पान:महाभारत.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ नरहरिकृत (द्रोणपर्व सर्वांग शरीं भेदिले. ॥ ६८ ॥ रोपें प्रदीप्त पंच भ्रातर । चाप लावोनी तीक्ष्ण शर। बिंधिते जाहले प्रतापशूर । पार्टीलागी निघाते. ॥ ६९ ॥ शत शत दशबाण अधिक । एकेक ताडिते जाहले सतीख । फाल्गुने मानोनी त्यांचा हरिख । पांच पांच पांचा ताडिले. ॥ ७० ॥ यावरी आणिक बाराबारा । अर्पण केले राजेश्वरा । क्रोध नावरे सुभद्रावरा । सुधन्वा चक्षीं लक्षिला. ॥ ७१ ॥ बाण वोढोनी कानाडी । शर सोडुनी काळधाडी। [सुधन्व्यातें विंधूनी तांतडी] । सकुंडल शिर उडविलें. ॥ ७२ ।। पैरोनी अवधी, टिपितां धरा । जाणों भासे उतरला तारा । “हाहाकार घोर महावीरा । पादानुगां आकांतू. ॥ ७३ ॥ देवदत्त स्फुरिला पार्थे । नादें गगन जालें पुरतें । वहिनीं केलें मळमूत्राते ।। भयें परा सरकले. ।। ७४ ।। गांडीव तक्षकविखारी । शर उँल्बण गरळधारी।। त्रास पावोनी वीर समरीं । लंघिते जाहले दिशांतें. ॥ ७५ ॥ जैसा वणवा धडकतां वनीं । श्वापदां होय थोर पळणी । ना ते अशोकीं राक्षसश्रेणी । देखोनी रुंद्रा पळाले. ॥ ७६ ।। की दुरिताची पडतां मिठी । विवेक पळे बारा वाटीं । ना ते अवलक्ष्मी बैसतां पाठी । पळती संपत्ती दिशांतें. ॥ ७७ ॥ तयापरी वीरवाहिनी । भय पावोनी निघाल्या रणीं । त्रिगर्ते उभवोनी ऊर्ध्व पाणी । गर्जना करी घनरवें. ॥ ७८ ॥ म्हणे, “तुह्मी पूर्वी शपथा। करुनी, निघाला युद्धा असतां । मुख दावितां कौरवनाथा । केवी श्लाध्यता पॅरत्रीं ? ॥ ७९ ॥ ‘जन्मला प्राणी पावेल क्षय' । ऐसा श्रुतीचा निजनिश्चय । कीर्तीने प्राप्त लोकवर्य । अंकीर्ती निरया भोगिजे. ॥ ८० ।। पाहा पां पूर्वी वीरश्रेणी । देह वोपिले समरांगणीं । त्यांची पुराणे विश्वकर्णी । कुंडलें, पापा नाशती. ॥ ८१ ॥ ऐसी ऐकोनी राजवाणी । वीर परतले सहित श्रेणी । जैशा समुद्रलाटा माघारोनी । पुन्हा तीरा धडकती. ।। ।। ८२ ॥ कीं गज गजासिम ळतां देखा । सरोनी माघां देती थडका । ना तो वृकं फोडितां हाका । फिरोनी माचां सुसाटे. ॥ ८३ ॥ तयापरी सर्वही सेना । माघारली, लोटली रणा । संशप्तकगोपाळगणा । आवेश लोटे प्रतापे. ।। ८४ ॥ सिंहनाद वाद्यध्वनी । पिटोनी लोटले समरांगणीं । पार्थं विलोकूनियां नयनीं । बोलता जाहला हरीतें. ॥ ८५ ।। म्हणे ‘माधवा! शेषशयना ! । मौरजनका ! अंबुजानना ! ।। मानसमोहना ! मधुसूदना ! । मधुमुरुअंतका ! ॥ ८६ ॥ दानवारी ! गदा १. फार तीक्ष्ण. २. आकण, कानापर्यंत. ३. आयुष्याची मर्यादा सरून. ४. सेवकांमध्ये ५. सैन्याने. ६. तीक्ष्ण, ७. रावणाच्या अशोकवनांत. ८. मारुतीस. ९. परलोकी. १०. अपकीर्ति झाली तर. : १. लांडगा. १२. मनताता.