पान:महाभारत.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ [द्रोणपर्व नरहरिकृत पुढारे, जैसा कदनीं । सुरांसहित सुरेंद्र. ॥ ३५ ॥ माघां वीरांच्या थाटी । शस्त्रे झळकती तीव्रमुष्टी । पार्षदवीर जगजेठी । अग्रभागीं चामके. ॥ ३६॥ द्रोणाचार्य कांचनरथीं । ध्वज मिरवे प्रदीप्तकांती । कृष्णाजिनाव्यक्ती ।। चिन्हें सर्वही लक्षिती. ॥ ३७ ॥ वैडूर्यमणी रत्नखचितू । भीमसेनाचा विशाळ केतू । विभ्राजमान स्वानंदभरितू । लोटता जाहला वीरासी. ॥ ३८ ॥ कुरुवर्यराजशिखामणी । धर्मराज ऐश्वर्यखाणी । विशाळध्वज सोमकिरणी । वीरभंगणीं शोभला. ॥ ३९ ॥ अनेक वाद्ये वाद्यध्वनी । घोषं दिशा भरिल्या गगनीं । नकुळध्वज शरभचिन्ही । शोभायमान डोलला. ॥ ४० ॥ श्रीमान्य सहदेव हर्षयुक्त । कांचनध्वज चिन्हांकित । पांचाळराज केतुमंडित । जेवी मरुद्रण शक्रा पैं. ॥ ४१ । अभिमन्युरथाचा केतू । हेमांबरी लखलखितू । शाइपक्षीचिन्हांकितू । रुक्मघंटा साजिन्या. ॥ ४२ ॥ घटोत्कच राक्षसराज । गृध्रपक्षी विशाळध्वज । कामिक अश्व मायाबीज । रावणरथासारिखे. ॥४३॥ माहेंद्र धनुष्य दिव्यकांती । धर्मराजाचे शोभे हस्तीं । वाव चाप अभंग व्यक्ती । मिरवे मुष्टी भीमाच्या. ॥ ४४ । पूर्वी त्रैलोक्यरक्षणार्थ । ब्रह्म निर्मिले चाप समर्थ । तें गांडीवधनु उचितार्थ । अग्नीने पार्था अपिल. ॥ ४५ ॥ वैष्णव चाप नकुळप्राप्त । सहदेवासी अश्विनीदत्त । घटोत्कचासो पौलस्तीकृत्य । प्राप्त धनु जयश्री. ॥ ४६ ।। रौद्र अग्नीसमान कांती । कुबेरें निर्मल्या होती । ते द्रौपदीतनय जाली प्राप्ती । पांचजणां अभंग. ॥ ४७ ॥ तीव्र धनुष्य लाधले रामा । तेणें सौभद्रा अर्पिले प्रेमा । जें चपळ अढळ संग्रामा । भंग कृतांता नव्हेची. ॥ १८ ॥ ऐसियापरी अनेक चाप । ध्वजा प्रज्वाळ अग्नीची रोपं । धडकते जाहले रोपें ताप । दोणाचार्या निधाते. ॥ ४९ ।। जाणों वन्हीचा एकवळा । कीं द्वादश सुर्य एकत्र मेळा । कीं नवग्रह उसळे कीळा । क्षयालागीं युगांतीं. ॥ ५० ॥ तयापरी पांडववीर । उसळल क्रोधे महाथोर । कौरव वीर धीर शूर । बैंसले पुढे उत्साहे. ॥ ५१ ॥ करिता दोणासी वैरवाळा । वीर आडवे लोटती सबळा । शर वर्षती अग्निज्वाळा । एकमेकां निघाते. ।। ५२ ॥ इंद्रयुद्ध कडोविकडी । वीरवीरां ताडिती प्रौढी । जेंवी वन्हीची पडतां उडी । शिखा अग्रीं धांवती. ॥ ५३ ॥ कीं पर्जन्यवृष्टी नव्हतां पुरी । र्चिर कमान उचली वैरी । कीं हिमवंताचिया विजाच्छारी | पुढां सीत सुसाटे, ॥ ५४ ॥ तैसियापरी वीरउठावा । एकमेका . १. जाई, गमन करी, २. बीररूपी नक्षत्रांत. ३. उचित=उपायन, भेट, नजराणा. ४. बाण५. तडाख्याने. ६. घुसले, शिरले. ७. हल्ला. ८. पुष्कळ वेळ उठाव (जोर) करिते,