पान:महाभारत.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ अध्याय महाभारत. जगाची. ॥ ५० ॥ तैसा नव्हे फाल्गुनरथ । सर्वं गुणी अलंकृत । ज्यावरी बैसतां अजया मात । स्वप्नांतरीं दिसेना. ॥ ५१ ॥ कीं त्रिपुरदहनीं सदाशिवा। रथ नेमिला देवीप्रभवा । कृत प्रयोजनीं गुप्त ठेवा । अग्नीने पार्था अर्पिला. ॥ ५२ ॥ ऐसिया विजयरथीं पार्थे । धुरे सारथी इंदिराकांतू । रमा ऐश्वर्य त्यागोनी आतूं । पादसेवे विनटली. ॥ ५३ ॥ ज्यांचिया महिमेचिया राशी ।। न लभे अंत आनंदासी । सदैव ध्यान निजमानसीं । प्रेमें कपर्दी डुलतू. ॥५४॥ जो श्रुतिशास्त्रा अगोचर । मायानियंता सर्वेश्वर । ब्रह्मादिकां न कळे पार । तो सारथी पार्थाचा. ॥५५॥ तेथे जया काय वाणी ? । अष्टं ऐश्वर्यै जोडिती पाणी ।। हरि दाटितां रणांगणीं । वातवेगें उसळले. ॥ ५६ ॥ नेमिनार्दै भरले गगनीं । दिशा व्यापिल्या तेजकिरण । वीरां खळबळ अंतःकरणीं । भाविती अंत पुरला. ॥ ५७ ॥ त्रिगर्तराज उसळोनी दळीं । पुढां लोटला रणकल्लोळीं। जाली शरांची धुमाळी । गर्दी हेळी मिळाला. ॥ ५८ ॥ संशप्तक सात बंधू । महा प्रतापी वीरसिंधू । उसळोनी पुढां रणी विषदू । बुजोनी पार्थ काढिला. ॥ ५९॥ कौतुकें हास्य किरीटमाळी । करुनी गांडीव स्फुरिलें कीळीं । वर्षता जाहला बाणजाळी । जाणों द्वृष्टि हँस्ताची. ।। ६० ॥ धुळी धूसर अंबुकण । नाहींच करिती जैसे क्षणे । तैसे बुजोनी बाणीं बाण । वीर वीर ताडिले. ॥ ६१ ॥ जैसा व्याघ्र अविकाळीं । प्रवेशोनी त्यांची करी धुळी । तें अर्जुन तये काळीं । करी धुमाळी सैन्याची. ॥ ६२ ॥ न साहोनी त्रिगर्त रागें। पंचक लोटले अंगें । शर सोडूनी वातवेगें । पार्थालागीं ताडिलें. ॥ ६३ ॥ शरांमागें शरांच्या कोटी । सोडिते जाहले महानिटीं । बुजोनी काढिला कि रीटी-। सह जगजेठी श्रीकृष्ण. ॥ ६४ ॥ पॉर्डलिवृक्ष फुलित फुलीं । वरी भ्रमरांची फिरे हडळी । तैसा शोभला किरीटमाळी । अतुर्बळी [अ]दुष्टात्मा. ॥ ६५ ॥ सुबाहुवीर त्रिगर्तराज । त्रिषट् शर तेजःपुंज । ताडिता जाहला भीमानुज । महात्राणेकरूनी. ॥ ६६ ।। पार्थ प्रतापाचाहेळी । मुगुट उडविला बाणजाळीं । तळीं उतरता भासला कीळीं । जाणों शक्र रिचवला. ॥ ६७ ॥ हस्तापासोनी हस्तावा । छेदोनी धरे पाडिला बरवा । बाण वर्षेनी महाहवा । है १. पराजयाची गोष्ट. २. शंकर. ३. कमतरता, न्यून. ४. ज्ञान, प्रशा, कुळ, शीळ तप, लावण्य, संपत्ति व बळ-हीं अष्ट ऐश्वयें [मुक्तेश्वर-आदिपर्वं अध्याय २।२२ पहा]. ५. घोडे, ६. चक्रध्वनि, चाकाचे आवाज. ७. हस्तनक्षत्राचा पर्जन्य. ८. आच्छादून, झाकून टाकला. ९. मेंढ्यांच्या समुदायांत. १०. तांबडा लोध्र वृक्ष. ११. सूर्य. १२. मोठ्या युद्धांत.