पान:महाभारत.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ अध्याय] महाभारत. श्रोतयांतें समर्प. ॥ १५५॥ भीमराजगुरु मूळपीठ । कृपा नवरात्र, भाव घट । नरहरमोरेश्वरवाक्पुट । ध्यान विरूढे सजनीं. ॥ १५६ ॥ अध्याय दुसरा. संजय म्हणे, नरेंद्रश्रेष्ठा ! । पुत्रोत्पत्ती अपर स्रष्टा । द्रोण स्थापितां सेनापटा । वीरश्रीभरें फुपाटे. ॥ १ ॥ पर्वतप्राय कांचनरथू । ध्वजा पताकीं सुशोभितू । गुणाढ्य होय बंळसमर्थ । वायुवेगें तळपती. ॥ २ ॥ ऐसिये यंदनीं द्रोणाचार्य । शोभला जैसा उगवला सूर्य । [उपजवी सर्वत्र महाश्चर्य] । कोदंडपाणी तेजस्वी. ॥३॥ पाहोनी चमू हर्षवर्धन । निमोनी चिंता, वीर श्रीपूर्ण । देखोनी लोटली नदीमान । जेवीं सागरीं वृटीं. ॥ ४ ॥ सैंधव, कलिंग, अंबिष्ठसेना । जाणो कुंभनिकुंभ पातले रणा । सह विकर्ण वीरराणा । दक्षिणपथीं थोकले, ॥ ५ ॥ सबळ बळ सौबळशकुनी । पँहस्तप्राय लोटला कदनीं । गांधारराजे प्रतापखाणी । एकत्र पृष्ठीं मिनले. ॥ ६ ॥ कृप, कृतवर्मा, चित्रसेन, । विशंती, दंशती, दुःशासन, । दुरासद, सेनाविक्रमी घन । अतिकायासारिखा. ॥ ७ ॥ कडकडाटी तेजःपुंज । येउनी नमोनी भारद्वाज । आक्रमोनी वैमभुज । उभे लोटले सेनेसी. ॥ ८ ॥ द्रोणाचार्यसन्निधानीं । दुर्योधन ऐश्वर्यखाणी । जाणों दशवक्र तेजकिरणी । राघवसम स्थिरावे. ॥ ९ ॥ शल्य, कांबोज, सुदक्षिण, । मद्र, त्रिगर्त, अंबिष्ठ, जाण । प्रतीच्योदीच्य मालव घन, । शूरसेन प्रतापी. ॥ १० ॥ शिवयो, सौवीर, कितव, । पश्चिम दाक्षिणात्य मालव, । यवन, किरात, घुलाघव । चतुरंग दळीं पातले. ॥ ११ ॥ नमोनियां राजेश्वरा । पुढां ठाकले रणगव्हरी । वैकैर्तन तया अवसरा। इंद्रजितप्राय पातला. ॥ १२ ॥ विराजमान हाँटकरथू । ध्वजापताकीं सुशोभितू । जाणों उगवला पेंद्मिणीकांतू । किरणसेना बळवृद्धी. ॥ १३ ॥ नमन करूनी ऐश्वर्यस्तंभा । अग्रता पुढे राहिला उभा । दृष्टी ६ संटे प्रगल्भ आभा । वीरां सकळां आल्हाद. ॥ १४ ॥ म्हणती, ‘पांडवांचा १. ह्या अध्यायांत कवीने मूळांतील ६ वा अध्याय व सातव्या अध्यायाच्या पहिल्या नऊ लोकांतील कथाभाग वणिला आहे. २. प्रतिब्रह्मदेव. ३. घोडे. ४. बळाने टणके, सशक्त ५. नदीप्रमाणे. ६. पर्जन्यकाळीं. ७. रावणाच्या प्रधानाप्रमाणे. ८. अतिकाय=रावणपुत्र. ह्याचे शरीर अतिस्थळ होते म्हणून त्यास हें नांव पडलें. ९. द्रोणाचार्य. १०. प्रदक्षिणा घालून, ११. फार कुशल, अत्यंत कसवी. १२. गव्हर-गुहा, प्रवेश करण्यास कठीण अशी जागा. १३. सूर्यपुत्र (कर्ण), विकर्तन=सूर्य. १४. सुवर्णरथ. १५. सूर्य. १६. न मावे.