पान:महाभारत.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत [द्रोणपर्व कृतांत पावे ताप । माद्रीनंदन नराधिप । शौर्ये सौभद्र आगळा. ॥ ८७ ॥ द्रौपदीतनय पांचजण । सात्यकी विक्रमी प्रतापवान । महावीर विक्रमी घन । मत्स्य, पांचाळ, कैकय. ॥ ८८ ॥ घटोत्कच राक्षसेंद्र । बळप्रवीण वीरभद्र। मागधसृजयादि नरेंद्र । अमित वीर प्रतापी. ॥ १९ ॥ हेंही असो केतुली प्राप्ती ? भीमार्जुन दुःसह शक्ती । ज्यांचे बळाची अतयं शक्ती । चोज मानिती सुर पैं. ॥९० ॥ वीर विक्रमी समरांगणीं । कोण कैसे भिडले कदनीं ? । निबिड मिठी वीरश्रेणी । कोण्हें कोण्हा वारिलें ? ॥ ९१ ॥ तैसे आमुचे दळीं। वीर प्रख्यात आतुर्बळी । कर्ण, वृषसेन दुजे तळीं । शुंभनिशुंभ जाण पां. ॥ ९२ ॥ कृप, कृतवर्मा, सोमदत्ती, । भगदत्तराज, अमोघशक्ती । ज्याच्या गैजाची प्रबळशक्ती । भीम मानी दरारा. ॥ ९३ ॥ फाल्गुनसमान अश्वत्थामा । सर्व विद्येची पावला सीमा । बाळक भूरिश्रव्याच्या संग्रामा । त्रास भूप मानिती. ॥ ९४ ॥ संशप्तक पांच बंधू । समरी सुर पावती खेदू । राक्षस अलंबु प्रसिद्भू । मायामय अतयं. ॥ ९५ ॥ त्रिगत, सैंधव जयद्रथ, । विंदानुविंद, अवंतीनाथ, । मम तनय नागायुत । दुर्योधन बेळियाढा. ॥ ९६ ॥ यांहीवेगळी विक्रमी सेना । राजे बळिष्ठ नव्हे गणना । द्रोण प्रतापाचा राणा । विद्यागुरु क्षत्रियां. ॥ ९७ ॥ महावीर संग्रामजेठी । काळही देवोनी निघे पाँठी । तयाते लावोनी बारा वाटी । सांगसी द्रोणा मर्दिलें.॥९८॥ या कारणे संजया ! गुणी ! । दैव बळिष्ठ सँवगुणीं । वृथा यत्नकडसणी । अदृष्ट श्रेष्ठ विश्वाते. ॥ ९९॥ आग्रही थोर दुर्योधन । बळे क्षत्रियां आणिलें मरण । श्रीकृष्णमायाविंदाण । ब्रह्मादिकां नेणवे. ॥ १०० ॥ लीलाविग्रही पत्र तारी । परब्रह्म आनंदलहरी । षडैश्वर्य भगवान् हरी । शौरी, मुरारी, मकंट ॥ १०१ ॥ धराभार उतरावया । प्रगटलासे देवकार्या । मानवी रूपाची धरूनी छाया । वृष्णिकुळीं विराजे. ॥ १०२ ॥ बाळपणीं अगम्य लीळा । अमित वैरी वोपिले काळा । पूतना विषारी, विषाचा गोळो । शोषनि. केली १. अति बलाढ्य. २. भूतळीं, पृथ्वीवर. ३. भगदत्त गजयुद्ध करण्यांत मोठा पटाईत असून, त्याच्याजवळ शिकविलेले हत्तीही पुष्कळ असत. ४. मागे पृ. ५ टीप २० पहा. ५. दहा हजार हत्तींसारखा बलिष्ठ. ६. पाठ दाखवून, रणांतून पराङ्मुख होऊन. पाठ देणे हे पंतांनी वारंवार योजिलेला आहे. ‘ऐसे म्हणतचि, देउनि पाठ कृतन्नासि, विधि पळाला, हो !? ॥ १।६ विनायकमाहात्म्य. ७. सर्व प्रकारें. ८. यत्नाची धडपड. ९. दैव. १०. हरीच्या मायेची लीला. ११. शोभा किंवा देखावा. १२. पूतनेने आपल्या स्तनांत विष भरिलें होते; तेव्हा तिच्या स्तनाला उद्देशून 'विषाचा गोळा' हे शब्द कवीनें योजिले आहेत.