पान:महाभारत.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ अध्याय महाभारत. २८३ क़ार्मुक रत्नमुष्टी । सुसाट उठती बाणकोटी ।... धनुष्ये... कुंजती बोभाटीं । वज्रिचापासारिखीं. ॥ १७ ॥ अलातचक्रे मंडळाकारें। तैसीं कार्मुकें वेती फेरे। घेतां सोडितां इषंचे भारे । लैक्षा न येती वीरांच्या. ॥ ४८ ॥ अद्भुत विक्रम भीमाचा । देखिला राया ! नयनीं साचा । यथार्थ सुत वायुदेवाचा । होय भ्राता पार्थाचा. ॥ ४९ ॥ त्वरेमाजी करूनी त्वरा । ज्य आणि धनुष्य खंडिलें सैरा । दश नाराच वन्हिकारा । स्तनांतरीं अर्पिले. ॥ ५० ॥ तेणें डळमळोनी द्रौणी । जैसा फुफाटे ताडिला फेणी। ‘तिष्ठ तिष्ठ' म्हणोनी बाणीं । शब्द रोपें फोडिला. ॥ ५१ ॥ शिळाशित शर तीक्ष्ण । कुशळ हस्ते प्रेरुनी त्राणे । भीमधनुष्य छेदोनी जाण । बाण हृदयीं भेदिले. ॥ ५२ ॥ तेणे पांडव क्रोधभरणी । शक्ती टाकिली ज्वलित वन्ही । जाणों उतरली दामिनी । क्षयालागीं युगांतीं. ॥ ५३ ॥ द्रोणतनय पाहोनी चक्षीं । शरीं शरांच्या वोपिली भक्षीं । जेवीं व्योमी विचरतां पक्षी । श्येनं खंडी ज्यापरी. ॥ ५४ ॥ अन्य धनुष्य सज्जोनी वेगा । द्रौणी ताडिला; राया ! सुभगा । भेदुनी तनु धरणीभागा-। माजी जाला निमग्न. ॥ ५५ ॥ सर्वांग जालें रुधिरमय । जेवीं किंशुकी फुलिला वर्य । क्रोधभरें द्रोणतनय । सोडी शर निघालें. ॥ ५६ ॥ येवोनी बैसले सूतभाळीं । मूर्छ दाटली अतुर्बळी । उसळोनी पडतां धुरेतळीं । १३मी हातींचे निष्टले. ॥ ५७ ॥ द्रोणनंदने करूनी त्वरा । बाणी ताडिलें वृकोदरा । अश्वांसही लागतां पिसारा । सैरा रणा उसळले. ॥ ५८ ॥ धरू धांवला सेनाभार । द्रौणी प्रज्वळिला वैश्वानर । शिरीं शरांचा वर्षांनी पूर । वीर वीर त्रासिले. ॥ ५९॥ दाट दाढली शवांची भरणी । गजाश्वपती कार्मुकपाणी । धरा शोभली वस्त्राभरणीं । श्रीमंतभामा मंगलीं. ॥ ६० ॥ विकळ पांचाळ पांचाळसेना । अर्दित निघाली दिश नाना । जेवीं वन्ही धडकतां वना । श्वापदपक्षिया आकांतू. ॥ ६१ ॥ | कीं वृक मिनतां अजाकळपा । आकांतमान पळती तापा । ना ते बिडळ १. इंद्रधनुष्याप्रमाणे. २. जळते कोलीत गरगरा फिरविले असतां में चक्र दिसते ते. ३. ध्यानांत. ४. धनुष्याची दोरी. दोणी धनुष्य' असा अन्य पाठ. ५. स. ६. उतरत' असे पाठांतर. ७. बहिरी ससाणा. ८. ह्याचा कता ‘बाण' (अध्याहृत). ९. पळसाचे झाड. १०. धोड्यांच्या लगामा. ११. बाणांच्या मागच्या बाजूस पक्षांची पिसें लाविलेली असतात. १२. श्रीमंतबाळा मांगल्य' असा पाठभेद, १३, ‘दिशानना' असे पाठांतर. १४, लांडगा. १५. मेंढ्यांच्या कळपास. १६. मांजर.