पान:महाभारत.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[द्रोणपर्व २८८ नरहरिकृत। वरूनियां युद्धकंदन । माघारले धामाते. ॥ १३० ॥ शोकारूढ कौरवराज । दीन मानसे विगततेज । निमोनी जयश्रीचा पुंज । निघता जाला शिबिराते. ॥ १३१ ॥ हर्षयुक्त जयस्वी धर्मं । आबरूनियां संग्रामक । शिबिरा पातला संभ्रमें । वीरवेष्टित स्वानंदें. ॥ १३२ ॥ उपसंहार. येथोनी सरले द्रोणपर्व । पुढां कर्णपर्व अपूर्व ।। श्रीकृष्णलीळेचे लाघव । सुरादिकां अचोज. ॥ १ ॥ दाहा सँस्र पांचशते । श्लोक साठ अधिक वरुते ।। द्रोणपर्व सत्यवतीसुतें । कथिले पूर्ण भारतीं. ॥ २ ॥ तितुका कवळोनियां अर्थान्वय । कथासार पुष्टतावर्य ।। प्राकृत भाष्य करुनी सोय । सुगम केला श्रोतयां. ॥ ३ ॥ जया कथेचिया श्रवणीं । ब्रह्महत्यादि होती धुणी ।। सहस्रकपिलागोदानदानीं । श्रेय लाधे श्रवणाय. ॥ ४ ॥ हरिगुणी उद्भवोनी प्रेमा । भक्ति लिगटे पुरुषोत्तमा । अंतीं पावे सायुज्यधामा । श्रवणमहिमा अगम्य. ॥ ५ ॥ संतसज्जनश्रोतयांप्रती । मी विनवितों भावें ऑर्ती ।। तुह्मी केवळ ईश्वरमूर्ती । परोपकारी विश्वाते. ॥ ६ ॥ तुमच्या आश्रयें कवित्वलता । वृद्धि पावोनी हरी व्यथा । हा प्रसाद तुमचा, ताता। शोभा ग्रंथा तुमचेनी. ॥ ७ ॥ मी हीन दीन किंकर पाहीं । अनन्य शरण तुमचे पायीं । करुनी कृपेची ग्रंथसायी । सनाथ मातें करावें. ॥ ८ ॥ तथापि कांहीं पॅडलें न्यून । सांभाळोनी करिजे मान्य ।। मी कवीश्वर नव्हे धीमान । रंक सेवक तुमचा. ॥ ९ ॥ समर्थ श्रीगुरु भीमराज । अवताररूपें श्रीरघुराज ।। समर्थसंप्रदायी कीर्तिध्वज । रामदास लौकिकीं. ॥ १० ॥ १. आनंदानें; त्वरेने. २. ह्या अध्यायाला ‘पंचमदिवसयुद्धसमाप्ति' असे नांव आहे. ३. अतवर्य. ४. आमच्यापाशी असलेल्या कलकत्ताप्रतींत (राय प्रतापचंद्र मुजुमदार यांनी छापलेल्या) एकंदर ९६२६ श्लोक आहेत. ५. पुण्य. ६. लडिवाळपणाने. ७. पडेल' असे पाठांतर. ८. पंडितश्रेष्ठ, ९. बुद्धिमान.