पान:महाभारत.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० नरहरिकृत [द्रोणपर्व ॥१३८॥ तयापरी वर्णवर्या ! । आमुते मान्य प्रतापसूर्या! । सेनाधिकारी होउनी बाह्या । वीरां सर्वी अपंगीं. ॥ १३९ ॥ एकादश चमू तवाधीन । साह्य भूप विक्रमी क्रोधन । जिंकी पांडवां प्रतापवान । निश्चय पूर्ण मी मानीं. ॥ १४०॥ । विराजमान प्रेभिन्न रथीं। देखतां तूतें कांपती रँथी । पार्थ पुरुषार्थाची गुंथी । युद्ध तूतें न करी पां. ॥ १४१ ।। धर्म धार्मिक धर्मवर्ती । सख्य करील नैं लवतां पातीं । तव प्रताप मार्तडकांती। भूप केवीं साहती पां?' ॥ १४२ ॥ ऐकोनी राजयाची उत्तरें । द्रोणाआंगीं वीरश्रीवारें । भरूनी उसळे नदीधारे । मीन जेवीं त्यापरी. ॥ १४३ ॥ म्हणे, ‘भूपा ! सार्वभौमा ! । मी न धरी कोणाची तमा । माझिया विक्रमाची गरिमा । सुराधीशा असाध्य. ॥ १४४ ॥ चतुर्वेद, पूर्ण षडंगें, । शास्त्रे, व्याकरण सर्वही सांगें । संपादिली अस्त्रप्रयोगें। जे का ठेवी शिवाची. ॥ १४५ ॥ वीर मिनतां कोट्यानकोटी । भ्रष्टीन युद्धा न लगतां त्रुटी । माझिया घाता पांचाळ कपटी । वर्धिला त्यातें न लेखीं. ॥ १४६ ॥ धनुष्य असतां माझिये पाणीं । मी अजिंक्य सव कदनीं । युद्धा पातले देव तिन्ही । विमुख त्यांतें करीन.' ।। १४७ ॥ ऐकोनी गुरुवर्याची वाणी । हर्षे युक्त सर्व सैन्यश्रेणी । वाद्ये त्राहाटिली नानाध्वनी । सिंहनाद वीरांचे. ॥ १४८ ॥ ऐसें बोलतां ऋषिराणा । आवेश न धरवे दुर्योधना । तात्काळ आणोनी हेमासना। गुरुवर्या बैसवी. ॥ १४९॥ रत्नाभिषेक करूनि । | मूत्र । दिव्यांबर अर्पिले भूषणीं । अनेक वाद्यांचिया ध्वनी । भेटू पातल्या । अंबरा. ॥ १५० ॥ युद्धी युक्त ऋषीश्वरीं । मंत्रयुक्त गिरागजरीं । गीत नृत्य विविधा परी । संपादिलें कर्माते. ॥ १५१ ॥ संभवोनी याचकवृंद । दक्षिणा दानीं केले धनद । हर्षयुक्त वदनारविंद । सैन्यश्रेणी उफाळे. ॥ १५२ ।। | पूर्वी देवसेनासेनापती । कुमार केला वसवा ऑर्ती । तैसा गुरुवर्य स्थापितां । भक्ती । परमानंद समस्तां. ॥ १५३ ॥ पूर्वे विकासतां अंशृंमाळी । पद्मिनी प्रसन्न मुखकमळीं । तैसी सेना उल्हासमेळीं । वीरश्रीभरें फँपाटे. ॥ १५४ ॥ असो, प्रसंग तये समयीं । जाला अर्पिला श्रीगुरुपायीं । पुढील कथेची नवाई। | १. चतुर्वणत श्रेष्ठा ! (ब्राह्मण.) २. बाहुबळाने. ३. सांभाळ. ४. रागीट, तापट. ५. श्रेष्ठ, सुव्यक्त, दिव्य. ६. योद्धे. ७. गुथी=गुंफा, जाळे. पुरुषार्थाची गुंथी=पराक्रमाची प्रौढी मिरविणारा. ८. [डोळ्यांचीं] पातीं न लवतां=एका क्षणांत. ९. पर्वा, फिकीर. १०. शिवापासून परशुरामाने अस्त्रविद्या संपादन केली होती व द्रोणाचार्य हे परशुरामाचे शिष्य होते, या गोष्टीवर कटाक्ष आहे. (पांडवप्रताप ८।१९६-२०३.) ११. धृष्टद्युम्न. १२. पव करीत नाहीं. १३. आकाशास. १४. संभावना करून, आदरसत्कार करून. १५. स्फुरण पावे. १६. इंद्राला संकट पडले असतां, १७. सूर्य. १८, आवेशास चढे. १९. कौतुक, गोडी,