पान:महाभारत.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ अध्याय मैहाभारत. २८७ तया । शतशः अधिक लोटली. ॥ ११२ । तया तपाच्या तेजानळे । कढों लागलें ब्रह्मांड सगळे । विगतमान पाताळकुळे । सुरासुर सर्वही. ॥११३॥ महेश जाणोनी मानसीं । येता जाहला, वैरदा तोषी । उमा भवानी अधीगेंसीं । भूतगण परिवार. ॥ ११४ ॥ जेवीं सूर्य सूर्याचे दर्शना । कीं क्षीराब्धी क्षीराब्धी भेटती जाणा । तेवीं कैलासींचा राणा । नारायणातें पावला. ॥ ११५॥ देखतक्षणीं हर्षसमुद्रा । भरते दाटले कल्याणभद्रा । स्तवनीं स्तवी वीरभद्रा। महारुद्रा शिवाते. ॥ ११६ ॥ चंद्रचूडा! श्रीशंकरा! । कपर्दी ! पिनाकी! शशिशेखरा! । गिरिजामाता ! गिरिजावरा ! । महेश्वरा! पशुपती ! ॥ ११७ ।। त्रिपुरांतका ! गंगाधरा! । नरमुंडमाळा ! कर्पूरगौरा ! । मृत्युंजया ! नीलग्रीवा ! हरा ! । शूळपाणी! त्र्यंबका ! ॥ ११८ ॥ भाळनयना ! स्मरसूदना ! । अंधकदमना ! पंचवदना ! । प्रमथनाथ ! उमारमणा ! । गजचर्माबरधारका ! ॥ ११९ ॥ वृषभध्वजा ! व्योमकेशा ! । मृगपाणी ! मृडा ! महेशा ! ।। भुजंगभूषणा ! परेशा! । भस्मोद्धारणा ! ईशाना ! ॥ १२० ॥ रुद्राक्षभूषणा ! सर्वेश्वरा ! । महादेवा! डमरुधरा!। खट्रांगधरा ! अभयंकरा ! । कल्याणकरा! श्रीमूर्ती ! ॥ १२१ ॥ स्तुती तोषोनी जाश्वनीळ । म्हणे, ‘कोण्हा कोणे स्तविजे बोलें ? । अर्सेरी आश्रित मदांध बळे । द्वैतता भावें भाविती. ॥१२२॥ कार्याकारण द्विधा व्यक्ती । धरणे पडे लोकी उत्पत्ती । असो; भूभारहरणार्थी। मजप्रती प्रार्थिलें. ॥ १२३ ॥ जयवंत तुह्मी विश्वार्जित । शस्त्रअस्त्रे सकळ युक्त । समरांगणीं अजयवात- । बाधा नोहे कल्पांतीं.' ।। १२४ ॥ ऐसें वदोनी अंतर्धान । शिव पावतां, नारायण । मही अवतरे मधुसूदन । द्विधारूपें ना| टकी. ॥ १२५ ॥ पूर्णब्रह्म, लीलावतारी, । मायामुक्त, मुरारी, शौरी, । तो श्रीकृष्ण दानवारी । जाण निश्चित, बाळका ! ।। १२६ ॥ नरावतार तोची अर्जुन । सर्वास्त्रभेदी, जयस्वी पूर्ण, । रणीं विन्मुख पाकशासन, । अजय स्वप्नीं असेन. ॥ १२७ ॥ ययानिमित्त तवास्नबाधा । बाध नोहे, त्यागिजे खेदा. । शांति पावोनी, श्रीव्यासपदां । मानोनी हरिहरों वंदिले. ॥१२८॥ विलोकितां वाहिनी दृष्टी । तंव सूर्य अस्ताचिये नेहटीं । श्रांत वाहने वीर कष्टी । निरुत्साह सवते. ॥ १२९ ॥ पंचम युद्ध समाप्त द्रोण । चितार्णव समग्र लीन । आ १. प्रसन्न होऊन वर देणारी. २. शंकर. ३. दैत्यांनी ज्यांना आश्रय दिला आहे ते. ४. द्वैतबुद्धि, | भेदभाव. ५. नर व नारायण ह्या दोन रूपांनीं.६. हे अश्वत्थाम्या! ७. पराजय.८. दिसेना' असा अन्य पाठ,९.व्यासांचे पाय हेच हरिहर असे समजून, ‘मानोनी' ऐवजी 'नमोनी' असा पाठभेद,