पान:महाभारत.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ अध्याय महाभारत. २८९ तदनुग्रहहस्त माथां । वाचे स्फुरितां वाग्देवता ।। भगवद्णी प्रेम आस्ता । भारतीगंगा प्रगटली. ॥ ११ ॥ श्रीलक्ष्मीनृसिंह रामराज । ज्यांचेनि जगा साम्राज्य ।। सिंहवदन अधोक्षज, । भक्तपाळक, कृपाळू. ॥ १२ ॥ तया पदीं अनन्य शरण । त्याविण आन न स्मरे मन।। काया, वाचा, मानस, ध्यान । गुणवर्णनीं आवडी. ॥ १३ ॥ तया प्रसादें वायुद्भव । सिद्धि पावलें द्रोणपर्व । ग्रंथाभिमानी लक्ष्मीधव । मी बिगारी येथींचा. ॥ १४ ॥ कुळदेवता श्रीभवानी । माया तुळजापूरस्वामिणी ।। कवित्वलतिका वाढे जनीं । हा प्रसाद तियेचा. ॥ १५ ॥ असो; जाहलिया द्रोणेनिधन । वीररसासी उतार पूर्ण । जैसी प्रसूत प्रेमदारत्न । सरे यौवन मागुतें. ॥ १६ ॥ की शरत्काळ आक्रमित जाण । नदीपुराचे उतरे मान । कीं वसंतअंतीं पंचमस्वर गान । वोहँटे जेवीं त्यापरी. ॥ १७ ॥ असो, बालाघाटीं ईटनगरी । महा सुरवाड रम्य पुरी । नामें मोरोजी नरहरी । देशपांड्या तेथींचा. ॥ १८ ॥ त्याची भार्या गुणैकराशी । नाम भवानी भवानीतोषी । हरिभक्त जन्मला पुत्र कुशी । दास नरहरी संतांचा. ॥ १९ ॥ नृसिंहप्रसादें पर्वसमाप्ती । सिद्धि पावलें सज्जनआर्ती। श्रोतयां विनवीतसे भक्ती । पान आदरें करावें. ॥ २० ॥ शके सोळाशे नव्वद । आश्विन मास, प्रतिपदा शुद्ध । लेखन समाप्त जाहलें सिद्ध । पुण्यपावन श्रोतयां. ॥ २१ ॥ भारतींचा गहन अर्थ । प्राकृत भाषा गोविला सत्य ।। चार सहस्र नव शत । ओव्या पंधरा वरौत्या ॥ २२ ॥ १. भारतरूपी गंगा. २. वाचेची उत्पत्ति. ३. द्रोणाचार्यांचा मृत्यु. ४. स्त्रीरल. ‘प्रसूता गतयौवना' असे सुभाषितही आहे. ५. प्रमाण. ६. वसंतऋतूंत कोकिळेचा आवाज पंचमस्वरांत असतो. ७. कमी होतो, उतरतो. ८. गुंफिला, ग्रंथित केला. ९. ह्या पर्वाचे पहिले तीस अध्याय छापून झाल्यानंतर, रा. रा. विनायक मल्हार सरदेसाई, असि० मास्तर, इंग्रजी शाळा अक्कलकोट, यांनी ह्या पर्वाची एक हस्तलिखित प्रत मोठ्या खटपटीने पैदा करून आमच्याकडे पाठविली. ह्या त्यांच्या मेहरबानीबद्दल आह्मी त्यांचे अत्यंत ऋणी आहों । ४० न० दो०