पान:महाभारत.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ नरहरिकृत [द्रोणपर्व ॥ ९५ ॥ नखाग्रघात खङ्गधारा । ताडुनी सारथी केला पुरा । पुढां शिरकोनी राजेश्वरा! । भूप केश कवळिला. ॥९६॥ अंतकदूत मृत्युकाळीं । शिखा कवळोनी आसुडी बळी । कीं कंसचूडा वनमाळी । धरुनी पाडी तळाते. । ॥ ९७ ॥ तयापरी वीरगुंठी । धरूनी आफळी भूतळवटीं । प्राणपंचकीं उठाउठी । पितृगृह वरियेलें. ॥ ९८ ॥ ‘अहा' कार कौरवमेळीं । दुःसह मानिले वीरीं सकळीं । सँधवराज उसळोनी दुळीं । बाणजाळीं वर्षला. ॥ ९९ ॥ अभिमन्युवीर तेजिष्ठ हिरा । शर खंडुनी खङ्गधारा । अश्वसारथी धांवोनी त्वरा । कृतांतघरा धाडिलें. ॥ १०० ॥ जयद्रथे टाकोनी उडी । चर्म खङ्ग कर्षिले प्रौढी । धांवतां रोषं बहु तांतडी । सौभद्र त्याते थडकला. ॥ १०१ ॥ येरयेरां ताडिती घाव । गती विगती लघुलाघव । थरकसरक विद्याविभव । चोजकर सुरांतें. ॥ १०२ ॥ अर्जुनासमान आर्जुनी । टाळोनी घाव घातला मूर्धी । चांचरी जातां सांभाळुनी । सौभद्रातें ताडिलें. ॥ १०३ ॥ शरभ शरभांची कैव । कीं गंडभैरवा गंडभैरव । ना ते मृगेंद्र मृगेंद्रा हँव । चपेट तेवी दोघांते. ।। १०४ ॥ रणरंगधीर पार्थसुत । खङ्गचर्म केला भस्मीभूत । क्रोधे प्रदीप्त जयद्रथ । शैक्ती रोपें टाकिली. ॥ १०५ ।। जाणों कृतांताची भगिनी । की ते खगेंद्रअरीची जननी । तेजें दिशा डेवरिल्या गुणीं । लक्षिली ची . भद्रे. ॥ १०६ ॥ ताडुनी शस्त्र दोहींकडे । करुनी टाकिले भूमी गाढे। जा खगेंद्रपाणी फडे । खंडतां मही उतरले. ॥ १०७ ॥ ‘भला भला' ही , स्तबोनी लोटली वीरेदी । विराट, द्रौपद गजस्कंदी, । भीमसेन, सात्यकी. ॥ १०८ ॥ धृष्टकेतु, शिखंडी, युधिष्ठिर, । कैकय, पार्षद, माद्रीकमर, दौपदीनंदन, भैमी, वीर । सहस्रशा लोटले. ॥ १०९ ॥ कौरववीरांची महादाटी । भीमसेना आवेशकोटी । गदा वाहोनी मुष्टी । वीरांमाजी शिरकला. ॥ ११० । प्रतिबिंब न साहे केसरी ॥ कीं स्वजाती गजा गज वैरी । ना ते द्विजे द्विजांची थोरी । साहों न सकती ज्यापरी; ॥ १११ ॥ तैसा भी माचा उत्कर्ष । न साहोनी करून रोष । गदा पडताळोनी नरेश । . राजा धावला. ॥ ११२ ॥ गिरिवज्राची थडक । तैसे आदळले एकमेक घाव घालिती त्राणे अचूक । यमसदना न्यावया. ॥ ११३ ॥ गदा मंडळे उड़े १. वीराची शेंडी. (गुंठी–बुचडा.) २. ढाल, ३. अभिमन्यु. ४. घेरी, चक्कर. ५. पक डावपेंच. ६. सिंहासिंहाची लढाई. ७. अलविशेष.८. सर्पाची आई. ९. झांकल्या. १०.वीरसमस ११. इ. स. १७८० च्या सुमारास आपल्या समाजांत व राज्यांत किती फाटाफूट झाली होती हूँ ह्या दृष्टांतावरून सुस्पष्ट होते.