पान:महाभारत.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ अध्याय] महाभारत. कुरुवर्या आल्हादकोटी । धावोनी हुनु स्पर्शली बोटीं । म्हणे, “वी- रवर्या ! जगजेठी! । शून्य सृष्टी तुजवीण. ॥ १२२ ॥ तूं ऐश्वर्याचा विजयकेतू । तू संग्रामसागरींचा नौकानाथू । सौख्यामृताचा सुशीळ वातू । मत्प्रियकर बांधवा ! ॥ १२३ ॥ धरणी आश्रय धराधर । सुरां सकळां सुरेश्वर । की वनस्पती शीतकर । तेवीं आमुते नरवर्या ! ॥ १२४ ॥ तूं असतां माझिया गांठीं । कायसी संग्रामाची गोष्टी ? । सेना भ्रष्ट बारावाटी । गोप्ता नाहीं तयाते. ॥ १२५ ॥ तरी तू होवोनी सेनापती । चमू रक्षिजे आपुले शक्ती । पांडवां सकळां दक्षिणापती-। भेटीलागी पाठवीं. ॥ १२६ ॥ कर्ण वदे हर्षवर्धन । ‘बोलसी राया ! सत्यवचन । परी मज सेनापती करितां जाण । भूप तोषा न पवती. ॥ १२७ ॥ येव्हवीं माझी दुःसह शक्ती । तू जाणसी राया ! निर्गुती । परी द्रोण असतां नृपाच्या पंक्ती । अर्ह मी तों नव्हें पां. ॥ १२८ ॥ योग्यायोग्य रत्नपारखी । पाहोनी ललाम जडी पदकीं। मान्यता मान मध्यनायकीं । शोभा सकळां पाविजे. ॥ १२९ ॥ तैसा द्रोणाचार्य वीर सुभट । त्यासीच साजे सेनापट । शौर्यप्रतापबळ उद्भट । मान्य सर्वां नृपांतें. ॥ १३० ॥ सर्वास्त्रभेदी, जितक्लमा, । धनुर्विद्येची पावली सीमा । शौचे तपें अग्निप्रतिमा । युद्ध सुरेशा असाध्य. ॥ १३१ ॥ जैसा सुरमंडळीं गुरु श्रेष्ठ । जैसा असुरांमाजी बळी वरिष्ठ । स्थापून, पुरुषार्थ करूं प्रगट । सर्व आम्ही नरवय! ॥ १३२॥ अमृतप्राय मानोनी वाणी । हर्षे पातले हतधरणी । गुरुवर्य सूर्यसूर्य प्रताप खाणी । भाळ चरणीं न्यासिला. ॥ १३३ ॥ जोडूनियां उभय पाणी । बोलता जाहला नम्र वचनीं । म्हणे, ‘स्वामिया ! बुडतां जीवनीं । तू त्राता मज होई. ॥ १३४ ॥ तूं प्रतापाचा पूर्ण उदधी । सुखामृताचा अक्षय निधी । तुझिया बळाची अलोट वृद्धी । सुरां असुरां नागवे. ॥ १३५ ॥ रुद्रांमाजी श्रीशंकर । वसुंमाजी पावक सौर । यक्षगणांमाजी कुबेर । मरुतांमाजी वासव, ॥ १३६ ॥ विप्रांमाजी वसिष्ठमुनी । तेजांमाजी सहस्रकरणी । पितरांमाजी धर्मज्ञखाणी । धर्मराज जाण पां. ॥ १३७ ।। यदुगणांमाजी अंबिष्ठघन । नक्षत्रांमाजी निशारमण । सर्पोमाजी सहस्रवदन । सेने सेनानी कैंमारमणि. ५. यमाचे भेटीस, दक्षिण । १. पर्वत. २. पदरीं, आश्रयास. ३. रक्षणकर्ता. ४. सैन्य. दिशेचा स्वामी यम आहे. यज्ञपत्नीचें नांवही ‘दक्षिणा'च आहे. ६. निःसंशय. ७. पूज्य, मान्य. ८. पवित्र आचरणानें- ९. येथे मूळांतील पंचमाध्याय समाप्त होतो. १०. हात जोडून, नम्रतेने. ११. ठेविला. १२ सांपडत नाहीं, अंत लागत नाहीं. १३. श्रेष्ठ, उत्तम. १४. कार्तिकस्वामी ओंव्या ३५-३७ ह्या कवीने श्रीमद्भगवद्गीता-अध्याय १०, झोक २१-३८ यांच्या धर्तीवर रचिल्या आहेत. सेनानी=सेनाधिपति २ न० द्रो०