पान:महाभारत.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ अध्याय मैहाभारत, १९ काठी । करूं धूर्जटी शंके पां. ।। ५ ।। सुरां अशनिपाणी । जळचरांतें समुद्रगुणी । भूतां सकळां चक्रपाणी । वनस्पतीतें चंद्रमा; ।। ६ ।। कर्मासी आश्रय वेद एक । दृष्टीतें तेज प्रदीप्त अर्क । सर्वसंपत्ती त्रिपुरांतक । तेवीं तूं आम्हां जाण पां.' ॥ ७ ॥ राजमुखींची ऐकोनी गोष्टी । हर्षानंदे भरली सृष्टी । प्रस न्नता मुखसंपुटीं । सुधारवें अनुवादे. ॥ ८ ॥ म्हणे, ‘राजया ! इच्छित अर्थे । | सांगसी ते पुरवीन आएँ । देवां अटक मनोरथू । पूर्ण करीन सांग पां.' ॥९॥ हर्ष पावोनी दुर्योधन । भाळीं स्पर्शले उभय चरण । म्हणे, ‘स्वामिया ! प्रतापवान । धरूनी धर्म मज देई. ॥ १० ॥ विधंड न होतां रणी काया । प्रतापें जिणोनी देई बाह्या.'। द्रोएँ भावी, सदयता राया । वीरक्षयाची पातली. ॥ ११ ॥ मनीं बरवी धरिली बुद्धी । सख्य करूं पावे ते संधी । गुरु म्हणे, ‘ऐश्वर्यनिधी! । कारण मातें निवेदी.' ॥ १२ ॥ राजा वदे प्रसन्न चित्ते । ‘पुन रपि चूत खेळोनी त्यांतें । वना धाडूनियां निरुतें । अकंटक राज्य अनुभवू. | ॥ १३ ॥ द्रोणे ऐकोनी त्याची वाणी । महा अकल्याण मानिले मनीं । ‘सुधा पाजितां उंबगोनी । इच्छा इच्छी कांजीतें. ॥ १४ ॥ विनाशकाळ पावतां बळें । देखतां निधान झांकिती डोळे । फणी भावोनी कांचनमाळे । त्यागोनी रेंज | अपंगी. ॥ १५ ॥ चौदंत' लाभला मागे खर । धनदासनीं 'उठे शिरे । उत रूनी वांछी पथर । तेवीं दुर्योधन अभागी.' ॥ १६ ॥ ऐसें भावोनी द्रोणाचार्य । म्हणे, ‘मागीतले काय ? । भुवनत्रयींचे सर्व राज्य । मागतां देतों सामथ्यें. ॥ १७ ॥ हें तंव अघटित, न घडे मही । सूर्य अस्तू पावे पूर्व कैहीं है। गंगावोध सागरडोहीं । मुरडुनी मूळा आक्रमी ? ॥ १८ ॥ हिमालयाअंगीं तापज्वर । अग्निसी बाधी शीत खैर । मोडेसी सागरा न मिळे नीर । हें अघटित, नरेंद्रा ! ॥ १९ ॥ ऐसी हे घडे कवणे काळीं ? । एकत्र धर्म, किरिटी, वनमाळी, । असतां असाध्य चंद्रमौळी । इतरां पाड कायसा ? ॥ २० ॥ फणी मिनतां कोट्यानकोटी । सैंपण घालों सकती मिठी । की मत्त गजाची १. इंद्र. २.आवड, कामना. ३.प्राप्त होण्यास कठिण असा, अलभ्य. ४.शरीरास कांहीं अपाय न होतां. ५. बाहुबळाने. ६. राया [दुर्योधनाला] वीरक्षयाची सदयता पातली [असें] द्रोण भावी (=मानी, समजला)=दुयोधनाला रणांत होणा-या वीरनाशासबंधाने दया उत्पन्न झाली, असे द्रोणास वाटले. ७. धर्मास धरून आणण्याचे कारण. ८. त्रासून, कंटाळून. ९. द्रव्याचा ठेवा. १०. दोरी. ११. ज्याला ऐरावत मिळाला आहे असा. ऐरावतादि दिग्गजांना चार चार सुळे आहेत, असे समजतात. १२. मागतो. १३. शिर उठणे=कपाळ उठणे, त्रास येणे. १४. पथ्थर, धोंडा, १५. केव्हां. १६. दंव. १७. मोडशी (अजीर्णामुळे होणारा विकार ) झाली असतां समुद्रास प्यावयास पाणी मिळणार नाही, हे अघटित होय. १८. गरुडास.