पान:महाभारत.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ नरहरिकृत [द्रोणपर्व तयापरी शरसंधान । वारुनी द्रण विधिला बाण । चतुरंग सेना खिळोनी घन । धरा शवें भरियेली. ॥ १३२ ॥ गुरुवर्य पेटला महामारीं । कोण्ही समोर नये समरीं । युगांतकाळ भाविला वीरीं । धर्म क्रोधे धडकला. ॥ १३३ ॥ सिंह चपेट करी वारणा । तैसे उसळोनी ताडिला बाणा । द्रोण प्रतापी वीरराणा । कुशळास्त्रप्रेरणीं. ॥ १३४ ॥ लघुलाघव नेतपर्वणी । तीक्ष्ण शर सोडुनी झणी । रैथांग भेदूनियां गुणी । नीड़ेभरणी पाडिले. ॥ १३५ ॥ धरा आततां युधिष्ठिरें । वीर लोटले महा निकरें । मार्ग रोधिला शरांच्या पूरें । सँजों कृतांत सँरेना. ॥ १३६ ॥ विराट, द्रुपद, कैकय, कृत,। सात्यकी, शिबी, व्याघ्रदत्त, । सिंहसेन आणि पांचाळसुत । वीर अनेक विधिती. ॥ १३७ ॥ सहस्रावधी शरसंधान । द्रोणाचार्या ताडिती बाण । येरें वारोनी सिंहसेन । सकुंडल शिर उडविलें. ॥ १३८ ॥ व्याघ्रदत्त व्याघ्रसरी । ताडुनी पाडिला धरेवरी । वीर सर्व त्रासिले समरीं । जे अजिंक्य काळाते. ॥ १३९॥ किलकिलाट तये समयीं । घोर माजला शब्द महीं । कौरव नाचती पिटोनी बाही । कार्य साधलें म्हणोनी. ॥ १४० ॥ वदती, द्रोणे सत्यपणू । केला, गवसिला कुरुनंदनू । विजयी जाहला प्रतापभानू । द्रोणाचार्य गुरुवर्य'. ॥ १४१ ॥ पांडवदळीं ‘हा! हा !'कारू । ‘मुंगीनें ग्रासिला' म्हणती ‘मेरू । कीं कुक्कटें शोषिला सागरू। अग्नि पतंगें प्राशिला; ॥ १४२ ॥ ना तो हिमालयासी उकाडा । सूर्य जाहला हिमा वैरपडा । वृकें धांवतां पसरूनी दाढा । काळ भयें पळाला,' ॥ १४३॥ ऐशा तर्काच्या उतरडी । उतरती चढविती नानाप्रौढी । द्रोणशरांची मिठी गाडी । जीवोदार सर्वही. ॥ १४४ ॥ तव आनकदुंदुर्भिजामात । सखा क्षीराब्धिसैताकांत । धनुर्धरांमाजी रणपंडित । जाणों भार्गव दुसरा. ॥१४५॥ काळखंज आँतुर्बळी । वधोनी, तोषला चंद्रमौळी । विजया बाह्या सर्वकाळीं । आरोग्य अग्नि ज्यासंगे; ॥ १४६ ॥ तो गांडीवधन्वा विजयरथू । देखतां, १. हत्तीस. २. बांकदार. ३. चाक. ४. रथाच्या गाभा-यांत. ५. स्पर्शतां. ६. (त्या बाणांच्या जुवाडांत) घुसण्याला प्रत्यक्ष काळही पुढे पाऊल घेईना. ७. बफत गुरफटलेला, बर्फत सांपडलेला. ८. वसुदेवाचा जामात (अर्जुन). ९. लक्ष्मीकांत (कृष्ण). १०. बलाढ्य. ११. श्वेतकी नामक एका प्रख्यात राजाने असंख्य यज्ञ केले. ह्या यज्ञात अनेक वर्षे घृतधारा सेवन केल्यामुळे अग्नीस जाड्य आले व तो अगदीं निस्तेज झाला. व्याधिनिर्मुक्त होण्यास काय उपाय करावा, हे विचारण्यासाठीं अग्नि ब्रह्मदेवाकडे गेला, तेव्हां ब्रह्मदेवानें “खांडव वन भक्षण करून अग्नीने आपलें जाड्य निरस्त करावे' असा उपाय सांगितला. पण तें वन इंद्ररक्षित अस