पान:महाभारत.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ नरहरिकृत द्रोणपर्व माळा गडगडाट गगनीं । वायो भ्रष्टी सुसाटें. ॥ ५० ॥ तयापरी युधिष्ठिर । चमूसह वृकोदर । महाप्रतापी पार्थवीर । माद्रीसुत दळेसीं. ॥ ५१ ॥ द्रौपदीसुत बंधुपंचक । भैमी, सौभद्र वीरनायक, । मच्छपांचाळकैकयादिक । वीर अमित लोटले. ॥ ५२ ॥ वर्षोंनियां बाणधाडी । बुजोनी काढिला द्रोण प्रौढी । जैसी सुरासुरांची पडे उडी । दैत्याधिप बळीतें. ॥ ५३॥ सर्वांग रक्ते भरलें पूर्ण । जाणो किंशुक फुलला सुमन । कोपें प्रज्वळिला हुताशन । चाप रोपें वोढिलें. ॥ ५४ ॥ काळविखारी तीक्ष्ण शर । कोटीच्या कोटी सोडिले क्रूर । कीं ते उदेले दैवकर । नाशावया सेनेतें. ॥ ५५ ॥ बाणामागे बाणवृष्टी । अस्वप्रयोग तयानिकटी। सेना मर्दिली महाहटी । गज, अश्व, रथी निघाते. ॥ ५६ ॥ स्थविर द्रोण जाहला तरुण । जाणों वसंती बालार्ककिरण । सेनाश्व चपळ फिरती त्राण । मंद म्हणती वारिया. ॥ ५७ ॥ विचित्र मंडळ फिरे रथू । बाण दिशा रोधिले पंथू । रुचिर शिरें मुगुटयुक्तु । तारामाने रिचवती. ॥ ५८ ॥ भूषित भुजा मंडित शस्त्रीं । खचोनी अपार पडिले धरत्री । खंडविखंड वीरगात्रीं । अहीपरी क्रंदती. ॥ ५९ ॥ दुःखमान सकळ चमू । देखोनी घाबिरा राजा धर्मं । वीरश्रीभारे यागोनी चमू । द्रोणाप्रती तगटला. ॥ ६० ॥ पाठी वीर उसळे शौर्ये । क्रोधं प्रदीप्त पार्थसूर्य । पार्षतवीर अग्रतावर्य । पांचाळमत्स्यभीमादि. ॥ ६१ ॥ अंतकदूत न सरती परा । तैसे द्रोणा वेढिले निकरीं । रौद्ररण जालें वातकुमरा । आणि अखया ज्यापरी. ॥ ६२ ॥ दैव उणीव तुझे भूपती । द्रोण ब्रह्मांड जाळी शक्ती । पार्षतपतंग शौर्य आर्ती । ग्रासिता जाहला, नरेंद्रा ! ॥ ६३ ॥ पांच दिवस तव वाहिनी । रक्षी सुरां कुंलिशपाणी । तैसा दुर्योधन परिपाळोनी । सहस्ररथी मारिले. ॥ ६४ ॥ नावाजिक वीर ठळक । मर्दिले, जे का सुरां अटक । शैर्य विक्रम प्रतापार्क । पांचाळकूपीं बुडाला. ॥ ६५ ॥ सेनाअक्षौहिणीचे संगै । नासोनी नृपा केला भंग । द्रोणशैर्याचे मेरुशुंग । पार्षतकुक्कटें खंडिलें.' ॥ ६६।। ऐकोनी साशंक अंबिकसुत । कल्पांत भाविता जाहला सत्य । म्हणे, ‘संजया ! अघटित मात । सांगसी द्रोण मर्दिला. ॥ ६७ ॥ हेंची। आश्चर्य माझिये मनीं । शलभें ग्रासिला देव तरेणी । कीं वडवाग्नी दावाग्नि १. भीमपुत्र (घटोत्कच). २. पळस. ३. सर्प, नाग. ४. वृद्ध. (अध्याय ८ श्लोक ९ पहा.) ५. धृष्टद्युम्न, ६. निकराने, आवेशानें. ७. इंद्र. ८.नांवाजलेले, नामांकित. ९. संगसंघ, समुदाय, १०. धृतराष्ट्र, ११. पतंगाने, १२. सूर्य