पान:महाभारत.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ अध्याय] महाभारत, ४५ वारितां हावा । गजानीकाचा पाहोनी यावा । क्रोध भीमा न साहे. ॥ ५५ ॥ रथ लोटूनी प्रबळ रागें । शरीं भेदिली गजांची अंगें । भूमी पडती जैसी शृंगें । वर्षे शैल ताडितां. ॥ ५६ ।। प्रभिन्न कैरटी मदस्रावित । फोडुनी वेगळे केले दंत । शतशा करूनी पदातीत । धरे कोथळे पाडिले. ॥ ५७ ॥ अट्टाहास्य भैरव शब्द । करुनी प्राण सोडिती द्विरद । एक छिन्नगात्री पावोनी खेद । दिशा सैरा धांवती. ॥ ५८ ॥ गैजप्रतापवीर । छिन्नगात्री उडविलें शिर । भयें उड्या टाकोनी सत्वर । बहुधा वना पिटिले. ॥ ५९ ॥ अधिकारिया क्रूर वेळा । पावतां, अश्रांत लंधिती माळा । कीं वना धडकती अग्निज्वाळा । श्वापदें पळती दिशांतें. ॥ ६० ॥ ऐसिया परी गजआपदा । भीमसेन पेटला द्वंद्वा । जळदप्राय वारणवृंदा । तळपे भीम जेवीं पैं. ॥ ६१ ॥ दुर्योधन वारणस्कंधीं । दुःसह पावोनी पावला युद्धीं । शर वर्षांनी काळक्रोधीं । वृकोदरा ताडिलें. ।। ६२ ॥ तया क्षणी क्षितिपती क्षत । निरखोनी क्षया जाला उदित । तीक्ष्ण शर क्षरातीत । शरासनीं सजिले. ॥ ६३ ॥ वोर्ड काढोनी सत्राणे । बाण सोडिले महात्राणे । कौरवअंगीं खडतरून । धरेमाजी विझाले. ॥ ६४ ॥ त्वरा करुनी शरसंधानीं । ध्वज छेदोनी पाडिला धरणी । गजराज भूषित वस्त्राभरणीं । घंटामंडित ताडिला. ॥ ६५ ॥ शर शिरकतां कुंभस्थळीं । घनाऐसी फोडूनी आरोळी । पडता जाहला महीतळीं । गिरिशृंगासारिखा ॥ ६६ ॥ वारणरक्षक म्लेच्छभूप । महाप्रतापी दारुणदर्प । आडवे निघतां, भीमा कोप । द्विगुण जाहला वधार्थी. ॥ ६७ ॥ तीक्ष्ण वर्षेनी बाणजाळीं । शतशा शिरें उडविली अंतराळीं । ‘हाहाकार कौरवदळीं । म्हणती ‘भूप मारिला.' ।। ६८ ।। ऐकोनी वीरांच्या लोटल्या पंक्ती । अग्र भगदत्त प्रतापकीर्ती । ज्याचिया गंजासमान क्षिती । नाहीं दुजा सर्वथा. ॥ ६९ ॥ कीं ऐरावतीचा धाकुटा बंधू । नागायुतविक्रमसिंधू । ज्याच्या बळाचा मानोनी खेदू । काळ पैरी सरतसे. ॥ ७० ॥ सदा मस्त; कर्ण, ग्रीवा, कटी, । त्रिधा मद गळे भूतळवटीं । धडकें पर्वत माघां लोटी । रूपें मेघ दसरा ,,,, रुक्मघंटा, विचित्र माळा । कणच्या भदं फांकती कीळा । 'प्रंभिन्न शृंडीं दृढ़ । हला, आवेश. २. हत्ती. ३. हत्तींवर आरूढ झालेले. ४. सरकारी अमलदार, सद्दी इत्यादिकांस. ५. माळ=लागवडीस न आलेली ओसाड जमीन. ६. ओढ घेऊन, (धनुष्याची दोरी) ताणून. ७. गंडस्थळांत. ८. मागें अ० २ ओं० ९३ पहा. ९. दशसहस ली. दहा हजार हत्तींचे बळ ज्यास आहे असा. १०, पलीकडे किंवा मागे. ११. घडीकीनें. थडकीने, टकरीने. १२, विशाल, मोठ्या