पान:महाभारत.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ ५ अध्याय] महाभारते. साते. ॥ १२२ ॥ तैशा अर्जुन शरांच्या धारा । वर्षतां न करी क्रोध परा। शर दाटले वसुंधरा । चालतां रथ थोकले. ॥ १२३ ॥ येरीकडे द्रोणाचार्य । व्यूह निर्मुनियां महावर्य । पातला तो कैथान्वय । पुढां सज्जनीं ऐकिजे. ॥१२४॥ श्रीगुरुभीमराजआदित्य । कृपारश्मी विकाशवंत । नरहरीमोरेश्वरसूर्यकांत ।। द्राव करी हरिगुणा. ॥ १२५ ।।। अध्याय पांचवा. संजय म्हणे, ‘धरारमणा ! । कुमुदिनीकांतवंशाभरणा ! । स्वधर्मसेतु ! दुरितदळणा! । शिक्षा करीं दुष्टांतें. ॥ १ ॥ संशप्तक दानवेंद्र । सह त्रिगर्त बळसमुद्र । फोडुनी पार्थ प्रतापरुद्र । नेते जाहले संग्रामा. ॥ २ ।। ‘सुपर्णव्यूह' द्रोणाचार्य । रचिता जाहला महावर्य । वीर वोपिले भागीं, भय । काळ मानी जयांचे. ॥ ३ ॥ अग्रीं गुरु प्रतापभानू । सहित भूपराजनंदनू । दक्षिणपक्षीं आदित्य अग्नू । कृतवर्मा दळेस. ॥ ४ ॥ वामपक्षी विंदानुविंद । वेष्टीतसे महा विशद । मध्यभागीं चौदंत द्विरद । तेंवी राजा कुरुवर्य. ॥ ५ ॥ पृष्ठभाग वीरनंदन । बंधुपुत्र भूपती प्रवीण । ज्याची दुःसह आंगवण । साहों न सके सुरेंद्र. ॥ ६ ॥ सेनागड विचित्र पौळी । रक्षणा वीर अतुर्बळी । काळा न धरवे ज्यांची फळी । भारती वीर प्रसिद्ध. ॥ ७ ॥ करकाक्ष, मत्स्य, भूपशर्मा, । सिंह, कलिंग, क्षेमवर्मा,। कैकेय, कांबोज, शकुनि मामा, । जयद्रथ, भगदत्त, ॥ ८ ॥ सुरसेन, दरभक्षक, । भूरिश्रवा, सोमदत्त, देख । सुदक्षिण, शल्य नृपनायक, । अंबिष्ठ, मागध, पौंड्रादी, ॥ ९॥ नैषधसंपती, यवननाथ, । भोज, भूमिजय, भीमरथ, । प्राची, पश्चिम, दक्षिण, उदित । भूमी भीमविक्रमी. ॥ १० ॥ यांहीं वेगळी अमित सेना । गजाश्वपती नव्हे गणना । विचित्र वाद्य गजेंनी नाना । पांडव चमू लोटले, ॥ ११ ॥ जैसा जलार्णवा कल्लोळ । उसळे क्षयालागीं सबळ । कीं शेषमुखींची ज्वाळमाळ । भेदूनी तळा लोटले. ॥ १२ ॥ ना तो प्रावृटींचा मेळा । बुजों धांवला वडवानळा । की महर्षीचा क्रोधऍकवळा । शापालागीं उसळला१३ ॥ दोणाचार्य तैसियापरी । येतां देखिला पांडववीरीं । धर्मराजें उत्साह गजरीं । ‘मंडळव्यूह' निमिला. ॥ १४ ॥ रक्षक बळी वोपिले | १. येथे मूळांतील एकुणिसावा अध्याय समाप्त झाला. २. कथेचा संदर्भ. ३. चंद्रवंशभूषणा ! ४. प्रताप, शक्ति. ५. उदीचीला, उत्तरेला, ६. भूतळाला किंवा पाताळाला. ७. रागाचा एकवटलेला आवेश.