पान:महाभारत.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ अध्याय महाभारत. २९ अटक तया । गुमान थोरी उतरीन. ॥ १५ ॥ समरांगणी विक्रमी त्यातें । जिंकीन किंवा तोही माते । विन्मुख परततां तुम्हांतें । मुख सर्वथा न दाबीं. ॥ १६ ॥ अनृत लोक, ब्रह्मघाती, । मद्यपी, गुरुदारारती, । ब्राह्मणद्रव्यें हरणीं प्रीती, । शरणागता अव्हेरू, ॥ १७ ॥ अग्निदाही, अनुपकारी, । विषदाई, आत्महत्यारी, । श्राद्धवारीं मैथुनकारी, क्लीब युद्धा चुकावे; ॥ १८ ॥ यया पापांचे प्राप्त लोक । परततां घडो आवश्यक । यया प्रतिज्ञेचा कलंक । लागतां, पितरां दुर्गती. ॥ १९ ॥ आह्मी बांधव पांच प्रौढी । पंचभूतांची पिठून नरडी । मेरूसी घालूनी आडी । उपडूनी टाकू सामथ्र्ये.' ॥ २० ॥ ऐसे बोलतां तयातें । संशप्तकां क्रोधभरितें । दाटोनी, म्हणती हे कृत्य । सिद्धी येऊं सर्वथा. ॥ २१ ॥ अर्जुने मागें विक्रम केला । त्यांचे उसणे फेडे यया काळा । हेत हृदयीं होता राहिला । मुक्त करूं प्रसंगे.' ॥ २२ ॥ गोपाळगण म्हणती, ‘राया ! । यदर्थी चिंता करणे बांया । याचिलें आम्हां जया कार्या। सिद्धी नेऊ सामथ्र्ये.' ॥ २३ ॥ हर्षयुक्त वीरवदन । विसर्जुनी सभा, केलें शयन । पूर्वे उगवतां रविकिरण । नित्य क्रिया सारली. ॥ २४ ॥ सिद्ध होवोनी उभय चमू । निघाले रणा त्यागोनी श्रमू । त्रिगर्तराज स्मरोनी नेसू । लोटता जाहला प्रतापें. ॥ २५ ॥ रुक्मस्पंदन विशाळ केतू । घंटा पताकी सुशोभितू । पंच भ्रातृ पंचादित्यू । शस्त्रे प्रभिन्न हस्ताग्रीं. ॥ २६ ॥ सत्यरथ आणि सत्यवर्मा । सत्यव्रत, सत्यकर्मा । महारोजें क्रोधगरिमा । भेदू भाविती अंबरा. ॥ २७ ॥ अयुत एकरथी प्रवीण । बाजी, वारण, पदाति घन । वीर। उत्साही वाद्य त्राणे । पिटोनी रणा निघाले. ॥ २८ ॥ मालव तुडेकिरातभूप । तीन अयुते वीरमाप । सेनेसहित प्रतापद्विप । तयापाठी निघाले. ॥ २९ ॥ मालव, कौलव, मद्रक, । ज्यांचा दुःसह वीर्यवक । तीस सहस्र रथी ठळक । सह सेना चालिले. ॥ ३० ॥ यांही वेगळे बळिष्ठ भूपती । अयुत एक प्रभिन्नशक्ती । युद्धा निघाले नेमवृत्ती । पितृगृहा व्रजावया. ॥ ३१ ॥ करोनी अग्निसमारोपण । देवपूजा आर्तमान । तीर्थप्रसाद, तुळसीपर्ण । कर्णयुग्म खोविली. ॥ ३२ ॥ यावत दर्शन स्वर्गभुवनीं । म्हणोनी भाळ स्पर्शले चरणीं । ब्राह्मण पूजोनी गंवादानीं, । वैसुवसना अर्पिलें. ॥ ३३ ॥ समस्तां करूनी पाठवणी । १. गुर्मी, प्रौढी. २. आत्महत्या करणारा. ३. चुकविणारा, टाळणारा. ४. आडी घालणे=दोन्ही पायांत धरून दाबणे. ५. मूळांत तुंडिकेर' असे नांव आहे. (अध्याय १७ श्लोक १८ पहा). ६. शौर्याचा आवेश (वेग). ७. स्मशाना. ८. अग्नीची स्थापना. ९. आवडीप्रमाणे. १०. गाईचे दानाने. ११. द्रव्य आणि वस्खें. ५ न० ब्रो