पान:महाभारत.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ नरहरिकृत [द्रोणपर्व केतुला केवा ? । युद्ध पराभवू देव मघवा' । वीरश्रीभरें तें भूपअर्णवा ।। शौर्यलाटा उसळती. ॥ १५॥ द्रोणाचार्ये लक्षुनि सेना । परमानंद मानिला मना। ‘शकटव्यूह' निर्मिला निपुणा । जो कृतांता अजिंतू. ॥१६॥ वीररक्षणा वोपिले बळी । सेना आवर्त तीन पौळी । दुंदुभी त्राहटोनी रणकल्लोळीं । गजरी लोटले. ॥ १७ ॥ तयापरी कौरवचमू । पाहोनी पांडवां शौर्यसंभ्रमू । भरते भरुनियां राजा धर्मं । आज्ञा करी सैनिकां. ॥ १८ ॥ ‘द्रोणाचार्य सेनापती ।। करुनी आले कौरवशक्ती । प्रैतिव्यूह रचोनियां निगुती । गुरुवर्या धडकिजे.' ॥ १९ ॥ धर्ममुखींची ऐकोनी गोष्टी । वीरां उत्साह आनंद कोटी । ‘क्रौंचव्यूह रचोनी उठाउठी । वीररक्षणा वोपिले. ॥ २० ॥ नंदीघोष विजयरथू ।। जाणों अनळ मूर्तिमंतू । तेजें पताका हिणावितू । म्हणती (सरा' रविकिरणा. ॥ २१ ॥ रुक्मघंटिका, किंकिणीघोळ, । जडावरत्न, फांकती कीळ, । जाणों पीत व्योमी नक्षत्रमाळ । मंडळाकार तळपती. ॥ २२ ॥ मेरुशृंगप्रदीप्तकांती । तैसी ध्वजीं विराजे दीप्ती । सर्व बळाचे ऐश्वर्यगुथी । ध्वजीं मारुती विराजे. ॥ २३ ॥ च्याही वारू कैलासवर्णी । ना ते जन्मला क्षीराब्धिफैणी । कीं ते विजा एकवटोनी । गाळोनी पाणी निर्मिलें. ॥ २४ ॥ ना ते चंद्र सोलींव गाभा । हय निर्मिले प्रगल्भ आभा । बलाढ्य, गुणी, अतयं शोभा । वेग वातासारिखे. ॥ २५ ॥ धैरे सारथी त्रैलोक्यनाथू । ज्याच्या मायेचा न कळे अंतू । पॅडैश्वर्यगुणभरितू । श्रीमुकुंद जगदात्मा. ॥ २६ ॥ सर्वं जयाची हातवटी । हात जोडुनी उभे निकटीं । रमाधीश कल्याणसृष्टी । ध्यानीं धूर्जटी निमग्न. ॥ २७ ॥ अश्वरश्मी करांबुज । चुचुकारीत मुखें वाजी । पार्थभाग्य त्रिजगामाजी । वर्णनीं शारदा मोनवे. ॥ २८ ॥ ऐसिया रथीं विजय पार्थे । शोभला जैसा शचीकांतू । तो कुंडी प्रदीप्तमंतू । बृहेद्भानु ज्यापरी. ॥ २९ ॥ प्रेरुनी यंदन रणांगणीं । पुढे उभा राहिला 'मूर्ती । वेष्टित भूप प्रतापकिरणीं । सूर्यापरी शोभले. ॥ ३० ॥ मध्यभागी विजयी धर्मं । भोंवते विक्रम महाचमू । वीरश्रीभरें कृतांतकामू । भयें चकित होतसे. ॥ ३१ ॥ अपरकाळ भीमसेन । हाटकरथीं विराजमान । गुर्वी गदा प्रभिन्न घन । धर्मापुढे विराजे. ॥ ३२ ॥ माद्रीतनय जावळेबंधू । शौर्यप्रतापें जैसे १. भिंत, तट. २. शकटव्यूहावर मारक असा दुसरा व्यूह. ३. अग्नि. ४. पांढरे. ५. प. ही ‘पयःफेनधवल' आहे. (मोरोपंतकृत हरिवंश १६।२६). ६. रथाच्या अग्रभागीं. धुर्=धुरा, जु, ७, ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य, धर्म, यश व श्री या सहा गुणांनी युक्त. ८. हातोटी, खुबी, युक्ति ९. घोड्याची लगाम. १०. मौन धारण करते, मुकी होते. ११. इंद्र. १२. अग्नि. १३. आघाडीस, बिनीला. १४. प्रत्तिकाळ, दुसरा यमच.