पान:महाभारत.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ अध्याय] महाभारत, २१ द्रोणाचार्या । सहसा युद्ध न करीं, राया !। प्राणांतीही न मारीं तया । पांडु, तू , तेवीं मज द्रोण. ॥ ३९ ॥ ईश्वर गुरु द्विध व्यक्ती । नाहीं नाहीं, अवनीपती!। द्रौणीहून लालनप्रीती । करूनी विद्या अर्पिल्या. ॥ ४० ॥ माझिया विक्रमें तोष त्यातें । आनंदसमुद्र पावे भरते । नयन झांकी देखोनी माते । दृष्टी लागेल म्हणोनी. ।। ४१ ॥ त्यातें करितां आन बुद्धी । केवीं पुढारे पाय संधी ? । जैसा भ्रमर स्नेहवादी । मरोनी पद्मा संरक्षी. ॥४२॥ ना ते पक्षिणी आत्मज बाळां । रक्षितां वश्य पारध्या काळा । कीं दुग्ध स्पर्शितां अग्निज्वाळा । जळोनी पाणी त्या रक्षी. ॥ ४३ ॥ तैसिया परी धर्मराया! । अधर्म न शिवे माझी काया । परी जयश्री तुझिया बाह्या । कृष्णाश्रये निश्चय.' ॥ ४४ ॥ पार्थमुखघनगर्जना । भूपमयूर नाचती रणा । वाद्य, किंकाट, घोष, गर्जना, । करूनी युद्धी लोटले. ॥ ४५ ॥ पर्वत पर्वतां आदळती । कीं सागर सागरां फुपाटती । ना ते सिंह केसरी झेपावती । तेवीं युद्धा तंगटले. ॥ ४६॥ पदाति वीर पदातिया । अश्वारूढ अश्वारिया । हस्तिंपा हस्तीप ताडिती राया ! । रथी रथिया निघाते. ॥ ४७ ॥ द्रोणे रक्षिली न भंगे चमू । तैसाच फाल्गुन न पवे श्रमू । कर्ण पुरुषार्थ महाभीम् । रमूर्धी लोटला. ॥ ४८ ॥ शर वर्षांनी तीक्ष्णधारी। बुजोनी सेना काढिली समरीं । द्रोणाचार्य प्रतापगिरी । सेनाअग्नीं शिरकला. ॥ ४९ ॥ प्रळयघनाची तीव्र वृष्टी । तैशा मोकलिल्या बाणकोटी । दुःसह मानोनी जगजेठी । धृष्टद्युम्न थडकला. ॥ ५० ॥ येरये संघट्टणी । बाणी भरली पूर्ण अवनी । आहाळोनियां वासरमणी । पडों पाहे तळाते. ॥ ५१ ॥ क्रोधारूढ द्रोणाचार्य । जाणों ग्रीष्मींचा दीप्त सूर्य । ना तो वसंती वणवावर्य। जाळी तृणा ज्यापरी. ॥५२॥ क्रोधं प्रदीप्त अनळ । शरौघमाळा स्फुलिंगमाळ । [वीरगिरींचे कराया शकळ] । वज्रापरी उसळती. ॥ ५३ ॥ भयचकित पांडवसेना । निरुत्साह अँर्दितमना । चाप चिकीर्षे पुनःपुनः । काळमेघासारिखें. ॥ ५४ ॥ पदाति, वाजि, वारण, रथी, । खिळोनी बाण, पाडिले क्षिती । जाणों शिळापृष्ठीं प्रेतापक्षिति । तेवीं वृष्टी शरांची. ॥ ५५ ॥ अमित वीर तया तळा । क्षया आले नृपशार्दूळा ! । धडमुंडांकित धराबाळा । जाणों शौरदी शोभली. ॥ ५६ ।। युगांतकाळीं भूतक्षय । करी तैसा द्रोणाचार्य । रक्तप्रवाहनदीवर्य । खळखळाट लोटली. ॥ ५७ ॥ अंमषवेग उसळे जळ । १. दोन निरनिराळ्या मूर्ती. २. अश्वत्थाम्यापेक्षा ज्यास्त. ३. लढण्याच्या प्रसंगी, आणीबाणीच्या वेळीं. ४. भिडले. ५. माहुतास. ६. रणांगणाच्या अघाडीस. ७. भाजून, पोळून, ८. त्रस्तचित्ता, ९. प्रचंड किरणांचा वधाव. १० ८. त्रस्तनि । राट किरणांचा वर्षाव. १०. पार्वती, दुर्गादेवी, ११, रागाचा आवेश,