पान:महाभारत.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ नरहरिकृत [द्रोणपर्व शृंखळा । वज्रप्राय खळखळी. ॥ ७२ ॥ हेलासमान विशाळदंत । जडाव रत्न सुशोभित । उन्नत केतु घवघवित । इंद्रधनुष्यासारिखे. ॥ ७३ ॥ पृष्ठभागीं चंवरडोल । जडाव रत्नीं रुचिरमेळ । वरी मिरवला वीरशार्दूळ । भगदत्तराज प्रतापी. ॥ ७४ ॥ भीमबळाचा उत्कर्ष थोर। साहों न शके राजेश्वर । अंकुश स्पशनी गजवर । रोपें भीमा लोटला. ॥ ७५ ॥ पाहोनी येरें कर्षांनी धनू । बाण सोडिले प्रभिन्न घनू । उसळोनी तेजें गगनू । गजेंद्रमूर्धी शिरकले. ॥ ७६ ॥ रुधिरस्राव जाहला सडा । झाडोनी मौळ लोटला पुढा । द्विगुण क्रोध दाटला गाढा । स्यंदनात धडकला. ॥ ७७ ॥ धरूनी रथ मकरतोंडीं । भूमी आपटिला महाप्रौढी । चकचूर होऊनि गेलीं घोडीं । भीम दुपायीं उडाला. ॥ ७८ ॥ धांवोनी द्विरद पादपादा । देवोनी उराचा ताडिला सदा । शृंडे कवळोनी घालितां मदा। रोपें भीमा नावरे. ॥ ७९ ॥ आसडूनी हस्त वज्रमुष्टी । वोपनी त्राणे घोर दृष्टी । चांचरी जातां उठाउठी । मोकळा जाहला पांडव. ॥ ८० ॥ सरक मारोनी गजोत्तम । शेंडे ताडितां यादव भीम। द्वैयविषाणी हृदयपद्म । आसुडिले प्रतापें. ॥ ८१ ॥ गिरकी खावोनी ते काळीं । लत्ता वोपिली पादकमळीं । गज फोडूनी आरोळी । पुढां धांवला सरोजें. ॥ ८२ ॥ शुंडादंड प्रचंड धडका । साहों न शके कुरुकुळटिळका । चुकवोनी घाय अग्निशिखा । पोटातळीं निघाला. ॥ ८३ ॥ वीर भीमसेन जगजेठी । विन्मुख रणीं नेदीच पाठी । यालागीं निघोनी गजाच्या पोटीं । चुकवी मारी दोघांची. ॥ ८४ ॥ वारण अत्यंत घाबिरा । पायें तुडवू पाहे वीरा । भीम चुकवी त्यांचा मारा । बांकारतासारिखा. ॥ ८५ ॥ जिकडे जिकडे फिरे गजू । तिकडे लोटे पांडवराजु । जसी प्रभिन्न चपळ विजू । लवोनी कोठे नाडली. ।। ८६ ॥ ना ते समद्राची लहरी । उसळोनी मग्न होय नीरीं । की वन्हिशिखा वरूनी वरी । शेखीं नाम त्यामाजी. ॥ ८७ ॥ तयापरी भीससैन । करी घात धूर्तपणे । मुहूर्त एक कांहीं न्यून । गजातळी कोंडला. ॥ ८८ ॥ ‘हाहाकार पांडवदळीं । म्हणती, ‘मारिला अतुर्बळी । भीम पडिला काळानळीं । निर्गमा मार्ग दिसेना. ॥ ८९ ॥ पाहा हो ! नवलाव कैसा थोरू! । मुंगीमुख समावला मेरू । कीं टिवटिवचंचूजळाची १. नांगरासारखे. २. अंबारी. ३. मस्तक झाडून. ४. मकरंतोंड=रथाचा पुढचा भाग. हा शब्द मुक्तेश्वरानें योजिला आहे. पुच्छ गुंडाळोनी हातां । गदा वोपी राउतमाथा । मकरतोंडीं ताडी लाता । रथ भंगोनी सांडितू'. । (विराटपर्व, ५॥१०८), ५. सांधा. ६. दोन्हीं सुळयांनीं. ७. पट्टा खेळणा-यासारखा. ८. बाहेर निघण्यास.