पान:महाभारत.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ अध्याय महाभारत. २७९ निघाले मागिले पायीं । धर्मराजादि विन्मुख पाहीं । निरुत्साह मानसीं. ॥११०॥ पाथे प्रज्वळोनियां हवे । शरौघवोध लाविले बरवे । हस्तक्रियेचे लाघव सर्वे ।। कळाकसरी विद्येच्या. ।। १११ ॥ माजी अस्त्रप्रयोग नानाविध । कडोविकडी करी विशद । वायव्यास्त्र सोडितां राहिला स्तब्ध । उपाय कांहीं न चाले. ॥११२॥ जें जें अस्त्र सोडिलें पार्थे । तें तें विफळ जाहलें व्यर्थ । विकळमानस संकोचिंत । कृष्णवदन विलोकी. ॥ ११३ ॥ तो भक्तपाळ, आनंदकंद, । विष्णु, परमानंद, । गोविंद, गोपाळ, मुकुंद, । कुंदरदन, दाशार्ह. ॥ ११४॥ श्रीहरी, श्रीनिवास, श्रीपती, । श्रीधर, श्रीकर, वैकुंठपती, । श्रीमान्य, श्रीकृष्ण, कैवल्यपती, । वदे प्रीती पार्थाते. ॥ ११५ ॥ ‘ताता ! सखया । धनुर्धरा! । मम प्रिया ! विश्रामकरा ! । वीरवर्या ! संगरचतुरा ! । विद्याधरा ! गुणनिधी ! ॥ ११६॥ यया अस्त्रास निवारण । नाहीं ब्रह्मांडगेहीं जाण । पाशुपतास्त्रासमान मान । विश्वदाहक जाण पां. ॥ ११७ ।। याचिया शांतीसी उपायां । सांगतो तूतें, धनंजया ! । लीन होवोनी स्तविजे तया । मद्रपता भावोनी ॥ ११८ ।। शैचि मानसे श्वेतवाहन । विसर्जानी धनुष्यबाण । उडी टाकोनी साष्टांग नमन । घाली आवडी सद्भक्ती. ॥ ११९ ॥ म्हणे जयजय नारायणा ! । विश्वनिवासा, भवतारणा ! । अच्युता ! अनंता ! संकर्षणा ! । मुरुमर्दना! मुकुंदा ! ॥ १२० ॥ हॅरिस्वरूप, हरिहरमूर्ती, । तुं व्यापक सर्व जगतीं । भक्तपाळक, करुणाआर्ती । रक्षीं आम्हां बाळकां. ॥ १२१ ॥ ऐसें स्तवितां धनंजय । अस्त्रप्रभव पावला लय । समक्ष रथ त्रिदशवर्य । केवीं बाधा बाधिजे ? ॥ १२२ । जेवीं इंद्रजितवधी गरे । प्रेरुनी सुमित्र आकधी सूत्रे । तेवीं अन्न शांतविलें अब्जनेत्रं । रक्षी भक्तां कपाल ॥ १२३ ॥ अमृतसागरीं चुंबकला । त्यासी मृत्यूचा बाधी झोला ? । उसको स्कंदीं जो मिरवला । विषाची बाधा कायसी ? ॥ १२४ । सुरतरूची ) छाय । निवतां क्षुधेची बाधा होय? । कीं देवतटिनीचे सेवितां तोय । पाप बाधी तयातें ? ॥ १२५ ।। तेवीं श्रीकृष्णप्रसादें पाहीं । महास्त्र विलया गेलें तेही । वीरां हर्ष, संग्रामडोहीं । घालिती उड्या स्वानंदे. ॥ १२६ ॥ अस्त्र १. संकोचचित्त' असे पाठांतर. २. बापा ! ‘तातः पितरि पूज्ये च' इति कोशः । ३. 'शुचिमंत' असा पाठभेद. ४. “हरि विश्वरूप' असा अन्य पाठ. ५. प्रत्यक्ष. ६. देवश्रेष्ठ (कृष्ण) . वटवला. 2. टोला, धक्का. ९. गरुडाच्या खांद्यावरून. १०. कल्पवृक्षाची. कल्पवृक्ष पांच प्रकारचे आहेत:-पंचैते देवतरवो मंदारः पारिजातकः । संतानः कल्पवृक्षश्च पुसि वा हरिचंदनम्' (अमरकोश). ११. सुरनदीचे, गंगेचे. १२. पाणी.