पान:महाभारत.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ अध्याय] महाभारत, ३७ धरणी । तैसे गजराज पडिले धरणी । एक दिशा लंघिल्या. ॥ ३४ ॥ अश्वललामें मोलीगळीं । छिन्नभिन्न पाडिली तळीं । वीरमौळे रुचिर कीळीं । हिणाविती नक्षत्रां. ॥ ३५ ॥ अधर प्रवाळ सुरेख भ्रकुटी । जाणों चढविल्या धनुष्यकोटी । रत्नकीळा फांकती मुगुटीं । केशभारें साजिरे. ॥३६॥ ऐसी शिरांची लाखोली । भूलिंगासि वाहिल्या सबळी । करचरण बाहु वेगळाली । वपुविरहित अशोभा. ॥ ३७॥ कनकपताका ध्वजमंडित । विचित्र भूषणे सुशोभित। शस्त्रे कवच प्रदीप्त कांत । शोभा धरा डळमळी. ॥ ३८ ॥ घोर संग्राम भयंकर । माजला, न सरे वीरश्रीभार । रक्तनदीचे तुंबळ पूर । सागराते लोटले. ॥ ३९॥ उभय चमूचे रणखंदळीं । द्रोणशरांची वृद्धी आगळी । धर्मराज लोटुनी दळीं । बाणजाळीं वर्षला. ॥ ४० ॥ द्रोणप्रतापाच्या लाटा । बाण रोधिल्या च्याही वाटा । धृष्टद्युम्न रोपें कैरंटा । मोकळिल्यो शरकोटी. ॥ ११ ॥ येरयेस अस्त्रप्रयोग । करुनी रुचिरें भेदिती अंग ।। शर शरांते आणिती व्यंग । हस्तलाघव करुनी. ॥ ४२ ॥ न्यूनाधिक पाहून नयनीं । सत्यजित लोटला धरणी । पंच बाण तक्षकमानी । द्रोणसारथ्या अर्पिले. ॥ ४३ ॥ दश विधिले योत्तमा । पृष्ठसारथी त्याची नेमा ।। ध्वज ताडुनी, घोरकर्मा । करुनी, धनु खंडिली. ॥ १४ ॥ भारद्वाज क्रोधानळीं । वमिता जाला विषंगुरळी । म्हणे, यांतें कृतांतस्थळीं । वोप्पं आतां । निर्धारें. ॥ ४५ ॥ प्रदीप्त द्रोण क्रोधावर्ती । अन्य चाप सज्जूनी निगुती ।। त्रिशत बाण काळघाती । कंकपत्री सोडिले. ।। ४६ ॥ पांचाळसुत वृकनामा ।। मारिला सत्यजितें भावें नेमा । शत शर सोडूनी अमित प्रेमा । बाणीं बाण खंडिले. ॥ ४७ ॥ तया मागे अति तांतडी । साहा शर अर्पिले द्रोणा प्रौढी । अद्भुत युद्ध लंवडसवडी । निकरें जाहलें दोघांते. ॥ ४८ ॥ एकत्र सत्यजित वृक । नाराच वर्षती महा तीखें । द्रोण क्षोभला अधिकाधिक । उल्का वमी विषाच्या. ॥ ४९ ॥ तीक्ष्ण शर सोडून कोपें । उभयतांचे छेदिलें चाप । सहित सूत अश्वमापें । आयुष्याची भंगिली. ॥ ५० ॥ अन्य चाप सज्जोनी रथीं । मोकळिल्या शरांच्या पंक्ती । छादिला गुरु जैसा गभस्ती । अभ्रजाळे प्रावृटीं. ॥ ५१ ।। द्रोणविद्येचा मैंगरगळा । हस्तलाघव कुशळकळा । कार्मुके १. घोड्यांचे साज, अलंकार. २. फार किंमतीचीं. ३. कुरटा=तांबड्या कोन्हांटीचे झाड. ४. विषाची चुळ (गुळणा).५. घाईने, गडबडीने. 'लवडीसवडी' हा शब्द मुक्तेश्वराच्या कवितेतही आढळतो. (आदिपर्व-अध्याय ३४।५१ पहा). ६. बाण. ७. तीक्ष्ण, प्रखर. ८. येथे कदाचित ‘आगरमळा' असा शुद्ध पाठ असेल,