पान:महाभारत.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ नरहरिकृत [द्रोणपर्व सैन्य । विश्रामले विश्रामी. ॥ १६० ॥ प्रथम दिवसाचा वृत्तांत । जाला कथिला संकलित । पुढील कथेचा चरितार्थ । सज्जनी पान करावे. ॥ १६१ ॥ श्रीगुरुभीमराजजलधर। कृपास्चात्युदक वाकर्दळीभार । कर्पूरनरहरीमोरेश्वर । कथासुगंध अर्पितू. ॥ १६२ ॥ अध्याय चवथा. । व्यासकृपेचे नंदनवन । वक्तयांमाजी शिरोरत्न । चातुर्यसिंधु गुणनिधान । सृष्टी दृष्टी देखणा; ॥ १ ॥ तो संजय म्हणे, “पवित्र भूपा ! । त्रिशतकरवंशा (१) कुळदीपा ! । पुढील प्रसंग ऐक बापा ! । शतपुत्रांच्या निवाडे, ॥ २ ॥ वाहने लावोनी विश्रामा । द्रोण पातला राजधामा । सन्मानुनी द्विजसत्तमा । उत्तमासनीं पूजिलें. ॥ ३ ॥ भूपवृंद सभासदनीं । सहित आप्तबंधुश्रेणी । द्रोणाचार्य गौल्यता वणी । बोलता जाहला कुरूतें. ॥ ४ ॥ म्हणे, ‘दुर्योधना ! ऐश्वर्यनिधी! । आजी धर्म धरिला होता युद्धीं । परी फाल्गुन पातला तये संधी । काळचक्रासारिखा. ॥ ५ ॥ जैसी खगेंद्राची पडतां उड़ी। फणींद्रसेना देशधडी । ना ते अनंगाची पडतां धाडी । तपाच्या कोडी ढांसलती. ॥ ६ ॥ कीं तों भार्गवाचे येतां ठाणे । भूप लंधिती दिशांचीं रानें । ना तो सबळ क्रोध वर्ततां त्राणे । बुडे विवेकसमुद्रीं. ॥ ७ ॥ तयापरी वीर अर्जुन । भंगी सैन्य न लगतां क्षण । महाप्रतापी विक्रमी घंन । युद्ध सुरेशा । असाध्य. ॥ ८ ॥ म्यां तव तूते केला नेमू । नसतां पार्थ धरीन धर्मं । तो तंव पावला होता क्रमू । परी फाल्गुने भंगिला. ॥ ९ ॥ आतां तरी राजया ! समरीं । फोडुनी पार्थ नेइजे दुरी। वीरविक्रमें तुझ्या भारी । निर्वीरधरा मज वाटे. ॥१०॥ दोणमुखींची ऐकोनी वाणी । भूप खळबळे अंतःकरणीं । शौर्यसमुद्रा भरते देंणी । क्रोधलाटा उसळले. ॥११॥ जैसा सिंह उफाळोनी बाहे । फोडुनी रव उभा राहे । तैसा त्रिगत क्रोध न साहे । [गंभीरवाणी अनुवादे.] ॥ १२॥ जुझार जाहला जरी एडका । गजा परी सारील थडका ? । हेमंती शीताचा कडाका । बाधा बाधिजे रवीतें ? ॥ १३ ॥ वृश्चिकनांगी तीक्ष्ण विष । कुलिशधारा पावे नाश ? । की दर्दुराचा [श्रवुनी घोष] । दामिनी पळे माघारी ? ॥ १४ ॥ तयापरी न पवनी भयो । युद्धा करीन विजयी बाह्या । मत्पुरुषार्थ १. येथे मूळांतील सोळावा अध्याय संपतो. २. द्विजश्रेष्ठास (द्रोणाचार्यास). ३. श्रेणी=जमाव, तांडा. ४. माधुर्यंयुक्त वाणीने. ५. जोराने, आवेशानें. ६. अगाध, अलोट. ७. दुप्पट. ८. मारका, बाका टक्कर देणारा.