पान:महाभारत.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० नरहरिकृत [द्रोणपर्व घेवोनी आज्ञा निघाले झणी । आल्हादयुक्त वीरश्रेणी । पिटोनी भेरी लोटिले. ॥ ३४ ॥ वीर दक्ष दक्षिणदिशा- पतीनें वोढिले काळपाशा । आक्रमोनी । राक्षसदिशा । मूळ अर्जुना धाडिलें. ॥ ३५ ॥ जैसा मृत्यु आलिया निकटीं । बुद्धि होवोनियां जाय खोटी । मूषक स्वगृह भावोनियां पोटीं । फणीबिळीं प्रवेशे. ॥ ३६॥ ना ते जिकडे व्याघ्रजाळी । तिकडे मृगें लोटती दंळीं । देखत देखत ज्वाळानळीं । घालिती उड्या पतंग, ॥ ३७॥ तयापरी फाल्गुनासी । निरोप धाडिला गेतायुषीं । ऐकोनी आश्चर्य मानसीं । “बरवें' म्हणे जैयस्वी. ॥ ३८ ॥ साशंक धर्म अंतःकरणीं । म्हणे, ‘हे गुरूची हो! करणी. पार्थे ऐकोनी शब्द कर्णी । बोलता जाहला धर्माते. ॥ ३९ ॥ म्हणे, ‘स्वामी ! किमर्थ चिंता ? । तुज यशस्वी कल्याणभरिता । विरंचिलिखित माझिया हस्ती । त्रिगर्त मृत्या पाविजे. ॥ ४० ॥ द्रोणपणाची आठवण । न करी वीर प्रतापघन । रणीं विन्मुख पाकशासन । तूंही जाणसी सामर्थ्य. ॥४१॥ ‘जिकडे धर्म, तिकडे हरि।जयाशा कैसी येईल हारी? । वारणवृंद लोटतां हारीं । हेरी हरी आतुडे? ॥ ४२ ॥ प्रळयमेघ खंडधारा । करीं वारितां विंजणवारा । बस्तसुतरुधिरघायवारा। अंजनीसुता बाधिजे ? ॥ ४३ ॥ तयापरी तयाची खंती । न की धार्मिका! धर्मवर्ती ! । त्रिगर्ताची जाहली शांती । मानीं मी उभा तुजपाशीं. ॥ ४४ ॥ संशप्तकाचा प्रतापू । देवा दुर्धर्ष महातापू । विगत केला पूर्वीच दर्दू । आतां बोपीन काळातं.' ॥ ४५ ॥ ऐसें वदोनी धर्मराजा । भेरी, निघाला जुझा । चतुरंगसेना पिटोनी भुजा । स्वल्प पृष्ठी निघाला. ॥ ४६ ॥ शोभायमान वेष्टित किरणीं । पश्चिम आक्रमी देव तरणी । तैसा पार्थ अतयकरणी । विजयरथीं लोटला. ॥ ४७ || ज्याचिया रथाची साम्यता । स्यंदन नाहीं पृथ्वीवरुता । पृथुरथभारें धरा हुँश्चिता । फिरतां सागर जन्मले. ॥ ४८ ॥ देवराज ऐश्वर्यनिधी । सहस्र वाजी स्यंदनसंधीं। हलक ल्लोळ प्रबळ युद्ध । अडचणी अडचण जाण पां. ॥ १९ ॥ रविरहंवर वा दुणा । परी एकचक्री अंगें उणा । बहु जुनाट काळगणना । करी गणना १. येमाने. २. बोलावणे, आमंत्रण. ३. समजून, मनात मानून. ४. दळकळप, सम. ५. गतायुषी जे त्रिगर्तराजे त्यांनीं. ६. जयशाली. जयस्वी' हा विलक्षण शब्द संस्कतांतील 'यशस्वी' शब्दाप्रमाणे नरहरीनें नवीनच तयार केलेला आहे. ७. ही ओवी लिहितांना कवीच्या मनांत ‘यतो धर्मस्ततो जयः' हे गीतावाक्य घोळत होते, असे वाटते. ८. हारीने, रांगेनें, जुळून, जुटीनें. ९. सिंह. १०. पराभवाला. ११. बस्त=बोकड, १२. दुःसाध्य, दुर्गम. १३. मोठ्या रथाच्या भाराने. १४. दुःखी, कष्टी.