पान:महाभारत.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत [द्रोणपर्व २८४ अंडेजखोपा । निघतां आकांत पक्षिया. ॥ ६२ ॥ कीं व्याळमेळीं बैचूची उडी । पॅडतां, होती देशधडी । कीं व्याघ्रविक्रमें तेंडातोडी । जेवीं होय पझुंची. ॥ ६३ ।। तयापरी पांडवसेना । विन्मुख होवोनी निघे रणा । शंख द्रौणीने स्फुरुनी वदना । सिंहनाद फोडिला. ॥ ६४ ॥ भग्न सेना विन्मुख कदनीं । क्रोधं प्रज्वळिला गांडीवपाणी । रथ लोटोनी रणांगणीं । द्रौणीप्रती तगटला. ६५ ।। भग्न वीरवाहिनीसंघ । सँांगोळले वीरांचे दांपें । पार्थापाठी मिनले सैंधं । सभयें खेद त्यागोनी. ॥ ६६ ।। पार्थ देखोनी सन्मुख द्रौणी । क्रोधे प्रज्वळिला जैसा वन्ही । कीं युगांतकाळीं दंडपाणी । क्षोभे तेवीं क्षोभला. ॥ ६७ ।। आकर्ण कर्पोनी शरासन । शितीं योजिला वज्रबाण । महास्त्र प्रयोजोनी घन । अभिमंत्रोनी सोडिला. ॥ ६८ ॥ देवगंधर्वउरगराक्षसां । यक्षकिनरपिशाचमनुष्यां । प्रळयकाळीं धराकोशा । मुक्त केले शराग्नी. ॥ ६९ ।। जुझवात सुटला वायो । वहन उडती सोडुनी ठावो । वाहाटोळीच्या भियो । नेत्रां झांपडी वीरांच्या. ॥ ७० ॥ पाडी सहस्र विजांचा कडका । तैसा शब्द फुटला देखा । ब्रह्मांड जाळी वन्हि औसका । तैशा शिखा धडकल्या. ॥ ७१॥ सहस्रादित्यतेजउमाळा । तैसा प्रकाश, फांकल्या कीळा । सरसराट ज्वाळमाळा । धरणी नभा व्यापिल्या. ॥ ७२ ॥ तया उष्माचिये किरणीं । कढों लागलें समुद्रपाणी । जळचरां जाहली प्राणहानी । दिवौकसां आकांतू. ॥ ७३ ।। सुरांसहित सैरपती। भयें उद्विग्न सशंक चित्तीं । यक्ष, गंधर्व, दिज्ञापती, । टाकोनी स्थाने निघाले. ॥७४॥उल्कापात तडाडी धरा। खचोनी पडता तळीं तारा । कडकोनी विजा उतरुनी सैरा । पाताळकोशी भेदिती. ।। ७५ ॥ तया ज्वाळांचिये भरणी । वना धडकला दावाग्नी । धडधडा पादप जळता झणी । श्वापदांतें आकांतू. ॥ ७६ ॥ पशुपक्षादि अनेकशः । जळोनी जाल मही कोळसा । सेनामेळीं भोंवे वेळेसा । युगांतकाळासारिखा. ॥ ७७ ॥ वाहने जळती ठाईच्या ठाई । आँहाळोनी वीर पडती भुई । गजाश्वपाखरा जळती पाहीं । धांवती रणीं इतस्तता. ॥ ७८ ॥ रथी विरथी पळती दुरा । | १. पक्ष्यांच्या घरट्यांत. २. सापांच्या समुदायांत. ३. नकुळाची. 'विपुले नकुले वि बभ्रना पिङ्गले त्रिषु' इत्यमरः, ४. पळतां पाठांतर. ५. दाणादाण, पळापळ. ६. गोळा झाले. ७. समुदाय. ८. पुष्कळ. ९. घोडे, हत्ती वगैरे वाहने. १०. भीति, भय, ‘प्रळया ' असे पाठांतर. ११. असगा, सर्व, पूर्णपणे. १२. देवांस, स्वर्गवासी प्राण्यांस. १३• ३५ १४. अष्ट दिग्पाळ. १५. संकट. १६. भाजुन, पोळून. १७. हत्ती व घोड याचा पाखर=(१) चिलखत, (२) झूल. १७. हत्ती व घोडे यांची चिलखते.