पान:महाभारत.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ अध्याय महाभारत. १७ निर्जीव. ॥ १०३ ॥ अघ, बक, काग, वत्सासुर, । मर्दिला मल्ल बळिष्ठ असुर । कुवलय हस्ती पाडिला निसुर । पुन्हा नुठे यावया. ॥ १०४ ॥ विमलार्जुना दीधली मुक्ती । वणवा ग्रासिला प्रभिन्न शक्ती । काळ काळिया विगत गती । रमणीक द्वीपा धाडिलें. ॥ १०५ ॥ कंसराज भोजपती । केशीं धरूनि मारिला क्षिती । शिशुपाळाची केली शांती । राजसूययज्ञी शस्त्रीं. ॥ १०६ ॥ सौभदैत्य मायाकारी । रची नगरें वायोधारी । निर्मूळ केला नवलपरी । जो असाध्य देवते. ॥ १०७ ॥ हंस, डिंबक आपेंआप । मर्दानी वारिला जगाचा ताप । जरासंधप्रतापदीप । भीमहस्ते मालविला. ॥ १०८ ॥ कासीक, कौशल्य, अंग, वेग, । मागध, पौंड्रिक, कालंग, । नामें सांगतां । मानस व्यंग । अमित क्षत्रिय मर्दिले. ॥ १०९ ॥ तेवीस अक्षौहिणी सेना ।। मागधआश्रित आणिली रणा । शाल्ववीर प्रतापराणा । सहसेना मारिला. ॥ ११० ॥ भौमासुर सुरनायक । सेनेसह मर्दिला देख । कन्या पर्णिल्या सोळासहस्रक । लावण्यगुण आगळ्या. ॥ १११ ॥ खांडव वोपोनी तोषला वन्ही । चक्र लाधला विश्वदळणी । स्वर्गभूषण सुंरतरू गुणी । श्रेष्ठ इंद्रापासाव आणिला. ।। ११२ ॥ पाताळवासी पांचजन्यू । असुर प्रतापी तेजभानू । मदनी, आणिला पांचजन्यू । शंखवर्य तिहीं लोकीं. ॥ ११३ ॥ सुरां असाध्य साधिलीं कमैं, । करूनी अकर्ता, न पवे श्रम, । नरनारायण द्विधा नाम । एक रूप जाण पां. ॥ ११४ ॥ तोची हा पार्थाचा सारथी । दैवें जोडला अनन्य भक्ती । सर्व ऐश्वर्य विजयशक्ती । ज्याचे पदी विराजे. ॥ ११५ ॥ नरावतार विजयी पार्थं । सदा फळीं इच्छिला अर्थे । समरांगण अपर्णाकांतू । जेणे बँाहीं तोषविला. ॥ ११६॥ निवातकवच, जंबुदैत्य, । कालकेय, पौलोम दानवनाथ । वासवा धाक असाध्य कृत्य । पार्थं हे मर्दिला. ॥ ११७ ॥ कृष्ण फाल्गुनाचा प्राण । हरीआत्मा श्वेतवाहन । जैसा वत्स धेनु अनन्य ।। धेनु वत्स ज्यापरी. ॥ ११८ ॥ पुंष्प, परिमळ नव्हे भिन्न । शर्करा, गोडी १. शत्ररहित असूनही. २. कोते किंवा व्याकुळ. ३. खांडववनदहनसमयीं अग्नीने प्रसन्न हाऊन कृष्णास वज्रनाभ नामक चक व का राम वजनाभ नामक चक्र व कौमोदकी नामक गदा दिली-अशी कथा आहे. [मुक्तेश्वर-आदिपर्व अध्याय ४९ पहा.] ४. पारिजातक. ५. शंकर. ६. वाहूंनीं, बाहुबळानें, मल्लयुद्धानें. ७, लीलेने. ८. एकच, भेदभावरहित. ९. वर्णनसादृश्यः-कीं दीप प्रकाश दोघेजण । नामें वेगळी, परी एकत्र जाण । तेवीं एकनाथ आणि जनार्दन । नव्हती भिन्न सर्वथा. ॥ १८३. की कपूर सुगंध एक पाहीं । कीं द्रवत्वनीरासी द्वैत नाहीं । ना तरी पुष्प मकरंद एके ठायीं । निज प्रीतीने नांदती. ॥ १८४. भक्तिविजय अ० ४६. तशाच भक्तिविजयांतील ४५ व्या अध्यायांतील २५-१२८ या ओंव्याही ताडून पाण्यासारख्या आहेत. ३ ३० हो।