पान:महाभारत.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ अध्याय महाभारत, ३ अही । तेवीं बक्षीं रिघाले. ॥ ७६ ।। सेनापती पाचाळराज । लोटला सुशर्मराजबीज । शर वर्षांनी तेज:पुंज । पांचाळसिंहें ताडिला. ॥ ७७ ॥ येरू प्रज्वळोनी क्रोधराशी । तोमर ताडिला जानुदेशीं । जैसी डळमळी पादपासी । नागधडक बैसतां. ॥ ७८ ॥ वैकर्तन विक्रमी कर्ण । महाप्रतापी जैसा अन्न । पुढारतां मत्स्य पांचाळ जाण । तैगटते जाहले निघाता. ॥ ७९ ॥ अद्भुत युद्ध तये काळीं । तीव्र माजली रणधुमाळी । कर्ण प्रतापाचा हेळी । आच्छादिले तयाते. ॥ ८० ॥ शिखंडीवीर शिखंडीत्राणें । उसळतां भगदत्त रोषं पूर्ण । आडवोनी विधिले बाण । काळदंडासारिखे. ॥ ८१ ॥ येरे हांसोनी शरवृष्टी । स्पंदन भंगिला उठाउठी। अगदत्तराज जगजेठी । भंगिता जाहला तयाते. ॥ ८२ । घटोत्कच राक्षसेंद्र । त्यातें अलंबु थडके रुद्र । उभयतां वीर बळसमुद्र । मायामयी पुरुषार्थी. ॥ ८३ ।। गजेंद्रनक्राची धुमाळी । पूर्वी जाली जैसी जळीं । आश्चर्य वीर उभयतां दळीं । चोज मानिती मानसे. ॥ ८४ ॥ लक्ष्मण क्षेत्रदेव । युद्धा मिनले लघुलाघव । जैसे हिरण्यकश्यप रमाधव । पूर्वी युद्धा मिनले. ॥ ८५ ॥ राजनंदन पौरव नामा । पुढारतां अग्निप्रतिमा । सौभद्रवीर प्रतापगरिमा । लोटुनी शरा वर्षला. ॥ ८६ ॥ येरें वाहोनी चाप प्रौढी । बाण सोडिले अग्निधाडी । सौभद्रसंधाने देशधडी । करुनी क्षणे टाकिलें. ॥ ८७ ॥ अभिमन्युवीर क्रोधानळीं । तीक्ष्ण वर्षांनी बाणजाळीं । ध्वजच्छत्रचाप पाडिलें तळीं । वृक्षशाखेसारिखें. ॥ ८८ ॥ क्रोधे प्रदीप्त अग्निशिखा । तैशा पौरख सांडी उल्का । सप्त नाराच रुक्मरेखा । सूताश्वबळे ताडिले. ॥ ८९ ॥ पावक क्षोभे शिपितां घृत । की सिंह सुसाटे लागतां क्षत । ना तो फणिवर लागतां हस्त । ग्राहकही प्राणाचा; ॥ ९० ॥ तैसा सौभद्र क्रोधवर्धन । बाण सजला धनुष्य घन । धारामुखीं डळमळी अग्न । स्फुलिंगकण विखुरले. ॥ ९१ ॥ जाणों शमने प्रेरिला दूतू । तैसा उठिला सुसाट वात् । वीर दचकले संग्रामधूर्त । निवारूं भूप विसरला. ॥ ९२ ॥ कृतवर्मा कुशळहस्ती । बाणद्वय सोडूनी निगुती । भंगोनी शरकोदंड क्षिति । खंडूनी धरे पाडिला. ॥ ९३ ॥ चापच्युत अभिमन्युवीर । क्रोधे पेटला वैश्वानर । वोठूनी खङ्ग पुसोनी धार । टाकोनी उडी धांवला. ॥ ९४ ॥ जैसा केसरी वारणावरी। चपेट करी क्रोधलहरी । तैसा सौभद्र उडूनी शिरीं । रथाधुरी बैसला. १. झाडास. २. हत्तीची थडक. ३. भिडते. ४ सूर्य. ५. मोराप्रमाणे डौलाने व त्वेषानें. ६. धुडगूस, दांडगाई. ७. क्षत्रदेव हा शिखंडीचा मुलगा. ह्यास दुयोधनपुत्र लक्ष्मण यानें मारिले. ८. बाण, ९, यमानें.