पान:महाभारत.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ नरहरिकृत [द्रोणपर्व करोनी वैरवाळा । बाणकोटी सोडिल्या. ॥ ५२ ॥ उभय सारथी, चाप, घोडे, ।। पृष्ठी सारथी, केतूची शिडे, । छेदुनी पाडिली जैसी झाडें । कुठारें वनीं तळातें. ॥ ५३॥ तयापरी त्यांची गती । करुनी बाण सजिला शिंतीं । आकर्ण वोढोनी सोडितां दीप्ती । धरेवरी न समाये. ॥ ५४ ॥ जाणों तक्षक उसळला क्षया । की कृतांत धांवला दीप्त काया । तैसा अर्धचंद्रबाण महाराया ! । सत्यजितकंठीं बैसला. ॥ ५५ ॥ उसळोनी शिरस भरले गगनीं । पुरोनी धांव, पिटिली धरणी । “आहा !' शब्द मुँतनावदनीं । पांडवदळी माजला. ।। ५६ ॥ क्रोधे वीर धडकले पुढां। शरांचा घातला वेढा। द्रोणाचार्य वेष्टुनी गाढा । शरांच्या पूरा वर्षती. ।। ५७ ।। गुरुवर्य प्रतापराशी । सर्वास्त्रभेदी संगरतोषी । मोकळोनी शर महारोषीं । विध्वंसिलें समस्तां ॥ ५८ ॥ जैसा तुळीं धडकतां अग्नी । करुनी टाकी त्याचा धैणी । कीं अभ्रपडळ वातगुणी । नाहींच करी सुसाटें. ॥ ५९ ॥ तयापरी त्रासितां वीरा । शतानीक धांविला सैरा। इषु वर्षांनी वज्रधारा । द्रोणाचार्या ताडिलें. ॥ ६० ।। हांसोनी गुरु निजकौतुकें । बाण सोडिला रोखें तीखें । कुडले शिर सँम्यक । खंडूनी धरे पाडिलें. ॥ ६१ ॥ ‘अहा ! कॅटकटा ! मत्स्यवीरा' । म्हणती, ‘मारिलें राजकुमरा.' । द्रोण शिरकोनी मत्स्यभारा । वीरां सकळां जिंकिलें. ॥ ६२ ।। चैद्य, कारुष्य, कैकयभूप, । पांचाळ, संजय, पंडुराष्ट्रा। विगत करुनी भग्नदर्प । घायें भयें त्रासिले. ॥ ६३ ।। जैसा दावाग्नी धडकतां वनीं । श्वापदपक्षियां थोर पळणी । कीं अकाळवृष्टी वायुकिरणी । मार्गस्थांतें आकांतू. ।। ६४ ।। तैसियापरी द्रोणाचार्य । चमूभ्रष्ट वीरवर्य । क्रोधे तपें ग्रीष्मींचा सूर्य । भयचकिता वाहिनी. ।। ६५ ।। गजाश्व मारिले अमित रणीं । पदातिया नव्हे गणनी । रिक्त वाहने फिरती कदनीं । पण्यांगनांसारिखीं. ॥ ६६ ॥ रूपरेखा लावण्यकीळा । फांके तारुयमद आगळा । राजपुत्ररथांचा मेळा । खंड धुळीं लोळत. ॥ ६७ ।। बंबाळ रुधिर सर्व गात्रीं । दाटली शवें पूर्ण धैात्री । रक्तप्रवाह भूमिपात्रीं । नदी सागरा लोटली. ॥ ६८ ॥ सरितासाहित्यकल्पना । वेदव्यासे रचिल्या नाना । क्षणक्षणां बोलतां वदना । त्रास श्रोते मानिती. ॥ ६९ ॥ क्रूर श्वापदपक्षिगण ।। भूतपिशाचे घातलें ठाण । रौद्र संग्राम अतिदारुण । भ्याडा भीड निघेना. ॥ ७० ॥ दुःसह मानोनी पांडववीर । उसळले क्रोधं वैश्वानर । जाणों लोटला १. हल्ला, धाड, घसरा. २. धनुष्याच्या दोरीवर. ३. पृतना=सेना. ४. कापसाचे ठायीं. ५. रोख, धुरोळा.६. अगदीं निखालस, निःशेष.७. हायहाय.८. वाटसरांस, प्रवाशांस. ९.धरित्री, पृथ्वी. १०. भयानक.