पान:महाभारत.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ अध्याय महाभारते. २८५ उष्णीषे जळती वरच्या वरी । त्यागोनी बोडके होतां समरीं । ज्वाळा अंगीं पेटती. ॥ ७९ ॥ किलकिलाटें फोडिती हाका । ‘पळा ! पळा!' म्हणती एकमेकां । चहूंकडे अग्नीचिया शिखा । वावरती सैत्राणे. ॥ ४० ॥ तापे तापले त्रिभुवन । आहळोनी गेले शूरत्वमान । वन्हि चक्री पडिलें सैन्य । आकांत थोर वीरांतें. ॥ ८१ ॥ तयापाठीं सुसाट शर । मुखीं सांडिती अग्नीचे भार । अनेक इषंचे प्रकार । सैरा दिशा वावरती. ॥ ८२ ॥ पीतरक्तहरितवर्णी । चहुंकडे बाणभरणी । हेमपिसारे, रुक्मभूषणी, । अग्रीं वन्ही डळमळी. ॥८३॥ ऐसा आकांत सेनामेळीं। महावीरांची फुटली फळी। सेना अक्षौहिणी एकतळीं। भस्मीभूत जाहली, ॥८४॥ वीरांसहित युधिष्ठिर । विन्मुख होवोनी, सांडिला धीर । कौरववीर हर्षित थोर । पिटोनी पाणी नाचती. ॥८५॥ महोल्हासे तंजिलीं तेरें । सिंहनाद गिरागजरें । हे देखोनी सुभद्रावरें । क्रोधानळ धडकला.॥८६॥ गांडीव कषनी रोषावर्ती । ब्रह्मास्त्रप्रयोग केला आर्ती । सर्वस्त्रभेदक काळघाती । जे विधीनें निर्मिलें. ॥ ८७॥ सबीजमंत्र वर्णोच्चारा। मुखीं स्मरोनी यादवेश्वरा । सोडिलें रोषे महानिकरा । द्रौणीअस्त्रविनाशा. ॥ ८८ ॥ ब्रह्मांड जाळी ऐसा वन्ही । लोटला, कडकडाट फुटला अवनी । खळबळिले लोक तीन्ही । कूर्मपृष्ठीं चुळबुळी. ॥ ८९ ॥ अस्त्रअस्त्राचे संघट्टणीं । द्वैतता निमोनी, ऐक्यता दुणी । होवोनी, समरसे तेजकिरणीं । शांत जाहलीं क्षणार्धं. ॥ ९० ॥ जेवीं क्रोधातमाची शिखा । नाश करी विवेकदीपिका । की मोहमायेचा कडाका । ज्ञानरवी विनाशी. ॥ ९१ ॥ कीं 'तत्पद समावे त्वं'पदीं । वायु समरसे व्योमसंधीं । विश्वाभास 'मुरे तत्वबोधीं। जीवित्वभाव शिवत्वीं; ॥ ९२ ॥ तयापरी अस्त्रशांती । होता, निर्भय वीर चित्तीं । वायु सुशीतळ वाहती क्षिती । निरभ्र व्योम स्वच्छता. ॥ ९३ ।। ग्रहणनिवर्तनीं निशाकर । कीं मेघवृष्टी दग्धकांतार । ना ते नौका बुडतां, पैवतां तीर । तेवीं आल्हाद सवते. ॥ ९४ ॥ हर्षमान पांडवसेना । तोष नावरे मधुसूदना, । जगजीवना, १. पागोटीं. २. ज्वाळा. ३. जोराने. ४. शौर्याची प्रौढी. ५. ‘तयापरीपरी' असे पाठांतर. ६. बाणाच्या मुखांतून अग्नीच बाहेर पडत असे-असा भाव. ७. गज २१८७०, रथ २१८. ७०, घोडे ६५६१०, पायदळ १०९३५०, ही गजादि संख्या एकत्र झाली असता त्यास अझैहिणी म्हणतात. ८. वाजविली. ९. वाद्ये, १०. द्वैतभाव नाहीसा होऊन अद्वैतभाव दुणावला (दोन्ही असे एकमेकांस मिळून गेलीं)-हा भावार्थ. ११. तद्रूप (तादात्म्य) होऊन. १२. सुविचाररूपी मशाल. १३. ज्ञानरूपी सूर्य. १४. मिळून जाई, तद्रप होई. १५. नाहींसा होई, विरे, १६. महण सुटल्यावर. १७. तीरावर पोहोंचतां. । ४० न० दो०