पान:महाभारत.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[द्रोणपर्व २८६ नरहरिकृत पद्मनयना, । मनमोहना, श्रीकृष्णा, ॥ ९५ ।। परात्परा, परमपुरुषा, । आदिअनादि, अविनाशा, । सच्चिदानंदा, चिढिलासा, । अमूर्तिमूर्ती, हरीतें. ॥९६॥ पांचजन्य आनंदभरें । वादन केले यादवेश्वरें । कृतकार्य केले पैलपार ।। क्षेम पार्था दिधलें. ॥ ९७ ॥ अनेक वाद्ये सहस्रशः । लागली, तेणें व्यापिल्या दिशा । कौरववीर विगतदशा । भैयादित सर्वही. ॥ ९८ ॥ अस्त्र प्रयोग विन्मुखचमू । द्रौणीहृदयीं भ्रमे भ्रमू । निस्विनमान गात्रीं श्रमू । स्तब्ध मुँहूर्त सचित. ॥ ९९ ॥ तयानंतरें स्मृति वळसा । पावोनी, सोडिलें दीर्घश्वासा । म्हणे, ‘धिकार असो विद्याभ्यासा । दैव बळिष्ठ जगत्त्रयीं. ।। १०० ।। कुळशीळ लावण्यरूप । सकळ विद्येचा खटाटोप । सेनासंपत्ती शक्तिप्रताप ।। वृथा हीनं प्राक्तनें. ॥ १०१ ॥ काळ अनुकूळ पांडुसुता । देवां अजिंक्य अस्त्रे वृथा । जाली, धिक्कार असो आतां । चाप न धरणे हस्तकीं. ॥ १०२ ।। संतापताप अंतःकरणीं । शोकपरायण, म्लानवदनी, । उद्विग्न चित्ते खेदभरणी । म्हणे ‘इच्छा सांबाची. ॥ १०३ ।। तंव अकस्मात बादरायण । वेदव्यास श्रीभगवान । येते जाहले कृपेकरून । अवर्षण घन जेवीं. ॥ १०४ ॥ पुढे देखोनी ऋषिवर्या । विगत मानसे नमिलें पायां । गहिवरे कंठ दाटोनियां । दीन शोकें अनुवादे. ॥ १०५ । म्हणे ‘स्वामिया ! श्रीगुरुनाथा ! सिद्धिप्रद असे मंत्रदेवता । पिशाचगंधर्वसुरां दैत्यां। सपराक्षसां अजिंक्य. ॥ १०६ ॥ तेथ मानवा कोण गणती ? । ऐसिया अस्त्राची विकळ मती । पार्थ श्रीकृष्ण अक्षयी क्षिती । हेंची आश्चर्य मानसे. ॥ १०७ ।। तरी हैं। ज्ञान ऋषिराया ! । श्रुत करुनी निववी काया । जेणे संशयाची माया । बाधा नोहे हृत्पद्म.' ।। १०८ ॥ हांसोनी बोले बादरायण । म्हणे, ‘ऐकिजे सावधान ।। विश्वजनका जनक जाण । नारायण या नामें. ।। १०९ । लीलावतारी, धर्मपाळक, । सदय, कृपा जगचाळक । विश्वहितालागीं तप अधिक । मैनांकमून अवलंबी. ॥ ११० ॥ नरनारायण ऐक्यमेळीं । हृदी चिंतना चंद्रमौळी । ऊर्ध्वबाहु तनु सरळी । उभे वृक्षासारिखे. ॥ १११ ॥ अशनपने वर्जीनियां । वायु भक्षोनी १३ मिती काया । साठी सहस्र वर्षे १. भयाकुळ, भयभीत. २. विमुक्त चमू' असे पाठांतर. ३. दोन वटिका. ४. नशीब बलवत्तर नसेल तर कुलशीलविद्यादिकांचा काही उपयोग होत नाहीं-हा इत्यर्थ.५. 'सकाळ' असा पाठभेद ६. अवर्षण=पर्जन्याचा अभाव. ७. क्षयरहित, अभंग. ८. 'ठाया' असे पाठांतर. ९. ब्रह्मदेवाचा बाप. १०.कोणत्या पर्वतावर तप केले, त्याचे नांव मूळांत नाहीं. ‘स तपस्तीव्रमातस्थे शिशिर गिरि माश्रित:।' (अध्याय २०१।५८). ११. खाणेपिणे, १२, दमन करिती. 'दमी' असे पाठांतर