पान:महाभारत.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ अध्याय] महाभारत. बाहुवटें; । तेजें तारा दिपती वाटे; । करमुद्रिकालखलखाटें । वस्तिगृह वसिनलें. ॥ ८८ ॥ विराजमान स्यदन घन । तप्तहॉटकज्वाळवर्ण । पताका तळपती विजूमान । वीरू वौरिया वीरिती. ॥ ८९ ॥ कीं तो रावणी प्रतापभानू । हवनीं हवितां बृहद्भानू । तोषोनी प्रसाद यंदन घनू । अर्पिता, वानरी भ्रष्टिला. ॥ ९० ॥ तोची ठेवा गुप्त धरणी । जाणों अर्पिला राधेया गुणी । तेजें प्रदीप्त बालार्ककिरणी । लक्ष्य लंक्षी अलक्ष्य. ॥ ९१ ॥ ना ते पुष्पक शोभायमान । देवीं 'उचिता वोपिलें घन । ऐसिया रथी रविनंदन । आरूढ जाहला तेजस्वी. ॥ ९२ ॥ विभ्राज कवच ज्वाळमाळी । तेजें दिशा व्यापिल्या सकळीं । शरासन हस्तकमळीं । जाणों त्र्यंबके दुसरें. ॥ ९३ ॥ तेज वर्चस्व, तीव्र बाण, । गुर्वी गदा, शक्ती ज्वलीन, । खङ्ग चर्म, शंख कोंदण । विचित्र नाळ हिरियांचे. ॥ ९४ ॥ ऐसिया संभ्रमें तेजभरित । लोटला जैसा ग्रीष्मादित्य । सेना विक्रमी वळोन्नत । गजदुंदुभिघनघोजें. ॥ ९५ ॥ जाणों तारा तुटे गगनीं । कीं दमिनी कडाडली अवनी । ऐसिया संभ्रमें वीर हैंयनीं । भीष्मदर्शना पातला. ॥ ९६ ॥ उतरूनियां रहंवरैयानीं । प्रवेशला सभासदनीं । दृष्टी देखिला प्रतापतरणी । शरासनीं सुशोभा. ॥ ९७ ॥ जाणों धरे पातला सूर्य सांग । की द्रोणाद्रीचे बँवळे शृंग। ना ते सुदर्शन प्रत्यक्ष आग । गळोनी तळां पडियेलें; ॥ ९८ ॥ ऐसियापरी गंगाकुमरा । देखोनी काँळजीं सोडिला रा । नयनांबुज अंबुधारा । कंठ सद्गद अशोभा.॥ ९९ ॥ सांवरूनी शोकधाडे । वंदोनी उभा राहिला पुढे । म्हणे, ‘पार्थ विक्रमाचे बाडे । सुरांसुरां अभेद्य. ॥ १०० ॥ जितक्लमा, पुरुषार्थवृद्धी, । साम्यते न ये अक्षोभ उदधी । सर्वास्त्रप्रवीण, विजयसिद्धी । पुढे उभ्या राहती. ॥ १०१ ॥ विजयरथ अक्षोभ तूणीर । अशनिप्राय गांडीव प्रचुर । ध्वजीं विराजे श्रीशं कर । सारथी स्वामी विश्वाचा. ॥ १०२ ॥ मनुष्यरूपाची धरूनी बुंथी। |साह्या मिनला इंदिरापती । भूभार हरुनी नानायुक्ती । यश वर्धवी त्रिजगतीं, १. दंडभूषणे. २. रथ. ३. हाटक=सोनें. ४. विजेप्रमाणे. ५. घोडे वा-याला सुद्धा मागे सारीत होते. ६. इंद्रजिताने अनेक यज्ञ करून दिव्यरथ, धनुष्यबाण, शस्त्रास्त्रे इत्यादि प्राप्त करून घेतली होती, अशी कथा आहे. ७. अग्नि. ८. [तो डोळ्यांना दिपवीत असल्याम] लक्ष्य (मन) त्याला अलक्ष्य (दुनिरीक्ष्य) लक्षी (मानी). ९. विमानविशेष. १०. उचित-नजरा भेट. ११. शिवाचे धनुष्य. १२. वीज. १३. मार्गाने. १४. हा सप्तमीचा पंचमीच्या अथीं प्रयोग आहे. १५. स+अंग=देहधर, मूर्तिमंत. १६. खवळ (=भेग) पडलें, फुटले. १७. अंतःकरणाने धैर्याचा आधार सोडला, काळजाचा घर सुटला. १८. भांडार, खजीना. १९. शिवावतार मारुति. २०, बुडखा, आडपडदा, आवरण.