पान:महाभारत.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत (द्रोण पाहोनी दृष्टी । केसरी मानी दरारा ? ॥ २१ ।। विपरीत हेही घडे राया। पार्थजिंकणीं आशा वायां । शब्द गुंतला तुझिया कार्या । नसतां जिष्णु, सिद्धत ॥ २२ ॥ वीरमंडळी विक्रमी घन । वेगळा फोडिजे श्वेतवाहन । धरून देई कुरुनंदन । निश्चयेंसी नरेंद्रा ! ॥ २३ ॥ गुरुमुखींची ऐकतां गोष्टी । दुर्योधन आल्हादकोटी । सेना सज्ज कडकडाटी । संग्रामाते लोटले. ॥ २४ ॥ द्रोण भिषेकसर्वचरित । दूतीं धर्मासीं केलें श्रुत । साशंक अंतरीं बांधवातें । ब लता जाहला; नरेंद्रा ! ॥ २५ ॥ म्हणे, ‘भारद्वाज सेनापती । जाहला, भार अवघड चित्तीं । त्यांचिया विक्रमा स्थिति क्षिती । सर्वास्त्रभेदी जाणपां. ॥ २६॥ भार्गवविद्येची मांदुस । उघडतां, प्राप्त सर्व त्रास; । कैसा करील रमाधीश? । ६ सर्वथा नेणवे'. ॥ २७ ।। अर्जुन म्हणे, ‘गुणसंपन्ना ! । कासया खेद कारसा मना ? । शैलं उफाळतां रणकंदना । कुलिश मानी भयातें ? ॥ २८ ॥ नवरत्नकळा प्रदीप्त कांती। आहाळोनी सूर्य पडे क्षिती ? । वडवानळ दुःसहशक्ती । समुद्र होय कोरडा ? ॥ २९ ॥ प्रचंड वाते वाडेंकोडें । उन्मळोनी मेरु घर पडे । हलाहल विष प्राशितां गाढे । शंका शंकर पाविजे ? ॥ ३० ॥ तैसियापरी महाराया ! । किमर्थ चिंता करिसी वांया; । मत्पुरुषार्थ, विक्रमी बाह्या । जाणोनी नेणें कां होसीः ॥ ३१ ॥ हेंही असो; त्रिभुवनप्रभू । विजयश्रीचा सोलींव स्तंभू । विराटतरूचा कोमळ कोंभू । मायारंभ जेथूनी; ॥ ३२ ।। आनंदाचे आनंदवन । विक्रमाचे ठेवणे पूर्ण । ऐश्वर्याचे शोभायतन । जनार्दन विश्वात्मा; ॥ ३३ ॥ स्वयंभु, शंभु, आराध्य मूर्ती । निगमागमा नये व्यक्ती । सहस्रमुखें वर्णितां कीर्ती । अंत अनंता असाध्य; ॥ ३४ ॥ ऋषिमुनि देव मंववा । विनीत पद भोगिती विभवा । तो रमाधव सारथी देव ! । रक्षक रथ माझिया ॥३५॥ असतां, कायसी जया वाणी ? । किमर्थ चिंता अंतःकरण है। मज वेगळे फोडितां कदनीं । पर्याप्त भीम द्रोणौतें. ॥ ३६॥ सात्यकीप्रताप बृहद्भानू । अभिमन्यू नुरी वीरांचे भानू । ज्यांचिया विक्रमा तेजिष्ठ भानू ।। साम्य नये; नरेंद्रा ! ।। ३७ ॥ माद्रीसुतादि बळिष्ठ भूप । देखोनी काळ पाव ताप । धृष्टद्युम्न क्षेयाग्निरोप । द्रोणनिधना प्रदीप्त. ॥ ३८ ॥ मी तव निकरे १. द्रोण. २. मर्यादा, प्रतिष्ठा.३. पेटी. मागे अ० १, ओं० १४४, पहा. ४. पर्वत. ५.इंद्राचा वज्र. ६. पोळून, भाजून. ७. बाहु, भुजदंड. ८. अज्ञान, ९.शेषाला. १०. इंद्र. ११. धर्मराज १२. कमतरता, न्यन. १३. भीम द्रोणाला परे पडेसा आहे. १४. भान, बुद्धि किंवा " १५, प्रलयाच्चीचे रोप (=बालस्वरूप).