पान:महाभारत.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत द्रोणपर्वाचे परिशिष्ट. पृष्ठ, पद्य मुख्यमुख्य पाठभेद, शुद्धाशुद्ध, व टीपा यांचे परिशिष्ट. १०

  • * * * * * *

\७६ १५ ६ । ६ ७ ‘भव्याकारां' ऐवजी 'भाष्यकारां' असा पाठभेद. प्रतापाचा माळा=Tower of Strength. ‘क्रोधसौख्ये बद्दल 'क्रोधसौरभ्ये' असे पाठांतर. चरण दुसरा,-'पुत्रोत्पादन अपरस्रष्टा' असा पाठभेद. चरण तिसरा-शस्त्रसमाधि विचित्रवर्य' असा मुळपाठ. बिबुड=बींबूड, निर्बीज, नष्ट. १०७ वायोधारी=वायूच्या आधाराचीं, हवेतील. १११ ‘सुरनायक' बद्दल ‘शूरनायक' पाहिजे. जुन्या पोथ्यांत 'शूर' बद्दल ‘सुर’ असे लेखकांच्या अज्ञानाने लिहिलेले वारंवार आढळते. उसण्या घाई–मोठ्या तांतडीनें; हातउसनी आणलेली वस्तु परत कर२३ ण्यांत सज्जन व सुशील मनुष्य जसी घाई करितो, तशा घाईनें. ‘आनंदासी' बद्दल ‘अनंतासी' असा पाठभेद. अनंत=शेष. ३१ हउळी-हाउळी=टोळी. ‘शक्र' बद्दल ‘शुक्र' हा योग्य पाठ, ‘हस्तावा' हा 'हस्तावाप' (=ज्याघातवारण, धनुष्याच्या दोरीचा | झटका हातास लागू नये म्हणून हातांत घातलेला हातमोजा) या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश. ‘चाप छेदोनी मारिलीं घोडीं । शर सोडुनी काळधाडी।' असा मूळपाठ. ७३ पुरोनी अवधी=वर जाण्याची मर्यादा खुटून. ११ ‘कुरंटा' ऐवजी 'कुरटा' असा पाठभेद. कुरंटा=कुरटा=खुरटा=मनांत ३७ जळफळणारा. 'द्रोण विद्येचा मरगळा' असा शुद्ध पाठ, मरगळा=मूर्ति, अवतार. ‘वीर धसले वीरश्रीरंगे' हा द्वितीय चरणाचा मूळपाठ. ‘नुगवे पुन्हा तृप्तीचा' असा अंत्य चरणाचा मूळपाठ. भिंगुरप्राय=भिंगुरड्याच्या रंगाचे, मुंग्यासारखे काळे. पिशंगीवर्ण=राखी रंगाचा. पिशंगी=राख, भस्म. ४३ १२० ‘रवी' बद्दल 'वीर' वाचावें. ४८ 'द्रोणा निका' बद्दल 'द्रोणानीका' असा पाठभेद. ३४ ॥ ६८ ६ ७२ ४१ 4) ३२ ४१

  • * * * * * *

។។