पान:महाभारत.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ अध्याय महाभारत. ४३ कुमाइत, शामकर्ण. ॥ १६ ॥ बोर, अबलख, वाघांबरी, । सप्तद्वीपींचे अश्व नानापरी । नवखंड धरे समुद्रतीरीं । जाती अनेक अश्वांच्या. ॥ १७ ॥ ऐसिया गुणी अश्वोत्तम । रथीं जुतिला पाखरा हेम । रुक्मांबर वर्णी विचित्र काम । जाणों चित्रीं चित्रिले. ॥ १८ ॥ ऐसी स्यंदनांचिया धाटी । जैसा उसळे अर्णव लोटीं । तयामागें कैकय हटी। साहा सहस्र लोटले. ॥ १९ ॥ द्रौपदीपुत्र सिंहशावक । जाणों मूर्तिमंत पांच अर्क । रूपलावण्य विद्याविक । तेजें द्रोण पंचधा. ॥ २० ॥ श्रुतसोम पुत्र अर्जुनाचा । पित्यासमान विक्रम त्याचा । माषपुष्पवर्ण हयाचा । हेमरथी धडकला. ॥ २१ ॥ शतानीक नकुळतनय । शालिपुष्पित रंगीं हय । बालार्ककिरणी यंदनवर्य। संगरातें धांवला. ॥ २२ ॥ कांचनवर्ण मयूरग्रीवा । हयोत्तम रथीं जेवीं मघवा । श्रुतकर्मा भूषणीं बरवा । रणांगणा उफाळे. ॥ २३ ॥ श्रुतकीर्तीच्या लाटा । पार्थासमान विक्रमताठा । तासवर्ण अश्व सुभटा । वातवेगें उसाळे. ॥ २४ ॥ शतधृती कांचनरथीं । आरूढे जैसा शचीपती । सोमरश्मी हयप्रदीप्तकांती । धांवे क्रोधे युद्धाते. ॥ २५ ॥ पिशंगीवर्ण प्रथमवयसा । हय करिती रथा वळसा । अभिमन्यवीरप्रतापतोषा-। सारिखे रणीं राबती. ॥ २६ ॥ रुक्ममाळाअळंकृत । हेमवर्णी अश्वमंडित । काशिराज स्पंदनयुक्त । रणांगणी डोलला. ॥ २७ ॥ कांबोज आणि प्रभद्रक । साहा सहस्र रथी ठळक । विचित्रवर्ण हय सम्यक । रथारूढ थडकले. ॥ २८ ॥ कषायवर्ण सुवर्णपाळा । चेकितानवाजी राजित कीळा । रूद्रधनुष्यासारिखी कीळा । कुतिभोजवाजी सुदर्शी. ॥ २९ ॥ समुद्रसेन पुत्रासहित । समुद्रवर्णी हय उन्नत । शशांककांती वाजि श्वेत । चंद्रसेनरथाचे. ॥ ३० ॥ नीलोत्पलदलवर्णी । सैंधवअश्व थरकती गुणी । चक्रवाककांती हयगुणी । कौसल्यपतिपुत्राचे.३१ ॥ शिव आणि चित्ररथ । विचित्र माळा हयमंडित । रासभवर्ण धगधगित । व्याघ्रदत्तवाजी प्रतापी. ॥ ३२ ॥ चतुर्दश अयुत वीरमांदी । उसळले भूप काळक्रोधी । द्रोण प्रतापाचा उदधी । अगस्तिरूप ग्रासावया. ॥ ३३ ॥ नानावर्ण विचित्रध्वज । घंटापताकी तेजःपुंज । नानावर्ण हयोत्तमराज । माघारिती चायूतं. ॥ ३४ ॥ कांचनध्वज जडाव रत्नीं । स्पंदनारूढ गदापाणी । । १. घोड्यांच्या झुली. २. सूर्य. ३. विद्यासंपन्न. ४. अजुनाच्या पुत्राचे नांव 'श्रुतकीर्ति होते. श्रुतसोम' हा भीमाचा मुलगा. ५. उडदाच्या फुलांचा रंग. ६. भाताच्या फुलाने यक्तभाताच्या कणशीसारखे. ७. हा सहदेवपुत्र. ८. तास (चाप) पक्ष्याच्या रंगाचा, ९. Gि १०, तांबड्या वर्णाचे.