पान:महाभारत.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ अध्याय] महाभारत. ३ सिंधू । [द्रौपदीकुक्षिज अनिंदू]। सिंहशावक पांचही. ॥ ३३॥ अभिमन्यु वीर प्रतापशूर । ज्याचिया विक्रमा कुंठित सुर । समरांगणी काळ असुर । निसुरैपणे माघारे. ॥ ३४॥ तैसाची सात्यकी धृष्टद्युम्न । अमितविक्रमी महाघन । वेष्ट्रनियां । कुरुनंदन । माघां पुढां तळपती. ॥ ३५॥ उभयदळी वीरश्रीलोटू। लोटले शौर्ये भूधर लाटू । दृष्टी न थरे पाहतां थटू । झांकती नेत्र गपगपां. ॥ ३६॥ पर्वत पर्वता लोटले । कीं समुद्रा समुद्र थडकले। ना ते ब्रह्मास्त्र कडाडिलें । माहेश्वरी अस्त्रातें. ॥ ३७॥ तैसियापरी उभयसेना । थडकोनी विर मिनले कदना । अनेक वाद्य सिंहगर्जना । बधिरत्व काळा आथिलें. ॥ ३८ ॥ वीरवीरांची संघट्टणी । धुळी व्यापिला वासरमणी । शस्त्रे खणखणाट ऊर्ध्वपाणी । स्फुलिंगें रणीं दाटले. ॥ ३९ ॥ उसळोनी पुढां धृष्टद्युम्न । तीव्र शरांचा वर्षला घन । चमू त्रासिली व्याघ्रमान । गाव गोठणीं ज्यापरी. ॥४०॥ दुःसह मानोनियां मनीं । द्रोण धडकला जैसा वन्ही । रथ लोटूनियां रणीं । बाणजाळीं वर्षला. ॥ ४१ ॥ देखोनी पार्थ लोटला पुढां । न साहोनी, वाहोनी मेढौ । रथ लोटला धडधडा । हस्तिकक्षा ध्वजाग्रीं. ॥ ४२ ॥ उभयशरीं भरले गगन । रवि धूम्रीं आंखडी किरण । गजाश्व, रथी, पदाति, घन । शवें अपार पाडली. ॥ ४३ ॥ लोहितं दिशा रुधिरस्राव । शोभती जाहली भूमी सर्व । शिंवा अशुभ सूचिती रँव । क्षयकारक सवते. ॥ ४४ ॥ काक गीध अपसव्य फेर । क्रंदैमान वायस, सूकर । उल्कापात धरणीं घोर । भूत पिशाच नाचती. ॥ ४५ ॥ अशुभभय न मनोनी मनीं । वीर भिडले रणांगणीं । द्रोण क्षोभला वज्रपाणी । जेवीं समरीं दैत्याते. ॥ ४६ ॥ पांचाळ, पांडव, संजय, । कंपवाते भरलें भय । जैसा मृगेंद्र धडकतां शौर्य । मृगा पळणी ज्यापरी. ॥ ४७ ॥ गरगराट मंडळाकृती । चाप फिरे प्रभिन्नकांती । जाणों अलातचक्र भोंवे गती । काळचक्रासारिखी. ॥ १८ ॥ वारू, नाग, रथी, पदाती, । भूमी पाडिल्या शवांच्या पंक्ती । दुःसह मानोनी धर्मं चित्तीं । सेनेसह लोटला. ॥ १९ ॥ जैसा सक्रोध अगस्तीमुनी । ग्रासू धांवला समुद्रपाणी । कीं मेघ १. सिंहाचे वचे. २. भ्रांत होऊन. ३. प्राप्त झाले. ४. विस्तवाच्या ठिणग्या. ५. धनुष्याची दोरी ओढून. 'मेढा' शब्द गोपाळ कवी वारंवार वापरतो. उदा०-साठी सायकांचा वेढा । पार्षता घालोनियां, मेढा । स्वशरें छेदोनियां पुढां । हस्तचाप पाडिलें ।। कर्णपर्व १०।२२, धृष्टद्युम्न येतां पुढां । कर्णं वाहिला शीघ्र मेढा । जैसा जलौघातें गाढा । पर्वत धांवोनी रोधितू ।। कर्णपर्व ११।३७. ६. लाल. ७. भालू. ८. शब्द, ओरडणे. ९. ओरडणारे. १०. कोलीत गरगर फिरविलें असतां जें चक्र दिसतें तें. (अध्याय ७१५ पहा.)