पान:महाभारत.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ chu ३६ नरहरिकृत [द्रोणपर्व वीर । ठाईठाई गंभीर शूर । अग्री भीमसेन वैश्वानर । वेष्टित वीर स्फुलिंगीं. ॥ १५ ॥ समुद्रा उकावे अगस्ती । कीं शुभा देवी शक्ती । ना ते गजासुरा उमापती । थडके जैसा ज्यापरी. ॥ १६ ।। धर्मराज डहुळ चित्तें । बोलता जाहला पार्षदातें । द्रोण प्रतापी बळाद्भुतें । धरू माते इच्छितो.' ॥ १७ ॥ हांसोनी बोले धृष्टद्युम्न । म्हणे, ‘हें ऐकिजे अघटित कानें । गोगलगाईने शिंगत्राणे । खोचोनी मेरु पाडिला; ॥ १८ ॥ ना ते डोळे उडवूनी थडका । महादिग्गजतवका । कीं बाळकें हाणोनि मुष्टिधडका । शेषमौळा भंगिलें; ॥ १९ ॥ तरीच भारद्वाज तूतें राया ! । जिंकील ऐसे भावी हृदया। मी जिवंत असतां विजयी बाह्या । सामर्थ्य केंवी तयातें ?? ॥२०॥ हर्षयुक्त कुरुनंदन । पिटुनी भेरी लोटिलें सैन्य । उभयवीर वैरवाळुन । एकमेकां थडकले. ॥ २१ ।। पार्षदअश्व पारवेर्वर्णी । पारियापरी ढाळी किरणी । रथ लोटुनी, प्रतापतरणी । मोहरला द्रोणाते. ॥ २२ ॥ दुर्मुखें घालुनी आडवा रथ । बाणीं ताडितां पांचाळसुत । येरें निवारोनी शरघात । भ्रष्ट केला क्षणार्धे. ॥ २३ ॥ दुःसह मानोनी द्रोणाचार्य । क्रोधे धडकला प्रतापसूर्य । शर वर्षांनी अँप्रमेय । वीरें वीर खोंचला. ॥ २४ ॥ उभय चतुरंग वाहिनी । एकत्र जाहली, हाव दुणी । गजाश्वपती रथी घुणी । भरुनी वीर दाटले. ॥ २५ ॥ रथी वर्षती शरधारा । हस्तिप हाणे शस्त्र सैरा। गजगजांतें दंतभारा । एकएका धडकती. ॥ २६ ॥ अश्वारोह उसळोनी वेगें । शस्त्रे ताडिती वातवेगें । पदाति भिडूनी अंगें । विविध शस्त्रे हाणिती. ॥ २७ ॥ शस्त्रास्त्रमांदी सरतां पाहीं । वीर वीरा आसुडितां बाहीं । उंच नीच न गणती कांहीं । फावल्या वीरा ताडिती. ॥ २८ ॥ अंकुश स्पर्शानियां मू । गज दाटिले समरांगणीं ।। सारथी साट वारुवा गुणी । देवोनी धसती पुढारा. ॥ २९ ॥ वारणमुखींचे किंकाट । अश्वहिंसशब्द उद्भट । वीरांमुखींचे किलकिलाट । धडधडा रथाचे. ॥ ३० ॥ खणखणाट शस्रघाई । मागें न सरतीच कांहीं । झोडिती वीर फावल्या ठाई । घाई जर्जर जाहले. ॥ ३१ ॥ रथिया रथी विध्वंसिले । महावीर तळासी आले । रुधिरें सर्वांग डेवरिलें । किंशुकवृक्षासारिखें. ॥ ३२ ॥ मत्त मातंग पडिले मही । छिन गात्रे ३५ने तेही । एक खोडिती पाद पाहीं । गुंडाविरहित मैं एक. ॥ ३३ ॥ जैसे कुलिश वज्रपाणी । ताडूनि शैल पाडी १. उद्विग्न चित्तानें; डहुळ=गढूळ, २ समज. ३. लोटून, चालून जाऊन. ४. पारव्या रंगाचे. ५. मोहरा देता झाला, सामना करिता झाला. ६. अगणित, असंख्य ९. धुरोळ्याने. ८. चाबूक ९. माखले,