पान:महाभारत.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ अध्याय महाभारत, २७ जाहला अकस्मातू । वीरां उत्सवो, भयांचा वातू । निमोनी, हर्षे नाचती. ॥ १४७ ॥ जैसे शरपंजरीं कपी पडले । ते द्रोणाद्रिकीळे जिवंत जाहले। अब्धि मथितां विर्षे आहाळले । देखोनी सुधा टवटवी; ॥ १४८ ॥ कीं तो दिनमणी पूर्वे कळा । पसरतां, हर्षे पद्मिणी उज्ज्वळा । ना ते इंदुमंडळ देखतां डोळां । चातक तोषे ज्यापरी. ॥ १४९ ॥ तैसा उल्हास तये काळीं । होतां पावला किरीटॅमाळी । वीर मर्दिले बाणजाळीं । शवांच्या पौळी अपार. ॥ १५० ॥ रक्तनदीची खळखळाट । उसळोनी समुद्रा पुसे वाट । रौद्र रणाची सांगतां गोष्ट । अंगा शहारे येतसे. ॥ १५१ ॥ प्रभिन्नद्विप खंडमुंड । पडिले बीभत्स, ताडिती सोंड । हेम तुकितां मोल गाढ । अमित वारू विखुरले. ॥ १५२ ॥ कुंडलें मंडित रिसिसाळे । जाणों शोभती रातोपळे । वीरबाहुभूषणे कीलें । हिणावती ग्रहांतें. ॥ १५३ ॥ करुनी चमूचा गौरव । धडकला जेथे द्रोणराव । हस्तक्रिया लघुलाघव । बाणीं व्योमा आच्छादिले. ॥ १५४ ॥ दश दिशा व्यापिल्या शरीं । निबिड अंधार पडला समरीं । वीरसंज्ञा हरपली पुरी । कोण्ही कोण्हा धरीना. ॥ १५५ ॥ विगतपुरुषार्थ वीरमांदी । निघोनी गेली जंयाची बुद्धी । भूप निघाले मागिले पदीं । सांभाळोनी आपणा. ॥ १५६ ॥ पांडवचमू आल्हाद थोर । दुंदुभी पिटोनी गाजती तुरें। रथ स्वीकारोनी युधिष्ठिरें। चाप पाणी कर्षिलें. ॥ १५७ ॥ केतवदनीं रवी । पडिला । तो दानप्रवाहें मुक्त जाहला । की शक्तीनें लक्ष्मण ग्रासिला । उंगळिला वली मारुती. ॥ १५८ ॥ तयापरी अरिष्टशांती । विजयी जाहला सुभद्रापती । तंव अस्ता पावला गभस्ती । माघारला गुरुवर्य. ॥ १५९ ॥ धर्मराज हर्षवर्धन । आवरूनि युद्ध, आक्रमी सदन । शिबिरा पावोनी उभय त्यामुळे अग्नीस दुष्प्राप्य होते-यामुळे अग्नि अर्जुनास शरण गेला व अर्जुनाच्या साहाय्याने, इंद्र युद्धास आला असता, त्याचा प्रतीकार करून, ते वन पंधरा दिवस यथेच्छ भक्षण करून व्याधिनिर्मुक्त शाला-अशी कथा आहे. (मुक्तेश्वर-आदिपर्व-अ० ४९ पहा.) १. द्रोणगिरीच्या तेजाने. २. पोळले. ३. येथे ‘चकोर' असा पाठ असावयास पाहिजे. कारण चकोर व चंद्र यांचे कविसमयांत सख्य आहे, परंतु चातक व चंद्र यांचे नाहीं. तथापि हीच चूक मोरोपंतांनीही निदान दोन ठिकाणी तरी केली आहे. (१) नंद महाभाग जसा चातक चन्द्रा तसा जया सेवी । (हरिवंश १३।१), (२) टकमक पहात होते प्रभुमुखचंद्राकडेचि चातकसे. । (विराटपर्व ७९८). ४. किरीटी, अर्जुन. ५. थर, डीग, राशी. ६.शिर=सिसाळे=मस्तक. ७.जय मिळविण्याची उमेद. ८. केतू नामक ग्रहाच्या तोंडांत. ९. बाहेर काढला. १०. संजीवनी नांवाच्या वेलीच्या योगानें.