पान:महाभारत.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ नरहरिकृत [द्रोणपर्व कैची दोन ? । हेम, कांती द्विधाभान । रत्न, कीळ वेगळी ? ॥ ११९॥ तयापरी । ऐक्यता पाहीं । भारातीत करावया मही । प्रगटले, जैसा मारदाही । अंत करी । त्रिपुरातें. ॥ १२० । धर्म धार्मिक धर्मराजू । धर्मी निरत धर्मात्मजू । अधर्मघातें तेजःपुंजू । सदाचारी तपखी. ॥ १२१ ॥ तो जरी क्षोभल्या बाळका ! । रंक्षा करील धरणी देखा। स्वप्रभक्रोधाग्नी स्फुरितां शिखा । भीष्मद्रोण वृद्ध दग्धले. ॥ १२२ ।। ये-हवीं प्रेतापअर्का । कोण जिंकी समरीं देखा । सुरां असाध्य, भानवलोकां । गणी कोण ? बाळका! ॥ १२३ ॥ हीनबुद्धी मम नंदन । बळे त्यांहीं वांच्छिले कदन । सकळ वीरांसी आणिले मरण । संतती माझी बुडाली. ॥ १२४ ।। असो. आजन्म शोकचिंता । भाळी लिहुनी गेला धाता । द्रोण प्रतापाचा सविता । तळा कैसा आणिला ? ।। १२५ ।। हें सविस्तर वर्तमान । अवंचकभावें करीं कथन । जे ऐकतां तृप्तती श्रवण । देखिलें वाटे नेत्रातें. ॥ १२६ ।। द्रोणजीविता घालितां उडी । कोणे कैसी वारिली । धाडी ? । उभयवीरांची मिठी गाढी । क्षयाची वाढी अतयं. ॥ १२७॥ आदिअंत युद्धलाघव । तूते बाळका ! विदित सर्व । वक्तयांमाजी तुझी ठेवं । नाहीं चतुरा! दुसरी.' ॥ १२८ ॥ ऐसी रायाची प्रश्नोत्तरें । पुढां ऐकिजे प्रीति चतुरें। विनवी नरहर मोरेश्वर । सादर श्रोतीं ऐकिजे. ॥ १२९ ॥ अध्याय तिसरा. संजय म्हणे, “राजाधिराजा ! । भारतकुळवंशध्वजा ! । पुसिलिया प्रश्ना चित्ते ज्या । सादर श्रोतीं ऐकिजे. ॥ १ ॥ तव नंदने द्रोणाचार्या । सेनाभिषेक केला, राया ! । थोर उत्साह तया समया । अनर्थ्य वस्तु अर्पिल्या. ॥ २ ॥ भावें जोडूनियां कृतांजळी । मस्तक न्यासिला पदकमळीं । [वदे विनये, ‘गुरुजी ! बळी !] । मी किंकरू आज्ञेचा. ।। ३ ॥ संग्रामसागरीं मथितां बुद्धी ।। भीष्मअजयविष पातले संधी । तया हरणा कृपानिधी । तूं शंकर आमुर्ते.॥४॥ सोसोनी उल्बण उठाउठी । यश:श्रीरलें वोपी मुगुठीं । तुझिया विक्रमा आर्ड १. मदनदहन कता (शंकर). २. यमाचा मुलगा. ३. राख. ४. ज्वाळा. ५. प्रताप सूर्यास. ६. कापट्यरहित वृत्तीने, सचोटीनें, कांहीं चोरून न ठेवितां, ७. मूळापासून अखेरपर्यंत, अथपासून इतिपर्यंत. येथे मूळांतील अकरावा अध्याय संपतो. ८. तन्हा, ठेवण, पद्धति ९. अमूल्य, अमोलिक. १०. बुद्धया केलेल्या संग्रामरूपी सागराच्या मंथनाने भीष्मपराभवरूपी विष उत्पन्न झाले असतां, ते त्वां दयानिधीने प्यावे; कारण तू आम्हांला शो आहेस-हा ओवीचा भावार्थ, ११. संकट, विपत्ति.