पान:महाभारत.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ अध्याय] महाभारत. ४१ ॥१०६॥ ना ते, राहुदशेचिया साउली । भ्रष्टोनी सूर्य मिळे धुळी । कीं मायानदीच्या खळाळीं। कपिलमुनीं वाहिजे, ॥ १०७॥ ना ते, स्वप्नीं शरीर खंडलें। ते जागृती साच मानिलें भलें । कीं अभ्रपडळीं झांकिलें । सोमबिंब नुगवे कीं; ॥ १०८ ॥ तयापरी पांडववीरा । अजय मानीं राजेश्वरा ! । समरांगणी वृकोदरा । उभा काळ भीतसे. ॥ १०९ ॥ महाप्रतापी अर्जुन बळी । करी वीरांची खंदळी । युद्धा मिनतां चंद्रमौळी । बाहुबळे तोषवी. ॥ ११० ॥ सुरासुरदानवाधिपा । युद्ध अजिंक्य राक्षसनृपा । विगत कर्ता त्याचिया दप । भूतळीं वीर दिसेना. ॥ १११ ।। आतांची पाहें पां राया ! दृष्टी । संगोळल्या वीरांच्या कोटी । जैसा अर्णव उसळे लोटीं । पंर्वी लाटा जयाच्या. ॥ ११२ ॥ तयापरी शौर्यसमुद्रा । भरतें दाटले दिसे मुद्रा । वीरलहरी संग्रामचंद्रा । देखोनियां उसळती. ॥ ११३ ॥ पाहें पां रथी बिभ्राजकीळी । तैप्तहाटकज्वाळमाळी । ध्वजीं पताका शोभा आगळी । जेवीं अग्नी होमाचा. ॥ ११४ ॥ रोपें शिखा लागती गगना। उसळोनी मिळों पाहती रणा । धांव धांव राया ! रक्षीं द्रोणा। वीरमांदीसहितं. ॥ ११५ ॥ असो; आतां पुढील कथन । ध्वजवाहनरथनिरोपण । भारत समुद्रींचें घुसळण । करितां ग्रंथ अफाट. ॥ ११६ ॥ तितुका कवळोनियां अथू । बोलों कथेचा न खंडतां तंतू । जैसा बीमाजी वृक्ष समर्थ । विचक्षणीं जाणिजे. ॥ ११७ ॥ कीं भारतकथातेजोरोशी । वर्धता | पांथिका श्रोतियांसी । श्रम होवोनी निजमानसीं । श्रवणपंथा उबगती. ॥ ११८॥ तीव्र विस्तार मध्यान्हकाळ । टाळोनी, प्रार्थिला अपराह्नमेळ । कथा मार्ग कथित अचळ । वक्तियां श्रोतियां आनंदू. ॥ ११९ ॥ कीं भारतजान्हवी पुनीत सर्व। कथापूर डहुळ गौरव । निवळोनी कुप्या अपूर्व । रामनाथा भरिजे पैं. | ॥ १२० ॥ ना ते भारतरत्नकामधेनू । कथाक्षीर सुदोहा बनू । गाबाल अग्नी जाळुनी पूर्ण । उरे मग शुद्धत्वे. ॥ १२१ ॥ असो भोजन पॅड्स प्रकार। सैविल्या तृप्ती होय आदर । तेची सुधा प्राप्त जालिया ढेकर । नुगवे धारू मुखीं का ?]॥१२२॥ ना ते शर्करेची जाली प्राप्ती। किमर्थ उसाची करणे खंती है। कीं आम्रफळ चढल्या हातीं । केवीं मावणे चिबुडातें ? ॥ १२३ ॥ असो वेद । १. जमल्या, दाटल्या. २. अमावास्येच्या व पौर्णिमेच्या दिवशीं. ३. तापलेल्या सोन्याच्या ज्वाळांनीं शोभणारा. ४. येथे मूळांतील बाविसावा अध्याय संपतो. ५. भारतकथारूपी सूर्य ६. गंगेची कावड रामेश्वरावर घालण्याचा प्रघात आहे. ७. पडूस=मधुर, तिक्त, कषाय जाण । कट अम्ल आणि लवण। पडस बोलती विचक्षण। सूपशास्त्री जाणते॥' [मुक्तेश्वर-आदिपर्व अ, ३०...., ८. मोहणे, | ७ न० ०