पान:महाभारत.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ अध्याय] महाभारत. १५ वदनीं । बिबुड जाहला स्पर्शतां. ॥ ६८ ॥ कुक्कटें शोकिला सागरू। कीं मेषथडके खचला मेरू । ना तो फणींद्र विषाचा तरू । मुंगीमुखीं हरपला. ॥ ६९ ॥ तैसी जाहली संजया पैरी । द्रोण प्रतापाचा महागिरी । ज्याची युद्धाची सरी । दिवौकसां अचोज. ॥ ७० ॥ च्यान्ही वेदपारंगत । दशग्रंथ मुखोद्गत । षडंग संहिता शास्त्रसंमत । संपन्न विद्या सर्वही. ॥ ७१ ॥ तपें समान गाधिनंदन । क्षमे वसिष्ठ दुजा जाण । शमदमनेमें अत्रिमान । इंद्रियजित तुष्टात्मा. ॥ ७२ ॥ धनुर्विद्या अस्त्रप्रयोग । जाणों भूतळीं रमारंग । सर्व वाहिनी आरूढ सांग । सर्वात्रभेदीं कॅप्तता. ॥ ७३ ॥ जितक्लमा सहित आशा । ज्ञानी पंडित सदा तोषा । समरांगणीं अजयदशा । नाहीं स्वप्न पाहिली. ॥ ७४ ॥ सर्वलक्षणी गुणवर्धन । प्रतापतेजें शचीरमण । सेनाश्वरथी विभ्राजमान । वेगवाणी तीव्रता. ॥ ७५ ॥ प्रभिन्न धनु असतां पाणी । कैसा वश जाहला कदनीं है। काळविखारी भूपश्रेणी । कोठे हरपली जाण पां? ॥७६॥ संग्राम सागरींचा महापूर । द्रोणनौका कवळोनी थोर । दुर्योधनभूपतिभार । पैलपारा लोटला. ॥७७॥ दैव हीन आमुचें देखा । मत्स्यपांचाळे भ्रष्टली नौका । संततिवृद्धीची पताका । शोकसमुद्री बुडाली. ॥ ७८ ॥ वाचविता पदार्थ दुर्योधना । आतां नाहीं, बाळका ! प्रवीणा ! । खेदभरते कुरुनंदना । दाटोनी, पडे धरेते.॥७९॥ धूळ लिंपिली सर्व गात्रीं । गळत्या लागल्या उभय नेत्रीं । श्यामता अंतली वक्रीं । निर्खिन्न जाहला सर्वांग. ॥८० ॥ ‘अहा !’ कार तये संधी । अमित मिळाली लोकमांदी। राजगृहीं शोकवृद्धी । व्योम जाहलें अपुरते. ॥ ८१ ॥ हृदय पिटोनी राजपत्नी । भावी जैगडोल जाहला अवनीं । राजसंपदा शोकजीवनीं । बुडाली मानी मानसे. ॥८२ ॥ वृद्ध साधू चतुर गुणी । सांवरूनि भूप धरिला पाणी। नेत्रीं स्पर्शोनी गुलाबपाणी । अंचळानिळा वॉरिती. ।। ८३ ॥ सावध होऊनी राजेश्वर । श्वास घाली महाथोर । जैसा खंडित दर्वीर्करं । उल्का वमी विषाच्या. ॥ ८४ ॥ वैशंपायन म्हणे, नराधीशा ! । समयीं जाहली ऐसी दशा' । विगत मानसे पुत्रआशा । खंडूनी, बोले नरेंद्र. ॥ ८५ ॥ म्हणे, “संजया ! वीरवळसा । वारुनी पांचाळ शिरकला कैसा ? । भूपपुरुषार्थ कोळसा । पांडवीं केला मज वाटे. ॥ ८६ ॥ भीमार्जुनाचा दुःसह कोप । पाहोनी 5 = | १. लहान रोपडे, २. शोषिला. ३. प्रकार. ४. कौशल्य. ५. देवांस. ६. सैन्य. ७. युक्ति, तयारी. ८. काळसर्पप्रमाणे विषारी (अत्यंत प्रतापी). ९. घामाघूम. १०. लोकांचा समुदाय. ११. भूकंप. १२. हातांनीं. १३. पदराने वारा घालावयास लागले. १४. सर्प, १५, वीरांचे कोंडाळे, योद्धयांचा गराडा