पान:महाभारत.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८० नरहरिकृत (द्रोणपर्व प्रताप पावल्या वाव । दिशा धोते जाहल्या सर्व । पशुपक्षी, वीरांचे थवे । शांत जाहले समस्त. ॥ १२७ ।। वायु पातला सुशीतळ । जंगमादि निर्भय सकळ ।। शौर्यप्रतापें उतावेळ । संग्रामातें तगटले. ॥ १२८ ।। दारुण युद्ध पुढे पाहीं । वीर भिडती शौर्यबाहीं । या वीररसाचे नैवाई । पान सज्जन करावे. ॥ १२९ ॥ श्रीगुरुभीमराजकिंकर । विनवी नरहर मोरेश्वर । भारतकथामृत सारसार । श्रोतेसजनीं सेविजे. ॥ १३० ॥ अध्याय पसतिसावा. धृतराष्ट्र वदे, “बाळका ! कुशळा ! । अस्त्रप्रभव शमतां कीळा । पुढे द्रौणी प्रतापलीळा । काय करी ? अर्नुवादें.' ॥ १ ॥ संजय म्हणे, ‘धरत्रीपती ! । महात्याची पावतां शांती । गुरुनंदना विस्मय चित्तीं । क्रोधानळीं धडकला. ॥ २ ॥ सिंहलांगूळचिन्हकेतू । शोभायमान सदृढ रथू । क्रोधानळीं प्रदीप्तमंतू। धांवला रोपें प्रतापी. ॥ ३ ॥ पाठी वीरांचा समुदावो । लोटिला, जैसा सारतानाहो । धनु कर्पोनी बाणसमूहो । वीस पार्षता वोपिले. ॥ ४ ॥ त्यांवरी आणीक क्रोधविखारी । पंचवीस अर्पिले स्तनांतरीं । येरू प्रज्वळोनी क्रोधलहरी । शितीं शर सजिले. ।। ५ ।। सदुसष्ट शरीं ताडिला द्रौणी । सूत विधिला वीस बाणीं । चतुरे हेयासी निघुरपणीं । चार चार वोपिले. ॥ ६ ॥ द्रौणीगात्रीं धडकतां शर । डळमळी जैसा तरुवर । कीं 'क्षते तांडितां फणि वर । उल्का वमी विषाच्या. ॥ ७ ॥ द्वय सायक क्षुरुप्रधारा । सोडुनी ध्वज केला पुरा । अश्वसारथी धाडिले घरा । कृतांताचे संगती. ॥ ८ ॥ सुवर्णपुंख निशित शरीं । ताडुनी केला व्याकुळ समरीं ।अनुचरोची करुनी 'बोहरी । पार्षतातें त्रासिलें. ॥ ९ ॥ पाहोनी द्रौणीचे क्रूरकर्म । सात्यकी धांवला रोषे परम । शिळाशित शर उत्तम । आठ वैक्षीं ताडिले. ॥ १० ॥ पुन्हा त्यावरी वीस तीख । अर्पिले विचित्र हेमपंख । ध्वज, कामुक, छेदोनी चोख । अश्वसारथी मदिले. ॥ ११ ॥ रथ भंगिला बाणजाळीं । अश्वत्थामा पाडिला तळीं । । १. व्यर्थ, विफळ. २. स्वच्छ. ३. आश्चर्यपूर्वक. ४. ह्या अध्यायाचे द्रौणीविक्रम त्कर्ष' असे नांव आहे. ५. ह्यांत मूळांतील २००-२०२ अध्यायांचा सारांश आलो आहे' ६. कथन कर. ७. ज्याच्या रथाचा सिंहपुच्छांकित ध्वज आहे असा (अश्वत्थामा). ८. नदी समुद्र. नाहो=नाथ. ए. रथाच्या चारही घोड्यांस. १०. दुखविले असतां. ११. ध्वजय केलें पुरा' असा पाठभेद. १२. पाठीराख्यांची. १३. राख, भस्म, नाश. १४. वक्षस्थळा, छा" तीवर. १५. चांगल्या प्रकारे.