पान:महाभारत.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८१ ३५ अध्याय] महाभारत. क्षतांग धडके क्रोधानळीं । काळसर्पासारिखा. ॥ १२ ॥ देखोनी वीर धांवले त्वरा । धनुष्य वोढोनी करकरा । धनु सज्जोनी शरनिकरा । वर्षाव केला सर्वत्रीं. ॥ १३ ॥ वीस सायक दुर्योधनें । काळी खारी वोपिले घन । कृपाचायें तीक्ष्ण तीन । गात्रस्थानीं ताडिले. ॥ १४ ॥ कृतवर्मा क्रूरकर्मा । दश शर वोपी सात्वतोत्तमा । रविनंदन क्रोधगरिमा । पांच शत समप. ॥ १५ ॥ दुःशासन रोषभरीं । शत बाण ताडी स्तनांतरीं । वृषसेन सात इषु विखारी । अर्पण करी सरोजें. ॥१६॥ सत्य सात्यकी वीरराज । बाण सोडुनी तेजःपुंज । विरथी करुनी भग्नतेज । विन्मुख केले सर्वही. ॥ १७ ॥ द्रौणी पावोनी चेतना। अन्य रथीं वळंघोनी त्राणा । क्रोधे प्रज्वळोनियां रणा । वन्हिप्राय उसळला. ॥ १८ ॥ धनुष्य वोढोनी क्रोधभरें । सात्यकी ताडिला महानिकरें । रोपें प्रज्वळोनी शिनिप्रवीरें । शर निघातें सोडिले. ॥ १९ ॥ सूतवाजीसहित रथ । भग्न करुनी टाकिला त्वरित । अमित शरांचे वर्षोंनी वोर्थे । बहळ सेना मर्दिली. ॥ २० ॥ वृषसेनाचे रॅथी श्रेष्ठ । तीन सहस्र केले पीठ। कृपाचार्याचे दंती सुभेंट । अयुत एक मारिले. ॥ २१ ॥ सौबळ शकुनी शकुनीप्राय । उडवोनी असिवार लक्षवर्य । जीवित्वाचा पुसोनी ठाय । काळधामा धाडिले. ॥ २२ ॥ हलकल्लोळ रणांगणीं । अन्य रथीं वळंघोनी द्रौणी ।। बाण सज्जोनी प्रभिन्न गुणी । सात्यकीते ताडिले. ॥ २३ ॥ परस्परें सायकधारीं । निकरें पेटले महामारीं । शरीं शरीरें भेदिलीं पुरीं । रक्त गळे झरझरा. ॥ २४ ॥ सरसराटें उसळती शर । खंडिती दोघे वरच्या वर । धनुविद्येचे प्रकार । एकमेकां दविती. ॥ २५ ॥ द्रौणी प्रदीप्त महारोष । अशनिप्राय घोर कर्कश । शर प्रेरिले काळविष । भंगी ते शल्य क्षणार्धे. ॥ २६॥ उसळोनी तिहीं बाणीं । सायकी भेदिला गात्रस्थानीं । पार होवोनी विझाले धरणी । जेवीं वल्मीकीं फणींद्र. ॥ २७ ॥ तेणें दाटली मूर्छना तया । पडला निस्विनँ रथालया। सूतें देखोनी विगतचय । माघारिलें रथाते. ॥ २८ ॥ रोपें धांवतां धृष्टद्युम्न । द्रोणसुते लक्षिला नयने । नतपर्वणी शर दारुण ।। भाळपडळीं ताडिला. ॥ २९ ॥ वज्रप्रहार पर्वतमौळीं । तैसा टणत्कार झाला तळीं । झोला खावोनी उतावेळी । ध्वजस्तंभी टेंकला. ॥ ३० ॥ ‘आहाकार | १. जखमी. २. बाणांचा समुदाय. ३. आवेशाने. ४. ओघ, लोट. ५. पुष्कळ, बहुत. ६. यो. ७. हत्तीवर बसून युद्ध करणारे योद्धे. ८. पक्ष्याप्रमाणे. ९. स्वार. ह्या शब्दाची व्युत्पत्ति अशी आहे:-अश्ववार=अश्वार=असिवार=स्वार=सिवार, १०, लाखों. ११. चढून. १२. ‘ताडिती' असे पाठांतर. १३. वारुळांत. १४. घामाघूम. ३९ न० द्रो०