पान:महाभारत.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* | ३४ नरहरिकृत [द्रोणपर्व मुखीं डळमळी अग्न । कोटीच्या कोटी सोडिले. ॥ १०५ ॥ आकाश भरलें तिहीं बाणीं । जाणों फुपाटे जैसा फणी । धडधडा वीर पडती धरणी । तुटोनी गात्र बीभत्स. ॥ १०६ । प्रभिन्न द्विप शैलसरी । खंडुनी पडती धरेवरी । अमूल्य अश्व वायूपरी । ढळतां घाई दुखंड. ॥ १०७ ॥ पदाति| वीर मंडित शस्त्रे । पडली जैसी गलित पत्रे । रथीं रथी विभ्राजछत्रे । तुटोनी तळा कोसळती. ॥ १०८ ॥ शराघव हस्तकळा । ध्वज छेदिले एकेची | वेळा । जाणों कुठारें पाडिलें ताळा । उभे धरूं न साधेची. ॥ १०९ ॥ चर्मकवचप्रताप धरणी । जाणों उगवल्या हिरेखाणी । शस्त्रे वस्त्रे भूषणे । किरणीं । धरादेवी शोभली. ॥ ११० ॥ दुःसह मानोनी संशप्तक । माया निर्मिल्या विविध देख । शस्त्रे वर्षती सहास तीख । रोपें पार्थ थडकला. ॥ १११ ।। गांडीव ओढोनी कानाडी । वायव्याख्न योजिले प्रौढी । मंत्रोच्चार सबीज कोडीं । जपोनी, तोपें सोडिला. ॥ ११२ ॥ कैडाडिला कृतांतपाडे । तेजा गगन जालें थोडे । प्रसवले शरांचे जुवाडे । जाणों विजा प्रळयच्या. ।। ११३ ।। तटतटां शिरें पडली तळीं । बाहु उसळती नभमंडळीं । कार्यपासोनी वेगळालीं । गात्रे खंड अपार. ॥ ११४ ॥ अश्वगजाची चाकोरी ।। भूमी रापल्या गजांच्या हारी । वीर विक्रमी काळसरी । प्रेतदशा आतले. ॥ ११५ ।। मही आकाश बाणमय । शवें व्यापिलीं, न पवे सोय ।। चतुरंग शवें खिचडीप्राय । एकमेकां संलग्न. ॥ ११६ ॥ मावलमालव त्रिगर्तवीर । वायुचक्री फिरती सैर । निवटोनी त्यांतें कृतांतघर । वस्तीलागीं वोपिलें. ॥ ११७ ॥ दैत्यगणांचे समुदाव । मारिले मर्दिले । न कळे ठाव । खळखळाट रुधिरस्राव । नदी सागरा लोटली. ॥ ११८ ॥ उठोनी कंबंध तये वेळीं । नाच लागली रणगोंधळीं । भूते चौंडकें टाळघोळीं । ब्रह्मराक्षस संबळे. ॥ ११९ ॥ श्वापद पक्षियांची सभा । दाटली घोर, पसरली जिभा । बाणमंडप घातला नभा । देवतापीठ कृतांतू. ॥१२०॥ असो; रणकर्कश धुमाळी । फाल्गुनसेना आणिली धुळी । जैसा पशुम्न पशूच्या मेळीं । करी खंदळी निघाते. ॥ १२१ ॥ कीं निर्दय काळ बाहुबलें। खंडी गजाचीं आयुष्यमुळे । ना तो खगेंद्र कोद्रवेयकुळे । भक्षितां न पवे त्रा १. पर्वतासारखे. २. ताडवृक्षास. ३. आकर्ण. ४. कौतुकानें. ५. दणाणला, कडकडाट उत्पन्न करिता झाला. ६. लोट, पेंडोळे, समुदाय. ७. चक्काचूर. ८.धड, मस्तकहीन शरीर. ९.चवंडके, गोंधळ्याचे तुणतुणे. १०. संवक्र=समेळ, गोंधळ्याची इल व धूम. ११. कंदळी, कदन, कत्तल, धुमाकूळ, १२. सर्पकुळे,