पान:महाभारत.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ अध्याय] महाभारत. ३९ रत्नाकर । क्षयालागीं युगांतीं. ॥ ७१ ॥ एकमेकां टाकोनी मागें । वीर धसले [वीर-] श्रीरंगें । धडकोनी द्रोणा महारागें । ताडिते जाहले शरांतें. ॥७२॥ नेतपर्वणी तीक्ष्ण भाळी। पांच अप शिखंडी मौळीं । क्षत्रधर्मा शर अतुर्बळी । वीस विंधी गुरुवर्या. ॥७३॥ वसुदामवीरें शरासन । कषोंनी विधिले पांच बाण। उत्तमौजा राजनंदन । तीन क्रोधं अर्पिले. ॥ ७४ ॥ क्षत्रदेव काळघाती । सात अर्पिले द्रोणाप्रती । सात्यकी वीर सेनापती । शत ताडी द्रोणाते. ॥ ७५ ।। युधामन्यु आठ शरीं । विंधी द्रोण प्रतापगिरी । बारा बाण निकरें समरीं । धर्मराजे विधिले. ॥ ७६ ।। धृष्टद्युम्न चावोनी अधर । ताडिले दश बाण, तीक्ष्ण शर। चेकितान भूप दर्वीकार । तीन विंधी गुरुवर्या. ॥ ७७ ॥ प्रतापरुद्र भारद्वाज । धीर शूर प्रभिन्न गज । तृणांकुरापरी इंषुबीज । मानोनी रोजें लोटला. ॥ ७८ ॥ कीटक मुंगी विषकांटा। भेद करी गजेंद्रललाटा। ना ते सूचिक→ गिरिकूटा । लोटतां भूमी ढासळे. ॥ ७९ ॥ कीं कुंदपुष्पाचा झेला । ताडितां रुद्र पावे झोला । ना तें गोधाविष तीव्र गरळा । पतंगेश्वरा बाधिजे, ॥ ८० ॥ तयापरी द्रोणाचार्य । शर न गणोनी लोटला शौर्य । बाण वर्षेनी अप्रमेय । वीरवीर खोंचले. ॥ ८१ ॥ काळविखारी बाणवारा। ताडुनी शिखंडी केला पुरा । रुधिरस्राव गलित धारा । धरादेवी अभिषेकू. ॥ ८२ ॥ उत्तमौजा पांचाळसुत । वीस बाणीं ताडिला त्वरित । गिरीखी खावोनी लावी हात । ध्वजयष्टिका तांतडी. ॥ ८३ ॥ वसुदाम वसुमतीमान । महाराज प्रतापवान । द्रोणे सोडुनी निर्वाण बाण । यमसदना धाडिला. ॥ ८४ ॥ क्षत्रधर्मी विक्रमी भूप । ऐशीं शरें भंगिला दर्प । सुदक्षिणभूविखारी सर्प । सदुसष्ट बाणीं ताडिला. ॥ ८५ ॥ क्षत्रदेव विंधोनी बाणीं । नीडोपासोनी पाडिला धरणी । युधामन्यु शौर्यतरणी । चौसष्टीं शरीं खोंचला. ॥८६॥ रुकैमरथी बिभ्राजकिरणी । युधिष्ठिर केला भ्रष्ट रणीं । कितवराज पांचाळ गुणी । धर्मसाह्या लोटला. ॥ ८७ ॥ तेणे करितां आडवारा । द्रोण कोपला चौगुणा पुरा । बाण सोडुनी राजकुमरा । सूताश्वसह मारिलें. ॥ ८८ ॥ किलकिलाट १. समुद्र. २. कमानदार, वक्र. ३. अधर (दांत) चावणें-हे रागाचे द्योतक चिन्ह आहे. ‘दशन चावणे' हा शब्दसमूह मुक्तेश्वराने आपल्या काव्यांत ठिकठिकाणीं योजिला आहे. [आदिपर्व-अध्याय ३१।६८; सभापर्व-अ० १४।२०८ पहा.] ४. सर्प. ५. बाणपरंपरा. ६. सुईच्या टोंकानें. ७. गुच्छ. ८. घोरपडीचे विष. ९. गरुडास. १०. शरसमूहाला. ११.चक्कर, फिरकी. १२. नीड्=रथांतील बसण्याची जागा.१३. सुवर्णरथी, १४. अटकाव, अड़थळा.