पान:महाभारत.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० नरहरिकृत [द्रोणपर्व पांचाळचमू । ‘मारील' म्हणती, ‘राजसत्तमू' । विगत जाहला वीरश्रीभ्रम् । शैर्यसूर्य निमाला. ॥ ८९ ॥ जैसीं सूर्योदयीं विगती मंगणे । भ्रष्ट होवोनी लपविती मान । कीं झुंझबातें घनाचे ठाणे । पळते आपें ज्यापरी. ॥ ९० ॥ ना तें, गरुडपक्षाचे सुसाटें । तरुवर लागती बारा वाटे। की ‘हरी'गजराचेनी नेटें । पळती पापें ज्यापरी. ॥ ९१ ॥ तयापरी भ्रष्टसेना । धीर न धरवे कोण्हा। सुजयपांचाळधृष्टद्युम्ना । चेकितादि वार्धक्य. ॥ ९२ ॥ कैकय, मत्स्य विगत तेजें । सहित सेना धर्मराज । भूपती विक्रमी तेजःपुंज । भ्रष्ट जाहले सर्वही. ॥ ९३ ॥ जय लाधला गुरुवर्या । कौरव चालती पिटोनी बाह्या । जैसा दानवजयीं अमरवर्या । उत्साह तेवीं सर्वांतें. ॥ ९४ । वीर वीर त्रासिले शरीं । भय पावोनी निघाले दुरी । विगत मानसे आनपरी । गोता चक्षीं लक्षिती. ॥ ९५ ।। धृतराष्ट्र पावोनियां तोष । बोलता जाहला संजयास । ‘पांडववीर पावले त्रास । चोज नोहे; बाळका ! ॥ ९६ ॥ द्रोणाचार्य प्रतापसूर्य । केवीं साहती त्याचे वीर्य ? । भीमपुरुषार्थी भूपवर्य । खद्योतप्राय त्यां तेज. ॥ ९७ ॥ दुर्योधनाचे अनन्य हित । कळलें भंगिल्या नृपांच्या पंक्ती । सर्वास्त्रभेदी काळघाती । कोण जया पावेल ? ॥ ९८ ॥ असो आतां पांडवसेना । भ्रष्ट जालिया विचक्षणा ! । काय करिते आणा मना । उभय वीर संग्राम'. ॥ ९९ ॥ संजय म्हणे, ‘नरमंडणा! । विगत जालिया पांडवसेना । अत्यंत हर्ष दुर्योधना । अर्णवापरी हेलावे. ॥ १०० । वर्षाकाळी जळाची वृष्टी। नदी उसळते जैसी लोटीं । कीं गतपुत्राची होतां भेटी । आनंदाश्रूठेवणी. ॥ १०१ ।। ना ते, जारणीचे भाषणीं । सुखाची हाव स्पर्शे गगनीं । कीं वसंताची पावतां भरणी । द्वैमा टवटवी ज्यापरी. ॥ १०२ ॥ तैसा आनंद दुर्योधना । स्मितहास्य बोले कर्णा । म्हणे, ‘पाहें पां पांडवसेना । क्रंदमान पळताहे. ॥ १०३ ॥ द्रोणप्रतापाच्या शरीं । चकनाचूर जाहले. भय अंतरीं । पुन्हा युद्धा न येती समरीं । ऐसे माते दिसताहे. ॥ १०४ ॥ हांसोनी बोले रविनंदन । म्हणे, “तू राया ! विचक्षण । जाणता होसी, किमर्थ नेणे । पांडवांच्या पुरुषार्था ? ॥ १०५ ॥ जैसे काकशारीरकाचे शब्दध्वनी । विगत होय विशाळ फणी । कीं गजेंद्र झिरपिल्या जीवनीं । चाचपतां बुडिजे, १. नक्षत्रे. २. रक्षक, संरक्षण करणारा. ३. काजव्याप्रमाणे. ४. लोट=पाण्याचा लोंढा, पूर. ५. आशा. ६. झाडांस. ७. ओळखीत नाहीस. ८. कावळ्याचा देह धारण करणान्याच्या ओरड़ण्याने,