पान:महाभारत.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ अध्याय] महाभारत. २५ पिच्छबाणी । थरकसरक फेरे गगनीं । घायें घाव टाळोनी झणी । येरयेरा ताडिती. ॥ ११४ ॥ सर्वांग जाहलें रुधिरमय । न कंपत ताडिती, वांछिती जय । जयातें जैसी पडती सोय । निकरें गदा हाणिती. ॥ ११५ ॥ तव येउनी पडती मही । पुन्हा झगटती शौर्ये पाहीं । फूत्कारिती जैसे अही । टाकिती उल्का विषाच्या. ॥ ११६ ॥ तरुण वृषभांची जुझारी । एकमेकां सारिती खुरीं । सर्वोग क्षते पूर्ण रुधिरीं । परी न सरती ज्यापरी. ॥ ११७ ॥ भीमसेन प्रतापराशी । गदा वोपिली भूपशीसीं । चांचरी येउनी, घरेसी । स्पर्शता जाहला महींद्र. ॥ ११८ ॥ रोपें द्रोण वाँहोनी मेढा । रणांगणीं लोटला पुढा। बाणी शिरांचा जाला सडा। रांगोळ्या शवें अपार. ॥ ११९ ॥ उठावले पांडवभार । क्रोधार्णवा भरतें सैर । शरलाटा उसळती क्रूर । भंगावया द्रोणाते. ॥ १२० ॥ इंद्रसमरी बळीपाठीं । निबिड दानवांची जैशी मिठी । की राघवयुद्ध रावणनिकटीं । राक्षसीटी अपार. ॥ १२१ ॥ तैसियापरी द्रोणामागें । मिनलीं वीरांचीं मुँहादांगें । जैसे अधर्मस अँधे । पाठीलाग न सोडी. ॥ १२२ ॥ असो; द्रोण क्रोधानळीं । थडकोनी वर्षे बाणजाळीं । वीर वीर आणिले तळीं । रोष धर्मा नावरे. ॥ १२३ ॥ रथ लोटूनी सेनेसहित । अर्पिले बाण गुरूतें शत । येरू न कंपत हर्षयुक्त । खंडी धनुष्य हातींचे. ॥ १२४ ॥ चक्ररक्षक राजनंदनीं । द्रोणाचार्य पूजिला बाणीं । गुरुवर्य प्रतापाचा तरणी । विगत केलें तयांतें. ॥ १२५ ॥ सेना भ्रष्ट विगतदशा ।। पाहोनी वीर लोटले तोषा । बाणजाळीं भरल्या दिशा । मार्ग मार्गणा दिसेना. ॥ १२६ ॥ एकेची वेळी सर्वही वीर । द्रोणाचार्या करिती प्रहार । सूर्यगणित शिखंडीवीर । अप बाण द्रोणाते. ॥ १२७ ॥ दशग्रीवनेत्रांच्या गणना ।। उत्तमौजा ताडी प्रभिन्न बाणां । इद्रियद्विगुणशिववदना । नकुळे शरा विंधिलें. ॥ १२८ ॥ ॐ षिसंख्या सहदेव वीर । अर्पिता जाहला बाण घोर । स्वामिभुजांचे द्विगुण शर । धर्मराजे विधिले. ॥ १२९ ॥ द्रौपदीनंदन सिंह तरुण । गुणसंख्या अर्पिले बाण । सायकी वीर हुताशन । नक्षत्रगणना समर्प. ॥ १३० ॥ मत्स्यराज शंकरभुजा-। गणित वोपी बाण वोजा । जैसा अशनी न गणी विजा-। वृष्टी करितां सामथ्ये. ॥ १३१ ॥ १. ससाण्यासारखी. २. सर्प. ३. धनुष्याची दोरी ताणून. ४. स्वैर, यथेच्छ. ५. गर्दी ६. मोठीं अरण्यें. दांग=वन, अरण्य. ७. पापें.८.बाणास. ९. बारा. १०. वीस. ११. १०४२४५= शंभर. १२. सात. १३. कार्तिकस्वामीच्या हातांच्या दुप्पट, चोवीस. १४. सहा. १५. सत्तावीस. १६. दहा किंवा अठरा. ४ न० द्रो०