ने काळविखारी । सात तोमर ताडिले शिरीं । गज फूत्कारितां, घोडे चारही । घेवोनी रथा पळाले. ॥१०२॥ युयुत्सुतनय आडवारा । करितां गज पावला त्वरा । अश्वासहित रथा चुरा । करूनी भूप मारिला. ॥ १०३ ॥ किलकिलाट शब्दध्वनी । करुनी वीर धांवले रणीं । शखें ताडिती विचित्रकिरणी । ज्यांस जैसी योग्यता. ॥१०४॥ सहज स्वभावें - मत्त द्विरद । मद झरपत अधिक धुंद । तो गजराज प्रसिद्ध । शक्तिमदें गळा. ॥ १०५ ॥ शर खडतरे गात्रसंधी । तेणे अधिक उसळे युद्धीं । गर्जना रौद्र भैरव शब्द । करितां सेना खळबळी. ॥१०६॥ वातवेगें चपळ वक्र । गरगरां फिरे जैसा चक्र । भ्रमिष्ट वीर झांकिती नेत्र । 'आला आला' ह्मणवुनी.।।१०७|| मुसांडीसरिसे प्रभिन्नहस्ती । दडदडां पडती शतशा क्षिती । वाजी पदाती टकोरघाती । वाळूप्राय विखुरती. ॥१०८॥ रौद्र रणरंगधुमाळी । माजली, वीर दचकती बळी । पाणितळे मुखकमळीं। शख स्फुरिती अपार. ॥१०९ ॥ जैसा वाची. ३. बाणांच्या सरी. ४. पर्वतप्राय. ५. निर्बुजणे=घाबरणे . १. धारेने. २. हस्तनक्षत्राची. ३. बाणांच्या सरी, , ६• ओरडू लागला. ७. काळसपसारखे.