पान:महाभारत.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ ३ ४ अध्याय महाभारत. धरा !। चक्रपाणी! शार्ङ्गधरा ! । श्रीनिवासा ! कंबुधरा! । विश्वंभरा ! पाही पां. ॥८७॥ जैसीं मृगें मृगेंद्रपाठी । लागतां प्राणा केवीं भेटी ? । कीं मक्षिका धावोनी चपेटी । वन्हिरसा तृप्तता ? ॥ १८ ॥ तैसियापरी प्राणावधी । पुरतां, लोटले मातें युद्धीं। प्रेरिजे हये त्यांचिया मादी । पितॄगृहाते वोपीन. ॥ ८९॥ वन्हि दाहक स्वभावता । त्यासी वायु जाहला साह्यता । कीं फणींद्रविवरी आतौता । डवचील लया जाणता ?' ।। ९० ॥ ऐसियापरी श्रीकृष्णनाथे । सुसाट दिधले वारुवातें । उफाळले गगनपथे । मागें ग्रह सरकले. ॥ ९१ ॥ जेथे वीरांची निबिड मिठी। रथ जोडितां तयानिकटीं । वरवाळूनी चमूच्या कोटी । वेष्ट्रन पार्थ घेतला. ॥ ९२ ॥ जैसा ग्रामास कॅसाचा वेढा । कीं लंकेसी पॅरिख समुद्र गाढा । ना तो ध्रुवमंडळी गराडा । नक्षत्रांचा ज्यापरी. ॥ ९३ ॥ तैसा अर्जुन वेष्टिला सकळीं । ‘ध्या ध्या’ ‘मारा' एकची आरोळी । वर्षते जाले शरांची जाळीं । अनेक शस्त्रनिघाते. ॥ ९४ ॥ कृष्णसारथिसारथ्य राजा ! । त्रिजगा चळणा ज्याचिया तेजा । रथ फिरवी जैसिया विजा । लवोनी कोठे नाडले. ॥ ९५ ॥ गती विगती थरक सरक । चक्राकार भ्रमणादिक । लघुलाघव झप घोडके । पारियापरी डळमळी. ॥ ९६ ।। संशप्तक महाबळी । सहित वीर अतुर्बळी । बाणी छादिला किरीटमाळी । जेवीं हेळी धुळीनें. ॥ ९७ ॥ दशदिशा सुसाट बाण । जाणों वांडी लागली घनें । रथ बुजिला शरसंधाने । कृष्णार्जुन दिसेना. ॥९८।। वीरों वाहोनियां टाळी । वाद्ये ठोकिलीं हर्षमेळीं । दुंदुभी, दमामे, काहळा, घोळी ।ढोल, मृदंग, पणवादि. ॥९९॥ गजाश्व, रथी, पदातिवीर, । उसळोनी शस्त्री करिती मार । वीरमिठी निबिड घोर । किलकिलाट शब्दांचा. ॥ १०० ॥ स्मित हास्य करूनी चोज । बोलता जाहला अधोक्षज । म्हणे, काळसर्पे ग्रासितां भेज । कवळं धांवे मशका. ॥ १०१ ।। सिंहदंष्ट्रा शशक कोरी । भूते वेष्टिजे काळ समरीं । लोटोनी देवयानीचिया हारी । बुजों धांवती पावका. ॥ १०२ ॥ असो काळमहिमा उद्भट । पार्था! पुरुषार्थ करीं प्रगट । लोकत्रय कीर्तिवरिष्ठ । दावीं चो वीरांतें.' ॥ १०३ ॥ श्रीकृष्णमुखींची ऐकोनी गोष्टी । क्रोधारूढ प्रदीप्त किरीटी । भुकुटी घालोनियां गांठी । गांडीव मुष्टिके कर्षिलें. ॥ १०४ । नतपर्वणी तीक्ष्णबाण । सुवर्णपुंखी तीक्ष्ण पूर्ण । धारा १. पांचजन्य नामक शंखास धारण करणा-या. २. संरक्षण कर. ३. समुदाय. ४. यमाच्या घराला, ५. आंत. ६. कोटाचा, भितीचा. ७. खंदक. ८. आच्छादिला. ९. सूर्य. १०. जोराची दृष्टि. ११. बेडूक. १२. जोरदार, बलाढ्य. १३. कौतुक. ६ न० द्रो०